News Bharati

महाराष्ट्र

मिरा रोड ते म्यानमार: जिहादी रॅकेट उघडकीस..

एखाद्या भौगोलिक क्षेत्रात मुस्लीम समाजाची लोकसंख्या लक्षणीय होऊ लागली की आपसूक तेथील गुन्हेगारीचा आलेख वाढू लागतो. अगदी साखळी चोरांपासून अमली पदार्थांच्या व्यापारापासून ते मानवी तस्करी पर्यंत. मुंबई जवळील मीरा रोड हे याचे एक उत्तम उदाहरण आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मीरा रोडच्या लोकसंख्येत मुस्लिम समाजाचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. मिरा रोड मधील गुन्हेगारीच्या बातम्या मुंबईच्या वृत्तपत्रांमध्ये […]

मिरा रोड ते म्यानमार: जिहादी रॅकेट उघडकीस.. Read More »

गणेशोत्सवाची लोकमान्यता आणि राजमान्यता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील भारतीय जनता पार्टी महायुती सरकारने यंदा गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला, ही अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे. गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करणे म्हणजे अखेरीस या उत्सवाला राजमान्यता मिळणे आहे. ब्रिटिश राजवटीची पकड घट्ट झाली होती. समाज हताश झाला होता. १८५७ च्या स्वातंत्र्य समराने इंग्रजांना धक्का दिला

गणेशोत्सवाची लोकमान्यता आणि राजमान्यता Read More »

ओळख… नंदीबैलवाले जमातीची

महाराष्ट्रात ३१ ऑगस्ट हा दिवस दरवर्षी “भटके विमुक्त दिवस” म्हणून साजरा करण्याचा स्वागतार्ह निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. भटके विमुक्त समाजात या निर्णयामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. भटक्या जमातींचा इतिहास प्राचीन आहे. या जमाती लोकसंस्कृतीच्या अविभाज्य घटक राहिल्या आहेत. त्यातील नंदीबैलवाले या जमातीची ओळख. नंदीबैलवाले ही एक पारंपरिक भटकंती करणारी जमात असून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी

ओळख… नंदीबैलवाले जमातीची Read More »

विधायकतेची प्रचिती देणारा पुण्याचा गणेशोत्सव

श्री गणरायांचे आगमन झाल्यानंतर महाराष्ट्रात गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे. श्री गणेशोत्सव हे पुण्याचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य. पुण्याच्या गणेशोत्सवाची कीर्ती देशातच नव्हे, तर देशाबाहेरही पोहोचली आहे. पुण्याच्या गणेशोत्सवाचे अनेक पैलू आहेत. गणेश मंडळांचे सामाजिक कार्य हा त्यातील एक लक्षणीय पैलू. त्याची ओळख या लेखातून होईल. पारतंत्र्यात खितपत पडलेल्या समाजाला जागे करण्यासाठी आणि लोकांमध्ये स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग चेतवून त्यांना राष्ट्रकार्यासाठी प्रवृत्त

विधायकतेची प्रचिती देणारा पुण्याचा गणेशोत्सव Read More »

महाराष्ट्रात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने होण्याची शक्यता

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील (Maharashtra) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला असून, दिवाळीनंतर या निवडणुका टप्प्याटप्प्याने घेण्याची शक्यता आहे. राज्याच्या निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबरच्या अखेरीस ही प्रक्रिया सुरू होऊन पुढील चार महिन्यांत पूर्ण होईल. यामुळे गेली अनेक वर्षे प्रशासकाधीन असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुन्हा लोकप्रतिनिधी दिसतील. निवडणुकांचे स्वरूप आणि महत्त्वाचे मुद्दे: टप्प्याटप्प्याने निवडणुका:

महाराष्ट्रात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने होण्याची शक्यता Read More »

तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरील ‘ती’ १४ गावे महाराष्ट्रातच समाविष्ट होणार! मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच बोलले

