News Bharati

भाजप

महापौर आरक्षण जाहीर! मुंबई, पुण्यासह १५ शहरांत महिलांचे वर्चस्व; पाहा तुमच्या शहराचे आरक्षण

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौरपदाचा सस्पेन्स अखेर संपला आहे. आगामी अडीच वर्षांच्या कालावधीसाठी महापौरांच्या आरक्षणाची सोडत आज मंत्रालयात जाहीर करण्यात आली. या सोडतीने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली असून, अनेक दिग्गजांची गणिते बिघडली आहेत तर काहींसाठी नवीन संधीची दारे उघडली आहेत. यावेळच्या आरक्षण सोडतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे निम्म्याहून अधिक शहरांचा कारभार आता महिलांच्या हाती […]

महापौर आरक्षण जाहीर! मुंबई, पुण्यासह १५ शहरांत महिलांचे वर्चस्व; पाहा तुमच्या शहराचे आरक्षण Read More »

स्थानिक निवडणुकांचे रणशिंग: भाजपचा वरचष्मा, मात्र कट्टरतावादाचे वाढते सावट

महाराष्ट्रातील नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनी राज्याच्या राजकीय भविष्याची नवी दिशा स्पष्ट केली आहे. एका बाजूला मतदारांनी भारतीय जनता पक्षाच्या विकासाभिमुख राजकारणाला पसंती देत ‘महाविकास आघाडी’ला नाकारले असले, तरी दुसऱ्या बाजूला या निवडणुकांमधून समोर आलेले एक भयावह चित्र राज्याच्या सामाजिक सलोख्यासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. राज्यात कट्टरपंथी मुस्लिम पक्षांचा आणि उमेदवारांचा झालेला उदय

स्थानिक निवडणुकांचे रणशिंग: भाजपचा वरचष्मा, मात्र कट्टरतावादाचे वाढते सावट Read More »

भाजपमध्ये कार्यकर्ता असणे हीच सर्वात मोठी पात्रता – नितीन नबीन

नवी दिल्ली : \”भारतीय जनता पार्टीमध्ये संघटन ही केवळ एक व्यवस्था नसून तो एक संस्कार आहे. एका सामान्य कार्यकर्त्याचा राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंतचा प्रवास हा माझ्यासारख्या कोट्यवधी कार्यकर्त्यांचा सन्मान आहे,\” अशा शब्दांत भाजपचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मावळते अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे आभार

भाजपमध्ये कार्यकर्ता असणे हीच सर्वात मोठी पात्रता – नितीन नबीन Read More »

असंगाशी संग : उबाठाचा फायदा, मनसेचा तोटा; आकडेवारीतून धक्कादायक वास्तव समोर

मुंबई : राजकारणात ‘असंगाशी संग’ केल्याचा परिणाम काय होतो, याचे जिवंत उदाहरण नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या आकडेवारीतून समोर आले आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यास सुरुवात झाली आहे. \”उबाठा (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांच्यातील युतीचा सर्वाधिक फटका राज ठाकरे यांच्या पक्षाला बसला असून, उबाठाने मनसेचा वापर करून आपली मतटक्केवारी वाढवून

असंगाशी संग : उबाठाचा फायदा, मनसेचा तोटा; आकडेवारीतून धक्कादायक वास्तव समोर Read More »

कोण आहेत नितीन नबीन जे बनले जगातील सर्वात मोठ्या पक्षाचे सर्वेसर्वा?

नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे तरुण आणि तडफदार नेते नितीन नबीन यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. दिल्लीतील भाजप मुख्यालयात आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात त्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी आणि मावळते अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत नबीन यांना निवडीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. अशी झाली

कोण आहेत नितीन नबीन जे बनले जगातील सर्वात मोठ्या पक्षाचे सर्वेसर्वा? Read More »

दलितांचे अक्षम्य गुन्हेगार – मुंबईत काँग्रेसला स्वतःच्याच पापांची फळे

मुंबई महानगरपालिकेची ही निवडणूक केवळ सत्तेसाठीची चुरस नव्हती, तर ती राजकीय नीतिमत्ता, सामाजिक प्रतिनिधित्व आणि नेतृत्वाच्या विश्वासार्हतेची मोठी परीक्षा होती. विशेषतः दलित आणि बहुजन समाजाशी काँग्रेसचे नेमके नाते काय, हे या निवडणुकीने आरशासारखे स्वच्छ केले. केवळ युतीचे गणित किंवा संघटनात्मक विस्कळीतपणा एवढेच हे मर्यादित नसून, काँग्रेसच्या प्रदीर्घ राजकारणातील ढोंगीपणा आणि दिशाहीनतेचा हा अटळ परिणाम आहे.

दलितांचे अक्षम्य गुन्हेगार – मुंबईत काँग्रेसला स्वतःच्याच पापांची फळे Read More »

\”आधी सोबत असलेले तरी सांभाळा!\” भाजपचा संजय राऊतांना सणसणीत टोला

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निकालांनंतर महापौरपदावरून राजकीय कलगीतुरा रंगला आहे. \”भाजपचा महापौर होऊ देणार नाही, पुन्हा चमत्कार घडेल,\” या संजय राऊत यांच्या विधानाचा भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी खरपूस समाचार घेतला आहे. \”चार वर्षांपूर्वीही अशाच पोकळ गमजा मारल्या होत्या, तेव्हा भुईखालून आमदार कधी निघून गेले ते कळलंच नाही,\” अशा बोचऱ्या शब्दांत उपाध्ये यांनी राऊतांवर

\”आधी सोबत असलेले तरी सांभाळा!\” भाजपचा संजय राऊतांना सणसणीत टोला Read More »

नगरसेवक हॉटेलवर, मुंबईत पळवापळवीची भीती? फडणवीसांनी एका वाक्यात संपवला सगळा सस्पेन्स

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निकालाने महायुतीला स्पष्ट बहुमत दिले असले, तरी ‘महापौर’ कुणाचा? यावरून राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. नगरसेवकांच्या संभाव्य फोडाफोडीच्या चर्चा आणि शिंदे गटाने आपल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये हलवल्याने मुंबईत खळबळ माजली होती. या सर्व प्रकरणावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मौन सोडले असून, महायुतीमधील स्थैर्यावर शिक्कामोर्तब केले आहे. फोडाफोडीच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांचे उत्तरनिवडणुकीनंतर शिंदे

नगरसेवक हॉटेलवर, मुंबईत पळवापळवीची भीती? फडणवीसांनी एका वाक्यात संपवला सगळा सस्पेन्स Read More »

भाजपला मिळणार नवे राष्ट्रीय अध्यक्ष, नितीन नबीन आज अर्ज दाखल करणार

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला आजपासून अधिकृतपणे सुरुवात होत आहे. पक्षाचे विद्यमान राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन (Nitin Nabin) आज (१९ जानेवारी) अध्यक्षपदासाठी आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचा त्यांना पाठिंबा असल्याने नबीन यांची निवड बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपला मिळणार नवे राष्ट्रीय अध्यक्ष, नितीन नबीन आज अर्ज दाखल करणार Read More »

ठाकरेंचा गड गेला, पण भाजपची ‘शिंदें’नी अडवणूक केली? मुंबईत महापौरपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला?

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निकालाने राज्याच्या राजकारणात नवी समीकरणे जन्माला घातली आहेत. २२७ सदस्यांच्या सभागृहात महायुतीने ११८ जागांनिशी काठावरचं बहुमत (मॅजिक फिगर ११४) गाठलं खरं, पण सत्तास्थापनेचा मार्ग वाटतो तितका सोपा राहिलेला नाही. ८९ जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी सत्ता टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या २९ नगरसेवकांचा पाठिंबा अनिवार्य आहे. यामुळेच आता शिंदे

ठाकरेंचा गड गेला, पण भाजपची ‘शिंदें’नी अडवणूक केली? मुंबईत महापौरपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला? Read More »