बांगलादेशी हिंदूंची केविलवाणी अवस्था: त्यांचे रक्षण करणे भारताची नैतिक जबाबदारी या विषयावर राष्ट्रीय पातळीवर व्यापक चर्चा होण्याची गरज
बांगलादेशातील हिंदू समुदायांविरुद्ध झालेल्या नरसंहाराप्रकरणी त्वरित कारवाई करण्याचीविनंती यूकेमधील (153 Hindu Organisations) १५३ हिंदू संघटनांनी मिळून केली आहे. याबाबतचे एक पत्र त्यांनी नुकतेच युनायटेड किंगडमचे परराष्ट्र सचिव आरटी. डेव्हिड लॅमी यांना दिले. बांगलादेशातील राजकीय उलथापालथ आणि पंतप्रधान शेख हसीना यांची ५ ऑगस्ट रोजी हकालपट्टी झाल्यानंतर बांगलादेशातील हिंदू घरे, मंदिरे आणि व्यवसायांवर पद्धतशीर आणि क्रूर हल्ल्यांची […]