News Bharati

बातम्या

‘बटेंगे तो कटेंगे’वर आरडाओरडा, पण जिहादवर मौन?

‘बटेंगे तो कटेंगे’वर आरडाओरडा, पण जिहादवर मौन? मौलाना मदनींच्या ‘जिहाद’ आवाहनावरून भाजपचा विरोधकांवर हल्ला मुंबई : मौलाना महमूद मदनी यांनी भोपाळमध्ये केलेल्या ‘जब जब जुल्म होगा, तब तब जिहाद होगा’ या विधानावरून महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी विरोधी पक्षांवर सडकून टीका केली आहे. मदनी यांचे भाषण सामाजिक शांततेला थेट आव्हान देणारे असल्याचे त्यांनी […]

‘बटेंगे तो कटेंगे’वर आरडाओरडा, पण जिहादवर मौन? Read More »

कोंढवा थेट मेट्रोने पुणे शहराशी जोडणार!

शिवाजीनगर-येवलेवाडी मार्गाला मान्यता; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा पुणे : कात्रज-कोंढवा मार्गाचे काम लवकरात पूर्ण करण्यात येईल, मेट्रोच्या माध्यमातून कोंढव्याचा भाग इतर भागाशी जोडण्यात येईल. शिवाजी नगर ते येवलेवाडी मेट्रोमार्गाला मान्यता, स्वारगेट ते कात्रज मेट्रोमार्ग कोंढव्यापर्यंत आणणे आणि पुरंदर विमानतळाशी जोडणारी प्रस्तावित मेट्रोच्या माध्यमातून या भागाला जोडण्यात येईल,असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

कोंढवा थेट मेट्रोने पुणे शहराशी जोडणार! Read More »

‘हरित कुंभ’चा शुभारंभ; नाशिकमध्ये १५ हजार वृक्षारोपणाची तयारी; गोदावरी शुद्धीकरणासाठी १५०० कोटी

नाशिक : नाशिक हे पौराणिक काळापासून सांस्कृतिक वारसा लाभलेले शहर आहे. दर बारा वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकची महती जागतिक पातळीवर अधोरेखित झाली आहे. नाशिकचा हा वारसा जपण्यास आगामी काळात स्वच्छ, सुंदर, सुरक्षित व हरित कुंभमेळासाठी सर्वांचेच योगदान आवश्यक आहे, असे प्रतिपादन कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केले. महाकवी कालिदास कलामंदिर येथे सिंहस्थ कुंभमेळा 2027

‘हरित कुंभ’चा शुभारंभ; नाशिकमध्ये १५ हजार वृक्षारोपणाची तयारी; गोदावरी शुद्धीकरणासाठी १५०० कोटी Read More »

मुंबई, पुण्यासह २९ महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर, आचारसंहिता आजपासून लागू

१५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला मतमोजणी होणार बृह्नमुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका यासारख्या एकूण २९ महानगरपालिकांच्या निवडणूका १५ जानेवारी २०२६ या दिवशी पार पडतील. १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. निवडणूकांसाठी अर्ज भरायची तारीख २३ ते ३० डिसेंबर २०२५. अर्ज पडताळणी ३१ डिसेंबर २०२५ या दिवशी आणि अर्ज मागे घेण्याची तारीख २ जानेवारी २०२६ ही असणार आहे.

मुंबई, पुण्यासह २९ महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर, आचारसंहिता आजपासून लागू Read More »

धायरीत ‘राजदंडधारी’ शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भव्य अनावरण

पुणे/धायरी : धायरी गावातील पवळी चौक, काळभैरवनाथ मंदिर परिसर शिवमय झाला होता. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते राजदंडधारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण भव्य जल्लोषात पार पडले. ढोल-ताशांचा गजर, शिवघोष आणि फटाक्यांची आतषबाजी यामुळे संपूर्ण परिसर भगव्या उत्साहाने भारावून गेला होता. या अनावरण सोहळ्याला महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर आणि आमदार

धायरीत ‘राजदंडधारी’ शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भव्य अनावरण Read More »

राज्यातील जनतेने कुठलाही संभ्रम ठेवू नये! \”मुंबई महाराष्ट्रापासून कधीही वेगळी होणार नाही;\” देवेंद्र फडणविसांचे विधान

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती सरकारच्या एका वर्षाच्या कार्यकाळात विविध आव्हानांचा समर्थपणे सामना केल्याचे ठामपणे सांगितले. सरकारमधील तिन्ही प्रमुख नेते एकत्रितपणे निर्णय घेत असून, त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न शासन करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री म्हणाले, \”वर्षानुवर्षे निवडणुका न झाल्याने स्थानिक स्तरावरील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. मात्र, आता

राज्यातील जनतेने कुठलाही संभ्रम ठेवू नये! \”मुंबई महाराष्ट्रापासून कधीही वेगळी होणार नाही;\” देवेंद्र फडणविसांचे विधान Read More »

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्मृती मंदिराला भेट

नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) रेशीमबाग येथील स्मृती मंदिर येथे भेट दिली. यावेळी दोन्ही नेत्यांनी आद्य सरसंघचालक परमपूज्य डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक परमपूज्य माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेऊन त्यांना विनम्र अभिवादन केले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्मृती मंदिराला भेट Read More »

सहकाराने मच्छिमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणार – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

नागपूर : सहकाराच्या माध्यमातून खरेदी-विक्री, साठवणूक, प्रक्रिया आणि विपणन व्यवस्था अधिक बळकट करून मच्छिमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा शासनाचा सातत्यपूर्ण प्रयत्न असल्याचे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केले. राज्यातील मच्छिमार समाजाच्या आर्थिक, सामाजिक व व्यावसायिक उन्नतीसाठी शासनाने राबविलेल्या विविध लोकाभिमुख योजना, धोरणात्मक निर्णय तसेच दिलेल्या सातत्यपूर्ण पाठबळाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या

सहकाराने मच्छिमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणार – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे Read More »

‘मेस्सीपेक्षा गुणवान खेळाडू भारतात; मेस्सीने यांना भेटावे!’ भाजपचा राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवारांवर निशाणा!

महाराष्ट्र : जगातील महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या भारत भेटीच्या चर्चेदरम्यान, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी भारतीय राजकारणातील ‘जागतिक दर्जाच्या’ खेळाडूंवर मिश्किल शब्दांत टीकास्त्र सोडले आहे. मेस्सीने या ‘गुणवान’ खेळाडूंना भेटायला हवे, असे उपरोधिक विधान त्यांनी केले आहे. आत्मघाती ‘सेल्फगोल’ स्पेशालिस्ट: राहुल गांधी उपाध्ये यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ‘सेल्फगोल’ स्पेशालिस्ट खेळाडू म्हटले आहे.

‘मेस्सीपेक्षा गुणवान खेळाडू भारतात; मेस्सीने यांना भेटावे!’ भाजपचा राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवारांवर निशाणा! Read More »

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरले ‘डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार २०२५’चे मानकरी 

अमरावती : श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे दिला जाणारा या वर्षीचा प्रतिष्ठित ‘डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार २०२५’ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक कार्याची दखल घेत संस्थेने हा मोठा सन्मान त्यांना दिला आहे. पुरस्काराचे स्वरूप रु. पाच लक्ष रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे आहे. भव्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरले ‘डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार २०२५’चे मानकरी  Read More »