News Bharati

बातम्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ‘युनेस्को’च्या मुख्यालयात उभारणे ही गौरवाची बाब – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात उभारणे ही गौरवाची, ऐतिहासिक आणि जागतिक स्तरावर महत्त्वाची घटना आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार, सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि मानवाधिकारांचे जागतिक प्रवक्ते म्हणून त्यांची ओळख आहे. शिक्षण हे यशाकडे नेणारे साधन आहे हा बाबासाहेबांचा संदेश जगभर पोहोचविण्याच्या उदात्त हेतूने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोला भेटस्वरूपात […]

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ‘युनेस्को’च्या मुख्यालयात उभारणे ही गौरवाची बाब – मुख्यमंत्री फडणवीस Read More »

BMC Election : ‘मनधरणी सुरू आहे की पायधरणी?’

मुंबई : शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आणि शिंदे गटावर केलेल्या ‘टेस्ट ट्यूब बेबी’ या टीकेला भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी आपल्या खास शैलीत राऊतांचा समाचार घेताना, त्यांच्या शिवतीर्थावरील वाऱ्यांवरून निशाणा साधला आहे. ‘मनधरणी सुरू आहे की पायधरणी?’ संजय राऊत यांच्या विधानांना फारसे

BMC Election : ‘मनधरणी सुरू आहे की पायधरणी?’ Read More »

गुटखा माफियांवर आता ‘मकोका’!

मुंबई : राज्यात गुटखा बंदी असूनही शाळा आणि महाविद्यालय परिसरात सर्रास गुटख्याची विक्री होत असल्याच्या तक्रारींची दखल घेत राज्य सरकारने अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. आता गुटखा उत्पादन आणि विक्री करणाऱ्यांवर थेट ‘मकोका’ (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आगामी नवीन वर्षात या कायद्याची अंमलबजावणी सुरू होईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन

गुटखा माफियांवर आता ‘मकोका’! Read More »

मत्स्यव्यवसाय आणि हाय-टेक उद्योगांना मिळणार बळ; डच शिष्टमंडळाची मुख्यमंत्री फडणवीसांशी महत्त्वपूर्ण चर्चा

मुंबई : महाराष्ट्रातील औद्योगिक विकास, व्यापार आणि पायाभूत सुविधांना जागतिक स्तरावर नेण्यासाठी राज्य सरकारकडून वेगाने हालचाली सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नेदरलँड्सचे परराष्ट्र मंत्री डेव्हिड वील यांनी मुंबईत भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी झालेल्या या बैठकीत दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर आणि महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांमध्ये उपलब्ध असलेल्या संधींबद्दल

मत्स्यव्यवसाय आणि हाय-टेक उद्योगांना मिळणार बळ; डच शिष्टमंडळाची मुख्यमंत्री फडणवीसांशी महत्त्वपूर्ण चर्चा Read More »

औसा विधानसभा मतदारसंघातील उबाठा गट, मनसे पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये प्रवेश

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत औसा विधानसभा मतदारसंघातील उबाठा गट आणि मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी बुधवारी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी आ. अभिमन्यू पवार, जिल्हा सरचिटणीस सुभाष जाधव, विधानसभा प्रमुख सुभाष गुप्ता, रवी चिल्मे, भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.   यावेळी चव्हाण

औसा विधानसभा मतदारसंघातील उबाठा गट, मनसे पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये प्रवेश Read More »

‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची प्रखर टीका  उबाठा गट आणि मनसे या दोन पक्षांचे जागा वाटप अंतिम टप्प्यात आले आहे अशा वल्गना खा. संजय राऊत यांनी करणे हे हास्यास्पद आहे. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये सूज्ञ मतदार या दोन पक्षांचा टप्प्याटप्प्याने करेक्ट कार्यक्रम करतील, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी बुधवारी

‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न Read More »

IND vs SA चौथ्या टी-२० चा रणसंग्राम : टीम इंडिया मालिका खिशात घालणार की आफ्रिकेचा ‘पलटवार’ होणार?

IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील रोमांचक टप्पा आता लखनौमध्ये येऊन पोहोचला आहे. आज (ता. १७) मालिकेतील चौथा सामना लखनौच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर सायंकाळी ७ वाजता खेळवला जाणार आहे. भारताला मालिका विजयाची संधीभारतीय संघाने सध्या मालिकेत २-१ अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे. आजचा सामना

IND vs SA चौथ्या टी-२० चा रणसंग्राम : टीम इंडिया मालिका खिशात घालणार की आफ्रिकेचा ‘पलटवार’ होणार? Read More »

काँग्रेस नेत्याचे अत्यंत वादग्रस्त वक्तव्य; \”ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्याच दिवशी भारताचा पराभव झाला होता\”

महाराष्ट्र : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी १९ डिसेंबरच्या आसपास भारताचा पंतप्रधान बदलणार असून, नवे पंतप्रधानपद मराठी माणसाला मिळेल अशी भविष्यवाणी केली होती. पृथ्वीराज चव्हाण यांच्या ‘भविष्यवाणी’वर भाजप नेत्यांनी जोरदार टीका केली होती. आता पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशीच आपला पूर्णपणे पराभव झाला

काँग्रेस नेत्याचे अत्यंत वादग्रस्त वक्तव्य; \”ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्याच दिवशी भारताचा पराभव झाला होता\” Read More »

२९ महापालिकांवर महायुतीचाच झेंडा फडकणार; भाजपचा मोठा दावा

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांचे मैदान महायुतीने विकासकामांच्या बळावर आधीच जिंकले असून, मुंबईचा विकास करण्याची क्षमता फक्त महायुतीकडेच आहे, असा विश्वास मतदारांमध्ये निर्माण झाला असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी मंगळवारी केले. भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नवनाथ बन म्हणाले की, मतदारांनी महायुतीचा साडेतीन वर्षांचा विकासाचा

२९ महापालिकांवर महायुतीचाच झेंडा फडकणार; भाजपचा मोठा दावा Read More »

‘मुंबई कोणाची?’ ठाकरे बंधूंच्या ‘अहंकारा’विरुद्ध फडणवीस यांच्या ‘विकास’निष्ठ नेतृत्वाची टक्कर

मुंबई : मुंबई, पुणेसह राज्यातील एकूण २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान पार पडेल, तर दुसऱ्याच दिवशी १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजपने ठाकरे बंधूंना चांगलेच घेरण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आक्रमक भूमिका घेत, ही लढाई केवळ सत्तेची नसून,

‘मुंबई कोणाची?’ ठाकरे बंधूंच्या ‘अहंकारा’विरुद्ध फडणवीस यांच्या ‘विकास’निष्ठ नेतृत्वाची टक्कर Read More »