News Bharati

राष्ट्रवादी काँग्रेस

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन

Ajit Pawar Plane Crash : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (एनसीपी) ज्येष्ठ नेते अजित पवार (६६) यांचे आज सकाळी बारामती येथे खासगी विमानाच्या भीषण अपघातात निधन झाले. या दुर्दैवी दुर्घटनेत विमानातील अन्य ४ जणांचा मृत्यू झाला आहे. माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईहून बारामतीकडे खासगी विमानाने रवाना झाले होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या […]

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन Read More »

तुमच्या शहराचा महापौर कोणत्या प्रवर्गाचा? २२ जानेवारीला निघणार २९ महापालिकांची आरक्षण सोडत

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा धुरळा शांत झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष महापौरपदाच्या खुर्चीकडे लागले आहे. नगरविकास विभागाने यासंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली असून, २२ जानेवारी २०२६ रोजी मंत्रालयात महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे. या सोडतीनंतरच कोणत्या शहराला कोणत्या प्रवर्गाचा महापौर मिळणार, हे स्पष्ट होईल. मंत्रालयात होणार फैसलानगरविकास विभागाने जारी केलेल्या पत्रकानुसार, गुरुवारी (२२ जानेवारी)

तुमच्या शहराचा महापौर कोणत्या प्रवर्गाचा? २२ जानेवारीला निघणार २९ महापालिकांची आरक्षण सोडत Read More »

महापालिकेत झटका, आता जिल्हा परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादींचे ‘मिशन एकत्र’

बारामती : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या मोठ्या विजयानंतर आता राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत. मुंबई, पुणे, ठाणे आणि पिंपरी-चिंचवडसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार व अजित पवार गट) मोठा धक्का बसला आहे. या पराभवातून सावरण्यासाठी आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये एकत्र येण्याच्या तयारीत

महापालिकेत झटका, आता जिल्हा परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादींचे ‘मिशन एकत्र’ Read More »

पवार ब्रँडची पीछेहाट! पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील बालेकिल्ल्यांत राष्ट्रवादीची ‘तुतारी’ आणि ‘घड्याळ’ शांत

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले असून, या निकालांनी राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. भारतीय जनता पक्षाने (BJP) पुन्हा एकदा ‘न भूतो न भविष्यती’ अशी झेप घेत २९ पैकी तब्बल २६ महानगरपालिकांमध्ये सत्ता मिळवण्याकडे वाटचाल केली आहे. मात्र, दुसरीकडे राज्याच्या राजकारणातील सर्वात प्रभावी मानल्या जाणाऱ्या पवार कुटुंबाला मतदारांनी मोठा

पवार ब्रँडची पीछेहाट! पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील बालेकिल्ल्यांत राष्ट्रवादीची ‘तुतारी’ आणि ‘घड्याळ’ शांत Read More »

अहिल्यानगरमध्ये विखे-जगताप जोडीचा ‘करिश्मा’! महापालिकेत महायुतीला स्पष्ट बहुमत; विखे पाटलांच्या बंगल्यावर जल्लोष

अहिल्यानगर : अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महायुतीने ऐतिहासिक कामगिरी करत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मार्गदर्शन आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्या नियोजनामुळे महायुतीने विरोधकांचा सुपडा साफ केला आहे. या विजयानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी गुलालाची

अहिल्यानगरमध्ये विखे-जगताप जोडीचा ‘करिश्मा’! महापालिकेत महायुतीला स्पष्ट बहुमत; विखे पाटलांच्या बंगल्यावर जल्लोष Read More »

पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची महामुसंडी; अजित पवारांच्या ‘मोफत मेट्रो-बस’ कार्डला मतदारांनी नाकारले!

पुणे/पिंपरी : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मतमोजणीत भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व मिळवले असून, राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) मोठा राजकीय धक्का बसला आहे. पुण्यात ‘कमळ’ वेगाने फुलताना दिसत असून, अजित पवारांच्या अनेक महत्त्वाकांक्षी घोषणांचा मतदारांवर प्रभाव पडला नसल्याचे निकालाच्या प्राथमिक कलांवरून स्पष्ट झाले आहे. पुणे महानगरपालिकेत भाजपने सुरुवातीपासूनच मोठी आघाडी घेतली आहे. सद्यस्थितीत भाजप

पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची महामुसंडी; अजित पवारांच्या ‘मोफत मेट्रो-बस’ कार्डला मतदारांनी नाकारले! Read More »

मान ना मान मैं तेरा मेहमान, मैं और मेरा आजोबा महान!

परवा शुक्रवार, २ जानेवारी २०२६ रोजी मुंबईतून एक बातमी आली, मुंबईच्या दादर येथील शिवसेना भवनात अमित ठाकरे पहिल्यांदाच दाखल झाले. अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांना निवडणुकीतील मुद्यांबाबत मार्गदर्शन केलं अशी ती बातमी होती. अमित ठाकरे शिवसेना भवनात पहिल्यांदाच दाखल

मान ना मान मैं तेरा मेहमान, मैं और मेरा आजोबा महान! Read More »

शरद पवार गटाच्या खासदाराने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असताना आणि अनेक नेते पक्षांतर करत असताना आता एका नव्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शरद पवार गटाचे वर्धा मतदारसंघातील खासदार अमर काळे (Amar kale) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. ही

शरद पवार गटाच्या खासदाराने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण Read More »

राज्यसभेच्या तालिका अध्यक्षपदी सुनेत्रा पवार! पहिल्याच टर्ममध्ये मोठी जबाबदारी

महाराष्ट्र : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी तथा राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार (MP Sunetra Pawar) यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी त्यांना राज्यसभेत पाठवले होते. पहिल्याच कार्यकाळात त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तालिका अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित

राज्यसभेच्या तालिका अध्यक्षपदी सुनेत्रा पवार! पहिल्याच टर्ममध्ये मोठी जबाबदारी Read More »

…तर लगेच राजीनामा देणार! धनंजय मुंडेंची स्पष्ट भूमिका

बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. या हत्याकांडात वाल्मिक कराडसह आठ जणांना अटक करण्यात आली असून, कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. वाल्मिक कराड हे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय असल्याने

…तर लगेच राजीनामा देणार! धनंजय मुंडेंची स्पष्ट भूमिका Read More »