News Bharati

नागपूर

ॲग्रो व्हिजन – 2025 ला मुख्यमंत्र्यांची भेट: देवेंद्र फडणवीस यांनी कृषी प्रदर्शनीतील आधुनिक तंत्रज्ञान आणि उत्पादनांची केली पाहणी

नागपूर : मध्य भारतातील शेतकऱ्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या आणि नागपुरात (Nagpur) मागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या ‘ॲग्रो व्हिजन – 2025’ (Agro vision 2025) या कृषी प्रदर्शनीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी रविवारी दुपारी भेट दिली. या भेटीत त्यांनी प्रदर्शनीतील कृषी उत्पादने आणि पूरक उद्योगांच्या दालनांची पाहणी करून शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाबाबत माहिती जाणून घेतली. […]

ॲग्रो व्हिजन – 2025 ला मुख्यमंत्र्यांची भेट: देवेंद्र फडणवीस यांनी कृषी प्रदर्शनीतील आधुनिक तंत्रज्ञान आणि उत्पादनांची केली पाहणी Read More »

नागपुरात राज्यव्यापी अभ्युदय सेवा प्रदर्शन

सेवा संस्थांसाठी नागपुरात आयोजिण्यात आलेले अभ्युदय सेवा प्रदर्शन म्हणजे समाजाचे सहकार्य मिळवण्याचे व्यासपीठ आहे. नागरिकांच्या भेटीने सेवा संस्थांचा कार्याचा उत्साह निश्चितच वाढणार आहे. राज्यातील सेवा संस्थांचे काम समाजासमोर आणण्याच्या आणि त्यांना समाजातून समर्थन, सहकार्य मिळवून देण्याच्या उद्देशातून नागपुरातील ग्रामायण प्रतिष्ठानतर्फे यंदाही अभ्युदय सेवा प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे या उपक्रमाचे दुसरे वर्ष असून १२, १३ आणि

नागपुरात राज्यव्यापी अभ्युदय सेवा प्रदर्शन Read More »

मराठा आंदोलनात सेवा भारतीची निस्वार्थ सेवा

मुंबईत मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा केंद्रबिंदू आझाद मैदान होते. राज्यभरातून लाखो आंदोलक तेथे दाखल झाले होते. या प्रचंड जनसमुदायाला उन्हाचा तडाखा, दमट हवामान, पावसाच्या सरी, थकवा आणि आजारपण यांसारख्या अनेक नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागले. इतक्या मोठ्या संख्येने लोक एकाच ठिकाणी जमल्याने पिण्याचे पाणी, आरोग्यसेवा आणि तातडीची मदत या गरजा प्रकर्षाने पुढे येतात. अशा

मराठा आंदोलनात सेवा भारतीची निस्वार्थ सेवा Read More »

ओळख… नंदीबैलवाले जमातीची

महाराष्ट्रात ३१ ऑगस्ट हा दिवस दरवर्षी “भटके विमुक्त दिवस” म्हणून साजरा करण्याचा स्वागतार्ह निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. भटके विमुक्त समाजात या निर्णयामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. भटक्या जमातींचा इतिहास प्राचीन आहे. या जमाती लोकसंस्कृतीच्या अविभाज्य घटक राहिल्या आहेत. त्यातील नंदीबैलवाले या जमातीची ओळख. नंदीबैलवाले ही एक पारंपरिक भटकंती करणारी जमात असून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी

ओळख… नंदीबैलवाले जमातीची Read More »

‘३१ ऑगस्ट – भटके विमुक्त दिवस’ – एक सामाजिक आत्मपरीक्षणाचा दिवस

महाराष्ट्र शासनाने जुलै महिन्यात शासन निर्णय काढून यापुढे ‘३१ ऑगस्ट हा दिवस “भटके विमुक्त दिवस” म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. सरकारी कार्यालय, शाळा, संस्था याठिकाणी या वर्षापासून हा दिवस साजरा होणार आहे. अनेक वर्षांपासून भटके विमुक्त समाज व संस्थांची ही मागणी होती परंतु मागील ७२ वर्षांपासून वंचित व उपेक्षित समाजाच्या या मागणीला शासन केराची टोपली

