News Bharati

बातम्या

अमरावती : १०० जागांचे वैद्यकीय महाविद्यालय आणि ४३० खाटांच्या रुग्णालयासाठी जागेचा प्रश्न मार्गी

अमरावती : जिल्ह्याच्या आरोग्य आणि शैक्षणिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा (GMC) प्रश्न आता सुटला आहे. अमरावती येथील बहुप्रतीक्षित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी अखेर जागा प्रदान करण्यात आली आहे. या निर्णयाबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. आलियाबादची ११.२९ हेक्टर जागा सुपूर्दअमरावती जिल्ह्यातील आलियाबाद येथील सर्व्हे […]

अमरावती : १०० जागांचे वैद्यकीय महाविद्यालय आणि ४३० खाटांच्या रुग्णालयासाठी जागेचा प्रश्न मार्गी Read More »

स्वामी सत्यमित्रानंद गिरींचे समाधी मंदिर भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हरिद्वार (उत्तराखंड) : श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी यांनी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक म्हणून कार्य केले. म्हणूनच आज नव्या पिढीसमोर भारतीय संस्कृतीची महानता टिकून आहे. त्यांच्या समाधी मंदिरामुळे भावी पिढ्यांसाठी एका प्रेरणास्थळ निर्माण झाल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. उत्तराखंड–हरिद्वार येथे श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरीजी महाराज यांच्या समाधी मंदिरात आयोजित ‘श्रीविग्रह मूर्ती स्थापना’ समारंभात

स्वामी सत्यमित्रानंद गिरींचे समाधी मंदिर भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

मणिपूरला मिळाले नवे नेतृत्व! भाजपचे युमनाम खेमचंद सिंह राज्याचे नवीन मुख्यमंत्री

मणिपूर : ईशान्येकडील मणिपूर राज्याला अखेर नवीन नेतृत्व मिळाले आहे. राज्यातील राष्ट्रपती राजवट अधिकृतपणे उठवण्यात आली असून, भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते युमनाम खेमचंद सिंह यांनी आज मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राजधानी इंफाळमधील ‘लोक भवन’ येथे पार पडलेल्या एका विशेष सोहळ्यात राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी त्यांना शपथ दिली.

मणिपूरला मिळाले नवे नेतृत्व! भाजपचे युमनाम खेमचंद सिंह राज्याचे नवीन मुख्यमंत्री Read More »

नाशिक महाकुंभ २०२६ : आखाड्यांमधील विकासकामांचा श्रीगणेशा; साधू-संतांच्या सुविधांसाठी शासन कटिबद्ध – गिरीश महाजन

त्र्यंबकेश्वर : आगामी ‘नाशिक-त्र्यंबकेश्वर महाकुंभ २०२६’ च्या तयारीने आता वेग घेतला आहे. या जागतिक दर्जाच्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, त्र्यंबकेश्वर येथील विविध आखाड्यांमध्ये करण्यात येणाऱ्या विकासकामांचे भूमिपूजन आणि शुभारंभ मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. महाकुंभासाठी येणाऱ्या लाखो साधू-महंतांना उत्तम सोयी-सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी बोलताना गिरीश

नाशिक महाकुंभ २०२६ : आखाड्यांमधील विकासकामांचा श्रीगणेशा; साधू-संतांच्या सुविधांसाठी शासन कटिबद्ध – गिरीश महाजन Read More »

मुंबईच्या महापौरपदाचा मुहूर्त ठरला! ११ फेब्रुवारीला होणार निवड; ८९ जागांसह भाजपचा दावा प्रबळ

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आता सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या महापौरपदाच्या निवडणुकीचा मुहूर्त अखेर ठरला आहे. येत्या ११ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईला ७८ वा महापौर मिळणार आहे. विशेष म्हणजे, यंदा हे पद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित असल्याने देशाच्या आर्थिक राजधानीचे नेतृत्व पुन्हा एकदा एका महिला नेत्याकडे जाणार आहे. निवडणुकीचे वेळापत्रक आणि प्रक्रियामहापालिका आयुक्त भूषण गगराणी

मुंबईच्या महापौरपदाचा मुहूर्त ठरला! ११ फेब्रुवारीला होणार निवड; ८९ जागांसह भाजपचा दावा प्रबळ Read More »

भविष्यातील पुणे शहराची गरज लक्षात घेऊन पुरंदर विमानतळाची निर्मिती करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : वेगाने होत असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकासामुळे पुणे शहर व परिसर गुंतवणुकीचे आकर्षण बनले आहे. त्यामुळे पुणे शहर व परिसरात औद्योगिकरण वाढत आहे. नागरीकरणाचा वेगही गतिमान आहे, अशा परिस्थितीत भविष्यातील पुणे शहराची गरज लक्षात घेऊन पुरंदर विमानतळाची निर्मिती करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विमानतळासाठी भूसंपादन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कालमर्यादेत

भविष्यातील पुणे शहराची गरज लक्षात घेऊन पुरंदर विमानतळाची निर्मिती करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला ऐतिहासिक निधी; ‘शी-मार्ट्स’ आणि स्वस्त आरोग्य सुविधांनी राज्याचा कायापालट होणार

मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये महाराष्ट्राला भरीव व विक्रमी निधी मंजूर करण्यात आल्याने राज्याच्या सामाजिक व आर्थिक विकासाला नवे बळ मिळाले असून महिला सक्षमीकरण, सार्वजनिक आरोग्य, पायाभूत सुविधा, ऊर्जा आणि रोजगारनिर्मिती या सर्व क्षेत्रांत परिवर्तनकारी बदल घडणार असल्याचे ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम व सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले. केंद्रीय अर्थसंकल्पात

केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला ऐतिहासिक निधी; ‘शी-मार्ट्स’ आणि स्वस्त आरोग्य सुविधांनी राज्याचा कायापालट होणार Read More »

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज भरण्यास १३ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ; २६ एप्रिल रोजी होणार परीक्षा

मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षांसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थी आणि शाळांना १३ फेब्रुवारी २०२६ पर्यंत ऑनलाईन आवेदनपत्रे भरता येणार आहेत. परीक्षेचे आयोजन २६ एप्रिल २०२६ रोजी राज्यभर एकाच दिवशी करण्यात आले आहे. सुधारित मुदतवाढ आणि शुल्काचा तपशील:परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज भरण्यास १३ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ; २६ एप्रिल रोजी होणार परीक्षा Read More »

हरित महाराष्ट्राचा महासंकल्प! २०२६ ते २०३१ दरम्यान ३०० कोटी वृक्ष लागवडीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई : पर्यावरण संवर्धन, हवामान बदलाशी लढा आणि ग्रामीण रोजगार निर्मिती या त्रिसूत्रीवर महाराष्ट्रातील हरित क्षेत्र वाढविण्यासाठी २०२६ ते २०३१ या कालावधीत ३०० कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घ्यावा. वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात या क्षेत्रातील तज्ज्ञ, स्वयंसेवी संस्था याच्याबरोबरच स्टार्टअपचा सहभाग घ्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. प्रस्तावित हरित प्राधिकरण-३०० कोटी वृक्ष लागवड मिशन

हरित महाराष्ट्राचा महासंकल्प! २०२६ ते २०३१ दरम्यान ३०० कोटी वृक्ष लागवडीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश Read More »

गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नाशिकच्या महापौर-उपमहापौर उमेदवारांची घोषणा

नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या आगामी महापौर आणि उपमहापौर निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपली रणनीती स्पष्ट केली आहे. भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या बैठकीत महापौरपदासाठी हिमगौरी आहेर-आडके आणि उपमहापौरपदासाठी मच्छिंद्र सानप यांच्या उमेदवारीवर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली. भाजपच्या बैठकीत एकमताने निर्णयनाशिकमधील भाजपच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांची महत्त्वपूर्ण

गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नाशिकच्या महापौर-उपमहापौर उमेदवारांची घोषणा Read More »