हिंद दी चादर : श्री गुरु तेग बहादूर साहेबांच्या ३५० व्या शहीदी दिनानिमित्त राज्यातील ८ शहरांत सांस्कृतिक कार्यक्रम
मुंबई : धर्म, मानवता आणि सहिष्णुतेसाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणारे श्री गुरु तेग बहादूर साहेब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाने विशेष पुढाकार घेतला आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘हिंद-दी-चादर’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन १२ ते २३ मार्च २०२६ दरम्यान राज्यातील आठ प्रमुख शहरांमध्ये करण्यात आले आहे. […]