‘३१ ऑगस्ट – भटके विमुक्त दिवस’ – एक सामाजिक आत्मपरीक्षणाचा दिवस Read More »

राष्ट्रसेवेची अखंड ज्योत : वंदनीय प्रमिलाताई मेढे

देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदकेचांदणे ज्यातून फाके शुभ्र पार्‍यासारखेदेखणा देहान्त तो जो सागरी सूर्यास्तसाअग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा– बा. भ. बोरकर राष्ट्रभक्ती, त्याग आणि मातृत्व यांचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या वंदनीय प्रमिलाताई मेढे यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आणि एका तेजस्विनीचा अस्त झाला. त्यांनी आपले संपूर्ण जीवन राष्ट्र सेविका समितीच्या कार्यासाठी समर्पित

राष्ट्रसेवेची अखंड ज्योत : वंदनीय प्रमिलाताई मेढे Read More »

AI कॅमेऱ्यांनी वाघांवर नजर, वाघ दिसताच गावात वाजणार सायरन; नागपूर वन विभागाचा नाविन्यपूर्ण उपक्रम

नागपूर : विदर्भातील नागपूर वन विभाग (Nagpur Forest Department), पेंच, ताडोबा-अंधारी, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाजवळील गावांमध्ये वाघांच्या हल्ल्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यातअनेक निष्पाप नागरिकांचा बळी जात असल्याने यावर उपाययोजनेसाठी ‘मार्वल’मार्फत एका विशेष सामंजस्य करारावर आज नागपूर येथे स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. महसूल तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule), वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal) यांच्या

AI कॅमेऱ्यांनी वाघांवर नजर, वाघ दिसताच गावात वाजणार सायरन; नागपूर वन विभागाचा नाविन्यपूर्ण उपक्रम Read More »

Nagpur : मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून नागपूरमधील पावसाचा आढावा

नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी आज नागपूर (Nagpur) शहर आणि जिल्ह्यातील पावसाच्या (Rain) सद्यस्थितीचा आढावा घेतला. नागपूर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्त यांच्याकडून त्यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली. सध्या नागपूरमधील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. मुसळधार पावसाच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF)

Nagpur : मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून नागपूरमधील पावसाचा आढावा Read More »

‘एआय’ क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या ‘स्टार्टअप्स’ना सर्वतोपरी सहकार्य करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : सायबर क्राईमचे (Cybercrime) जग वेगाने बदलत आहे. सायबर गुन्हेगाराकडून एआयचा वापर करून सामान्य माणसाला भुरळ घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे सायबर युद्ध रोखायचे असल्यास तंत्रज्ञानानेच सक्षमपणे उत्तर देण्याची गरज आहे. भविष्याचा वेध घेत एआय क्षेत्रात स्टार्टअप (AI Startup) निर्मितीची गरज आहे. एआय क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या स्टार्टअप्सना सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘एआय’ क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या ‘स्टार्टअप्स’ना सर्वतोपरी सहकार्य करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

संयम, सहनशीलता याची अपूर्व देणगी मला राजकारणातून मिळाली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : संयम, सहनशीलता याची अपूर्व देणगी मला राजकारणातून मिळाली असे मी एका अर्थाने समजून घेतो. राजकारणात आल्यानंतर तुम्हाला वाटेल तसे, वेळप्रसंगी अपशब्दही सहन करावे लागतात. गत पाच वर्षात काहींनी अनेक पद्धतीने मला अपमानित करण्याचा प्रयत्न केला. यात माझ्या कुटुंबाच्याही वाट्याला बरेच काही आले. ही सहनशक्ती, संयम, एका अर्थाने स्थितप्रज्ञता मी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी

संयम, सहनशीलता याची अपूर्व देणगी मला राजकारणातून मिळाली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »