News Bharati

सामाजिक न्याय

केंद्राने SC/ST च्या शिक्षणासाठी ७,९८१ कोटीचे  वाटप केले 

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी जाहीर केलेल्या अधिकृत माहितीनुसार, केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) च्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्थानासाठी ₹७,९८१ कोटी रुपयांच्या निधीचे प्रत्यक्ष वाटप केले आहे. तंत्रज्ञान आणि थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणाली या वितरणाचा मुख्य कणा ठरली आहे. सुमारे ७५ लाख […]

केंद्राने SC/ST च्या शिक्षणासाठी ७,९८१ कोटीचे  वाटप केले  Read More »

छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार २०२६

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती आणि ‘सामाजिक न्याय दिना’चे औचित्य साधून येत्या रविवार, दिनांक २८ जून २०२६ रोजी महाड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात \”राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषद २०२६\” चे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत राज्यातील विविध विभागांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांना ‘छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय

छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार २०२६ Read More »

वाटेगावमधील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाचा मार्ग मोकळा

शोषित, कष्टकरी, उपेक्षित आणि दलितांच्या हक्कांसाठी आपल्या लेखणीतून क्रांतीची मशाल पेटवणारे जगप्रसिद्ध साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे त्यांच्या जन्मभूमीत जागतिक दर्जाचे स्मारक व्हावे, ही गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित असलेली मागणी अखेर पूर्ण झाली आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे अण्णाभाऊंच्या भव्य ‘स्मृतिस्थळा’साठी निश्चित करण्यात आलेली ५ एकर जमीन आता अधिकृतपणे राज्य शासनाच्या म्हणजेच सहाय्यक

वाटेगावमधील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाचा मार्ग मोकळा Read More »

आदिवासी ओळख आणि आरक्षणाचा हक्क

धर्मांतर केल्यानंतर आदिवासी बांधवांनी आदिवासी श्रद्धा, रीतीरिवाज, परंपरा आणि सामूहिक जीवन सोडून दिले आहे, त्यांचे अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाचे फायदे बंद करण्याची मागणी हा आता केवळ वादाचा विषय उरलेला नाही. हा प्रश्न संविधान आणि कायदेशीर तरतुदींच्याही पलीकडे जाणारा आहे. भारतातील आरक्षण व्यवस्था कधीही ‘गरिबी निर्मूलन कार्यक्रम’ म्हणून तयार करण्यात आली नव्हती. ती ऐतिहासिकदृष्ट्या मागास राहिलेल्या

आदिवासी ओळख आणि आरक्षणाचा हक्क Read More »

सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला पालघरची घरवापसी

पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे श्री हनुमान जयंतीच्या दिवशी हिंदू धर्मात ‘घरवापसी’चा मोठा कार्यक्रम पार पडला. माहितीनुसार, २५१ आदिवासी (जनजातीय) कुटुंबांनी (अंदाजे १,२०० बंधू-भगिनी) पुन्हा सनातन हिंदू धर्म स्वीकारला. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने बोईसरमधील अवध नगर येथील टीमा हॉल ग्राउंडवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विधीवत पूजन, हवन आणि धार्मिक

सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला पालघरची घरवापसी Read More »

मा. सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय – धर्मांतरानंतर आरक्षण रद्द

धर्मांतर केल्याने अनुसूचित जाती (SC) दर्जा आणि पर्यायाने एट्रोसिटी कायदा किंवा आरक्षणासारखे वैधानिक संरक्षण रद्द होतो असा निर्णय मा. सर्वोच्च न्यायालयाने दि. २४ मार्च २०२६ रोजी दिला. या निर्णयाचा आणि कायदेशीर तरतुदींचा थोडक्यात आढावा घेणारा हा लेख. अनुसूचित जाती आरक्षणाचा पाया – राष्ट्रपतींचा संविधान (अनुसूचित जाती) आदेश, १९५०भारतीय संविधानातील अनुच्छेद ३४१ प्रमाणे पारित राष्ट्रपतींच्या ‘संविधान

मा. सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय – धर्मांतरानंतर आरक्षण रद्द Read More »

दलितांचे अक्षम्य गुन्हेगार – मुंबईत काँग्रेसला स्वतःच्याच पापांची फळे

मुंबई महानगरपालिकेची ही निवडणूक केवळ सत्तेसाठीची चुरस नव्हती, तर ती राजकीय नीतिमत्ता, सामाजिक प्रतिनिधित्व आणि नेतृत्वाच्या विश्वासार्हतेची मोठी परीक्षा होती. विशेषतः दलित आणि बहुजन समाजाशी काँग्रेसचे नेमके नाते काय, हे या निवडणुकीने आरशासारखे स्वच्छ केले. केवळ युतीचे गणित किंवा संघटनात्मक विस्कळीतपणा एवढेच हे मर्यादित नसून, काँग्रेसच्या प्रदीर्घ राजकारणातील ढोंगीपणा आणि दिशाहीनतेचा हा अटळ परिणाम आहे.

दलितांचे अक्षम्य गुन्हेगार – मुंबईत काँग्रेसला स्वतःच्याच पापांची फळे Read More »

लोकशाहीचा सन्मान…महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत संविधान भवन

आगामी काळात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत संविधान भवन (samvidhan Bhavan) उभारण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत केली. विरोधक संविधानाबद्दल सामान्य नागरिकांची दिशाभूल करत आहेत. नागरिकांच्या मनातील हा संभ्रम दूर व्हावा, याकरता संविधान भवनाच्या माध्यमातून वास्तव स्थितीची माहिती करून देण्यात येईल असं रिजिजू म्हणाले. केंद्र आणि राज्य

लोकशाहीचा सन्मान…महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत संविधान भवन Read More »

अमानतुल्ला खान यांना अखेर ईडीकडून अटक

वक्फ बोर्ड घोटाळ्याशी संबंधित कारवाई आम आदमी पार्टीचे ओखला विधानसभेचे आमदार अमानतुल्ला खान यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज, सोमवारी अटक केली आहे. 6 तासांच्या चौकशीनंतर ईडीने खान यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. वक्फ बोर्ड घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. ईडीचे पथक सोमवारी सकाळी आमदार अमानतुल्ला खान यांच्या घरी

अमानतुल्ला खान यांना अखेर ईडीकडून अटक Read More »