News Bharati

Team NB Marathi

निरोगी मन: एकविसाव्या शतकातील सर्वात मोठी गरज

आजच्या 21व्या शतकात माणसाने तांत्रिक, आर्थिक आणि सामाजिक स्तरावर अभूतपूर्व प्रगती केली आहे. पण या झपाट्याने बदलणाऱ्या जगात मानसिक आरोग्य (Mental health) ही एक गंभीर समस्या बनून उभी राहिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, जगातील प्रत्येक चारपैकी एक व्यक्ती आपल्या आयुष्यात कधी ना कधी मानसिक आरोग्याशी संबंधित समस्येला सामोरे जातो. तरीदेखील, समाजामध्ये मानसिक आरोग्याविषयी […]

निरोगी मन: एकविसाव्या शतकातील सर्वात मोठी गरज Read More »

युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीत भारतीय परंपरांचा ठसा

कुटियाट्टमचा गंभीर रंगाविष्कार, वैदिक मंत्रोच्चारांचा कालातीत नाद, झारखंड–ओडिशा–बंगालमधील छाऊ नृत्याचा वीररस, कोलकात्याच्या दुर्गापूजेतील सामूहिक ऊर्जा आणि गुजरातच्या गरब्याचा थिरकायला लावणारा ताल — भारतीय जीवनशैलीचे हे अनेक रंग आता जगभर मान्य झाले आहेत. युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत  (Intangible Cultural Heritage List) या परंपरांचा समावेश होऊन भारताची सांस्कृतिक ओळख अधिक ठळकपणे अधोरेखित झाली आहे. २००८ ते

युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीत भारतीय परंपरांचा ठसा Read More »

गोव्यातील गणेशोत्सव : घराघरांतला, परंपरेचा आणि निसर्गसंपन्नतेचा उत्सव

गोव्यात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. मुख्य म्हणजे या उत्सवाची परंपरा गोव्यातील गावा-गावांत, वाड्या- वाड्यांमध्ये आणि घराघरांत जोपासली जात आहे. गोव्यातील या पारंपरिक आणि वैशिष्ट्यपूर्ण सोहळ्याची ही ओळख. गणेशोत्सव म्हटला की मुंबई, पुण्यातील भव्य सार्वजनिक मंडप आणि मिरवणुका डोळ्यासमोर येतात. पण गोव्यातील गणेशोत्सव यापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. येथे गणपती हा प्रत्येक घरात चतुर्थीच्या दिवशी,

गोव्यातील गणेशोत्सव : घराघरांतला, परंपरेचा आणि निसर्गसंपन्नतेचा उत्सव Read More »

मराठा आंदोलनात सेवा भारतीची निस्वार्थ सेवा

मुंबईत मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा केंद्रबिंदू आझाद मैदान होते. राज्यभरातून लाखो आंदोलक तेथे दाखल झाले होते. या प्रचंड जनसमुदायाला उन्हाचा तडाखा, दमट हवामान, पावसाच्या सरी, थकवा आणि आजारपण यांसारख्या अनेक नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागले. इतक्या मोठ्या संख्येने लोक एकाच ठिकाणी जमल्याने पिण्याचे पाणी, आरोग्यसेवा आणि तातडीची मदत या गरजा प्रकर्षाने पुढे येतात. अशा

मराठा आंदोलनात सेवा भारतीची निस्वार्थ सेवा Read More »

गणेशोत्सवाची लोकमान्यता आणि राजमान्यता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील भारतीय जनता पार्टी महायुती सरकारने यंदा गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला, ही अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे. गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करणे म्हणजे अखेरीस या उत्सवाला राजमान्यता मिळणे आहे. ब्रिटिश राजवटीची पकड घट्ट झाली होती. समाज हताश झाला होता. १८५७ च्या स्वातंत्र्य समराने इंग्रजांना धक्का दिला

गणेशोत्सवाची लोकमान्यता आणि राजमान्यता Read More »

ओळख… नंदीबैलवाले जमातीची

महाराष्ट्रात ३१ ऑगस्ट हा दिवस दरवर्षी “भटके विमुक्त दिवस” म्हणून साजरा करण्याचा स्वागतार्ह निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. भटके विमुक्त समाजात या निर्णयामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. भटक्या जमातींचा इतिहास प्राचीन आहे. या जमाती लोकसंस्कृतीच्या अविभाज्य घटक राहिल्या आहेत. त्यातील नंदीबैलवाले या जमातीची ओळख. नंदीबैलवाले ही एक पारंपरिक भटकंती करणारी जमात असून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी

ओळख… नंदीबैलवाले जमातीची Read More »

कोल्हापूरची परंपरा सजीव देखाव्यांची

कोल्हापूर शहराची ओळख सांगणाऱ्या गोष्टींमध्ये गणेशोत्सवातील सजीव देखावे या परंपरेचा समावेश आहे. येथील गणेश मंडळे पौराणिक, ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवरील सजीव देखावे गणेशोत्सवात सादर करतात. त्यांचे सादरीकरण आणि त्याचा लोकांवर पडणारा प्रभाव विलक्षण आहे. कोल्हापुरात गणेशोत्सवातील वातावरण चैतन्याने भरलेले असते. शहराच्या जुन्या पेठांमध्ये या कालावधीत उत्साहाला भरते येते. घरातील महिला मंडळी दुपारचे नैवेद्य, जेवण आटोपून

कोल्हापूरची परंपरा सजीव देखाव्यांची Read More »

विधायकतेची प्रचिती देणारा पुण्याचा गणेशोत्सव

श्री गणरायांचे आगमन झाल्यानंतर महाराष्ट्रात गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे. श्री गणेशोत्सव हे पुण्याचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य. पुण्याच्या गणेशोत्सवाची कीर्ती देशातच नव्हे, तर देशाबाहेरही पोहोचली आहे. पुण्याच्या गणेशोत्सवाचे अनेक पैलू आहेत. गणेश मंडळांचे सामाजिक कार्य हा त्यातील एक लक्षणीय पैलू. त्याची ओळख या लेखातून होईल. पारतंत्र्यात खितपत पडलेल्या समाजाला जागे करण्यासाठी आणि लोकांमध्ये स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग चेतवून त्यांना राष्ट्रकार्यासाठी प्रवृत्त

विधायकतेची प्रचिती देणारा पुण्याचा गणेशोत्सव Read More »

ब्रिटनमधील पोस्ट ऑफिस घोटाळा: सरकारी यंत्रणा आणि प्रशासनाचे गौडबंगाल भाग २

वारंवार होरायझन प्रणालीबद्दल अनेक शाखांमधील सहाय्यक पोस्ट मास्तर बरेच मुद्दे मांडून त्यांच्या अडचणी मांडत असताना सुद्धा; पोस्ट खाते कोणतीही तक्रार ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. मात्र सॉफ्टवेअर पूर्णतः दोषमुक्त असल्याचा पोस्ट खात्याचा विश्वास अनाठायी होता, अन्यायकारक होता, अर्थात खात्याला ते दिसतच नव्हते किंवा पहायचे नव्हते. परिणाम स्वरूप १००० पेक्षा अधिक पोस्ट कर्मचाऱ्यांचे आयुष्य उध्वस्त झाले.  २००० सालापासून

ब्रिटनमधील पोस्ट ऑफिस घोटाळा: सरकारी यंत्रणा आणि प्रशासनाचे गौडबंगाल भाग २ Read More »

वोकिझम-उपभोगवाद विरुद्ध धर्म-संवादच उत्तर : डॉ. भागवत

असहिष्णुता, ‘वोक’ संस्कृती आणि उपभोगवादाचा अतिरेक मानवतेसमोरील गंभीर आव्हाने बनत चालली असताना, या प्रश्नाचे उत्तर भारताच्या धर्मतत्त्वात दडलेले आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी बुधवारी सांगितले. राजधानीत सुरू असलेल्या ‘१०० वर्षांची संघयात्रा’ या व्याख्यानमालेतील दुसऱ्या सत्रात बोलताना त्यांनी स्पष्ट केले की जगाला आज कट्टर प्रवचन वा बळजबरीच्या धर्मांतराची नव्हे, तर संयम

वोकिझम-उपभोगवाद विरुद्ध धर्म-संवादच उत्तर : डॉ. भागवत Read More »