मुंबई : तेलंगणा आणि महाराष्ट्र (Telangana and Maharashtra) सीमेवर असलेली चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील १४ गावे महाराष्ट्रातील असून त्यांना समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिली. तेथील नागरिकांचे शंभर टक्के मतदान महाराष्ट्रातच होईल असेही त्यांनी स्पष्ट सांगितले. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, \”महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील

तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरील ‘ती’ १४ गावे महाराष्ट्रातच समाविष्ट होणार! मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच बोलले Read More »

महाराष्ट्राच्या रेल्वे प्रगतीचा वेग: आव्हाने आणि संधी

गेल्या दशकात महाराष्ट्रातील रेल्वे क्षेत्राने लक्षणीय प्रगती साधली आहे. शहरीकरण, माल वाहतुकीची वाढती मागणी आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटीच्या आकांक्षांमुळे या प्रगतीला वेग मिळाला आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नुकतीच पुणे-रेवा (जबलपूरमार्गे) या नवीन रेल्वेची घोषणा केली. ही घोषणा महाराष्ट्रातील रेल्वे विकासाचे दुहेरी चित्र दर्शवते. एकीकडे, यामुळे दीर्घकाळ दुर्लक्षित असलेल्या मार्गांना चालना मिळत आहे, तर दुसरीकडे,

महाराष्ट्राच्या रेल्वे प्रगतीचा वेग: आव्हाने आणि संधी Read More »

राज्यात 150 दिवसांच्या उद्दिष्टपूर्ती कार्यक्रमानंतर ‘मेगा भरती’ होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्य सरकारकडून 150 दिवसांच्या उद्दिष्टपूर्ती कार्यक्रमानंतर राज्यात मोठ्या प्रमाणावर ‘मेगा भरती’ (Mega Recruitment) प्रक्रिया राबवली जाईल. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी विधानसभा सभागृहात सदस्यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना राज्यातील नोकर भरतीसंदर्भात सविस्तर, तपशीलवार माहिती दिली. राज्य शासनाने सर्व विभागांना 150 दिवसांचा उद्दिष्ट कार्यक्रम दिला आहे. या कार्यक्रमांतर्गत आकृतीबंधातील

राज्यात 150 दिवसांच्या उद्दिष्टपूर्ती कार्यक्रमानंतर ‘मेगा भरती’ होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

मराठी संतसाहित्य : अध्यात्मातून समाजजागृतीकडे

१२व्या ते १७व्या शतकात महाराष्ट्रात संतपरंपरेचा उदय झाला. विठ्ठल भक्ती सोबतच समाजाला ज्ञान देणे, विचारप्रवृत्त करणे आणि एकात्मतेच्या धाग्याने जोडण्याचे कार्य संतांनी केले. त्यांच्या लेखणीतून निर्माण झालेल्या विपुल सर्जनाला आपण संतसाहित्य म्हणून ओळखतो. हे साहित्य केवळ धार्मिक अभिव्यक्ती नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाची शक्तीही होते. संतांनी संपूर्ण आयुष्य विठ्ठल भक्तीसाठी वाहून घेतले. त्यासोबतच  अंधश्रद्धा, जुनाट चालीरीती,

मराठी संतसाहित्य : अध्यात्मातून समाजजागृतीकडे Read More »

समन्वयकार संत ज्ञानेश्वर

तेराव्या शतकातील महान संतकवी आणि तत्त्वज्ञ संत ज्ञानेश्वर यांनी रचलेला ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ केवळ भगवद्गीतेवरील भाष्य नसून तो सामाजिक समरसता आणि वैश्विक कल्याणाचा एक अजरामर संदेश आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञान, भक्ती आणि समरसतेचा प्रकाश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांची विचारधारा, त्यांचे साहित्य आणि त्यांचे कार्य हे एकात्म आणि समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीसाठी आजही तितकेच प्रासंगिक

समन्वयकार संत ज्ञानेश्वर Read More »