News Bharati

पुणे

पुणे महापौर पदासाठी भाजपकडून मंजुषा नागपुरे; तर, उपमहापौरपदासाठी आरपीआयचे परशुराम वाडेकर

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाचा सस्पेन्स आता संपला आहे. अपेक्षेप्रमाणे महापौरपदी भाजपच्या मंजुषा नागपुरे तर उपमहापौरपदी आरपीआय (आठवले गट) चे परशुराम वाडेकर यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे. देवेंद्र फडणवीस आणि दिवंगत अजित पवार यांच्यात झालेल्या ‘मैत्रीपूर्ण’ करारानुसार ही निवडणूक बिनविरोध होईल असे वाटत आहे. मंजुषा नागपुरे यांच्या निवडीमुळे सिंहगड रोड परिसराला महापालिकेच्या […]

पुणे महापौर पदासाठी भाजपकडून मंजुषा नागपुरे; तर, उपमहापौरपदासाठी आरपीआयचे परशुराम वाडेकर Read More »

बारामतीत अजितदादांच्या अंत्यदर्शनासाठी जनसागर; उद्या शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला आहे. बारामतीमध्ये अजित पवार यांच्या समर्थकांची मोठी गर्दी उसळली असून, प्रशासनाने अंत्यदर्शनासाठी आणि अंत्यसंस्कारासाठी सविस्तर नियोजन केले आहे. अजितदादांचे पार्थिव आज सायंकाळी ४ वाजल्यापासून विद्याप्रतिष्ठान विद्यानगरी चौक येथील मैदानात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. रात्री उशिरापर्यंत नागरिकांना आपल्या लाडक्या नेत्याचे अंतिम दर्शन घेता

बारामतीत अजितदादांच्या अंत्यदर्शनासाठी जनसागर; उद्या शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार Read More »

शिरूरमध्ये २ कोटींचे ड्रग्ज जप्त

शादाब रियाज शेख जेरबंद : १ किलोचा मुद्देमाल पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरात बाबुरावनगर परिसरातून पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांच्या संयुक्त पथकाने पेट्रोलिंग दरम्यान १ किलो ५२ ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन) जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजार भावानुसार याची किंमत २ कोटी १० लाख ४० हजार रुपये इतकी आहे. शादाब रियाज शेख (वय ४१, रा. शिरूर),

शिरूरमध्ये २ कोटींचे ड्रग्ज जप्त Read More »

पवार ब्रँडची पीछेहाट! पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील बालेकिल्ल्यांत राष्ट्रवादीची ‘तुतारी’ आणि ‘घड्याळ’ शांत

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले असून, या निकालांनी राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. भारतीय जनता पक्षाने (BJP) पुन्हा एकदा ‘न भूतो न भविष्यती’ अशी झेप घेत २९ पैकी तब्बल २६ महानगरपालिकांमध्ये सत्ता मिळवण्याकडे वाटचाल केली आहे. मात्र, दुसरीकडे राज्याच्या राजकारणातील सर्वात प्रभावी मानल्या जाणाऱ्या पवार कुटुंबाला मतदारांनी मोठा

पवार ब्रँडची पीछेहाट! पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील बालेकिल्ल्यांत राष्ट्रवादीची ‘तुतारी’ आणि ‘घड्याळ’ शांत Read More »

विरोधकांच्या आरोपांना जनतेची चपराक; भाजपच्या ‘महाविजया’नंतर आमदार महेश लांडगे यांची पहिली प्रतिक्रिया

पिंपरी-चिंचवड : बहुचर्चित पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (BJP) अभूतपूर्व यश मिळवत पुन्हा एकदा सत्तेचे कमळ फुलवले आहे. विशेष म्हणजे, एकेकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अभेद्य बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट आणि शरद पवार गट) भाजपने मोठा धक्का दिला आहे. १२८ पैकी तब्बल ८४ जागांवर विजय मिळवून भाजपने स्पष्ट

विरोधकांच्या आरोपांना जनतेची चपराक; भाजपच्या ‘महाविजया’नंतर आमदार महेश लांडगे यांची पहिली प्रतिक्रिया Read More »

पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची महामुसंडी; अजित पवारांच्या ‘मोफत मेट्रो-बस’ कार्डला मतदारांनी नाकारले!

पुणे/पिंपरी : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मतमोजणीत भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व मिळवले असून, राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) मोठा राजकीय धक्का बसला आहे. पुण्यात ‘कमळ’ वेगाने फुलताना दिसत असून, अजित पवारांच्या अनेक महत्त्वाकांक्षी घोषणांचा मतदारांवर प्रभाव पडला नसल्याचे निकालाच्या प्राथमिक कलांवरून स्पष्ट झाले आहे. पुणे महानगरपालिकेत भाजपने सुरुवातीपासूनच मोठी आघाडी घेतली आहे. सद्यस्थितीत भाजप

पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची महामुसंडी; अजित पवारांच्या ‘मोफत मेट्रो-बस’ कार्डला मतदारांनी नाकारले! Read More »

मुंबईचा ‘महापौर’ कोणाचा? २९ महानगरपालिकांच्या महासंग्रामाचा आज निकाल; मतमोजणीला सुरुवात

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई, ठाण्यासह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा आज निकाल जाहीर होत आहे. १५ जानेवारी रोजी पार पडलेल्या मतदानानंतर आज, १६ जानेवारी रोजी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली असून, काही क्षणांतच अधिकृत कौल हाती येणार आहे. मुंबई महापालिकेत ‘काटे की टक्कर’मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसाठी अत्यंत चुरशीने मतदान झाले. या निवडणुकीत

मुंबईचा ‘महापौर’ कोणाचा? २९ महानगरपालिकांच्या महासंग्रामाचा आज निकाल; मतमोजणीला सुरुवात Read More »

देवाभाऊ म्हणाले, ‘‘लाडकी बहीण योजना कोणीही बंद करू शकणार नाही”

‘‘विरोधक लाडकी बहीण योजना बंद होईल असा अपप्रचार करत आहेत, पण जोपर्यंत तुमचा हा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत ही योजना कोणीही बंद करू शकणार नाही,”   अशा स्पष्ट शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावले. पुणे महापालिका निवडणुकीच्या ‘विजय संकल्प’ सांगता प्रचार सभेत ते बोलत होते. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्या मंत्रीमंडळातील चंद्रकांत पाटील, आमदार सिद्धार्थ शिरोळे,

देवाभाऊ म्हणाले, ‘‘लाडकी बहीण योजना कोणीही बंद करू शकणार नाही” Read More »

मतदार ओळखपत्र नाही? टेन्शन सोडा! ‘या’ कागदपत्रांच्या आधारे करा मतदान

मुंबई : महाराष्ट्रातील २९ पैकी २८ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. आपल्याकडे मतदार ओळखपत्र (Voter ID) नाही किंवा ते हरवले आहे, या चिंतेत अनेक नागरिक असतात. मात्र, निवडणूक आयोगाने अशा मतदारांसाठी मोठी सवलत दिली आहे. तुमचे नाव मतदार यादीत असेल, तर तुम्ही ओळखपत्राशिवायही आपला मतदानाचा हक्क बजावू शकता. यादीत

मतदार ओळखपत्र नाही? टेन्शन सोडा! ‘या’ कागदपत्रांच्या आधारे करा मतदान Read More »

वीस लाख प्रवाशांना रोज मिळणार पीएमपीची सेवा

पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाकांक्षी विस्तार करण्याची योजना हाती घेण्यात आली असून एप्रिल-मे २०२६ पर्यंत सुमारे २,५०० नव्या गाड्या पीएमपीच्या ताफ्यात दाखल केल्या जातील, असे आश्वासन पुण्याचे खासदार आणि केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिले आहे. या विस्तारामुळे पीएमपीएमचा ताफा ४,००० गाड्यांचा होईल तसेच दररोज १८ ते २० लाख प्रवाशांना सुरक्षित, सुलभ, जलद

वीस लाख प्रवाशांना रोज मिळणार पीएमपीची सेवा Read More »