News Bharati

बातम्या

भाजपमध्ये कार्यकर्ता असणे हीच सर्वात मोठी पात्रता – नितीन नबीन

नवी दिल्ली : \”भारतीय जनता पार्टीमध्ये संघटन ही केवळ एक व्यवस्था नसून तो एक संस्कार आहे. एका सामान्य कार्यकर्त्याचा राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंतचा प्रवास हा माझ्यासारख्या कोट्यवधी कार्यकर्त्यांचा सन्मान आहे,\” अशा शब्दांत भाजपचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मावळते अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे आभार […]

भाजपमध्ये कार्यकर्ता असणे हीच सर्वात मोठी पात्रता – नितीन नबीन Read More »

असंगाशी संग : उबाठाचा फायदा, मनसेचा तोटा; आकडेवारीतून धक्कादायक वास्तव समोर

मुंबई : राजकारणात ‘असंगाशी संग’ केल्याचा परिणाम काय होतो, याचे जिवंत उदाहरण नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या आकडेवारीतून समोर आले आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यास सुरुवात झाली आहे. \”उबाठा (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांच्यातील युतीचा सर्वाधिक फटका राज ठाकरे यांच्या पक्षाला बसला असून, उबाठाने मनसेचा वापर करून आपली मतटक्केवारी वाढवून

असंगाशी संग : उबाठाचा फायदा, मनसेचा तोटा; आकडेवारीतून धक्कादायक वास्तव समोर Read More »

कोण आहेत नितीन नबीन जे बनले जगातील सर्वात मोठ्या पक्षाचे सर्वेसर्वा?

नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे तरुण आणि तडफदार नेते नितीन नबीन यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. दिल्लीतील भाजप मुख्यालयात आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात त्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी आणि मावळते अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत नबीन यांना निवडीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. अशी झाली

कोण आहेत नितीन नबीन जे बनले जगातील सर्वात मोठ्या पक्षाचे सर्वेसर्वा? Read More »

नांदेड : ‘हिंद दी चादर’ सोहळ्याला अमित शाह, योगी आदित्यनाथ आणि धीरेंद्र शास्त्रींची उपस्थिती!

नवी दिल्ली/नांदेड : मानवतेचे रक्षक श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या महान शहिदी समागम वर्षानिमित्त नांदेडमध्ये आयोजित ‘हिंद दी चादर’ या ऐतिहासिक सोहळ्याचे निमंत्रण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वीकारले आहे. २४ आणि २५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या या भव्य सोहळ्याला अमित शाह यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बागेश्वर धामचे पं.

नांदेड : ‘हिंद दी चादर’ सोहळ्याला अमित शाह, योगी आदित्यनाथ आणि धीरेंद्र शास्त्रींची उपस्थिती! Read More »

\”आम्ही जे सांगतो ते करतो!\” दावोसमध्ये मुख्यमंत्री फडणवीस कडाडले; उद्योजकांचा महाराष्ट्रावर विश्वास का?

झ्युरिक : ‘महाराष्ट्र विश्वासार्ह आहे. आम्ही जे सांगतो ते करतो. त्यामुळेच जगभरातील उद्योजक, गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावर विश्वास वाढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत वाटचालीसाठी पार्श्वभूमी निर्माण केली आहे. एक ईकोसिस्टिम तयार केली आहे. त्याआधारे यंदाही महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात गुंतवणूक येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ‘महाराष्ट्र’ हे भारतात येणाऱ्या गुंतवणुकीसाठी गेटवे

\”आम्ही जे सांगतो ते करतो!\” दावोसमध्ये मुख्यमंत्री फडणवीस कडाडले; उद्योजकांचा महाराष्ट्रावर विश्वास का? Read More »

“निःस्वार्थी कामाच्या मागे समाज निश्चितपणे उभा राहतो”

“समाजाच्या नेमक्या गरजा काय आहेत ते ओळखून त्यासाठी काम करणे आवश्यक आहे. एखाद्या संस्थेला किंवा एखाद्या कार्यकर्त्याला एखाद्या कार्यक्षेत्रात काम करायचे म्हणून नव्हे, तर समाजाच्या गरजांवर आधारित काम उभे केले पाहिजे. निःस्वार्थीपणे काम उभे करणाऱ्याच्या मागे समाज निश्चितपणे उभा राहतो,” असा विश्वास ज्येष्ठ कार्यकर्त्या साधिका प्रव्राजिका विशुद्धानंदा तथा भारतीताई ठाकूर यांनी व्यक्त केला.  पुण्यात नातू फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात भारतीताई

“निःस्वार्थी कामाच्या मागे समाज निश्चितपणे उभा राहतो” Read More »

५२ एकर मैदान, ८ मोठे लंगर अन् १० लाख भाविक; ‘हिंद-दी-चादर’ सोहळ्यासाठी नांदेड नगरी सज्ज!

नांदेड : धर्म आणि मानवतेच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणारे शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा ३५० वा ‘शहीदी समागम’ सोहळा २४ आणि २५ जानेवारी २०२६ रोजी नांदेडमध्ये पार पडत आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी नांदेड नगरी पूर्णपणे सज्ज झाली असून, देश-विदेशातून सुमारे १० लाख भाविक येण्याची शक्यता विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी

५२ एकर मैदान, ८ मोठे लंगर अन् १० लाख भाविक; ‘हिंद-दी-चादर’ सोहळ्यासाठी नांदेड नगरी सज्ज! Read More »

शिरूरमध्ये २ कोटींचे ड्रग्ज जप्त

शादाब रियाज शेख जेरबंद : १ किलोचा मुद्देमाल पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरात बाबुरावनगर परिसरातून पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांच्या संयुक्त पथकाने पेट्रोलिंग दरम्यान १ किलो ५२ ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन) जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजार भावानुसार याची किंमत २ कोटी १० लाख ४० हजार रुपये इतकी आहे. शादाब रियाज शेख (वय ४१, रा. शिरूर),

शिरूरमध्ये २ कोटींचे ड्रग्ज जप्त Read More »

\”आधी सोबत असलेले तरी सांभाळा!\” भाजपचा संजय राऊतांना सणसणीत टोला

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निकालांनंतर महापौरपदावरून राजकीय कलगीतुरा रंगला आहे. \”भाजपचा महापौर होऊ देणार नाही, पुन्हा चमत्कार घडेल,\” या संजय राऊत यांच्या विधानाचा भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी खरपूस समाचार घेतला आहे. \”चार वर्षांपूर्वीही अशाच पोकळ गमजा मारल्या होत्या, तेव्हा भुईखालून आमदार कधी निघून गेले ते कळलंच नाही,\” अशा बोचऱ्या शब्दांत उपाध्ये यांनी राऊतांवर

\”आधी सोबत असलेले तरी सांभाळा!\” भाजपचा संजय राऊतांना सणसणीत टोला Read More »

खेडोपाडी घुमणार ‘हिंद-दी-चादर’ गुरुजींचा संदेश; नांदेडमध्ये १० लाख भाविक येणार!

नांदेड : शीख धर्माचे नववे गुरु ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या ऐतिहासिक ‘शहीदी समागम’ सोहळ्यासाठी नांदेड नगरी सज्ज होत आहे. या महासोहळ्याचे विचार खेडोपाडी आणि प्रत्येक घरापर्यंत पोहोचले पाहिजेत, असे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. येत्या २४ आणि २५ जानेवारी रोजी नांदेडमध्ये होणाऱ्या या भव्य सोहळ्याच्या

खेडोपाडी घुमणार ‘हिंद-दी-चादर’ गुरुजींचा संदेश; नांदेडमध्ये १० लाख भाविक येणार! Read More »