News Bharati

Team NB Marathi

३५,००० उच्च-कुशल रोजगार आणि $१ ट्रिलियन अर्थव्यवस्था

गेल्या काही महिन्यांतील सर्व प्रकल्पांचा विचार केल्यास, महाराष्ट्रात एकूण २ लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, ज्यातून सुमारे ३५,००० प्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती अपेक्षित आहे. महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीने सप्टेंबर २०२४ मध्ये या ऐतिहासिक निर्णयाला मंजुरी दिली. हे प्रकल्प महाराष्ट्राला प्रगत तंत्रज्ञान आणि उत्पादनाचे जागतिक केंद्र बनवण्याच्या दिशेने मोठे पाऊल मानले जात आहेत. […]

३५,००० उच्च-कुशल रोजगार आणि $१ ट्रिलियन अर्थव्यवस्था Read More »

सरन्यायाधीशांच्या शिवसेना उबाठाला कानपिचक्या

शिवसेना चिन्हाच्या वादाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत नसल्याचा आरोप करणाऱ्या काही राजकीय नेत्यांच्या ‘बेजबाबदार विधानांवर’ सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी १५ मे २०२६ रोजी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि असे वर्तन स्वीकारले जाणार नाही, अशा शब्दांत न्यायालयाने नेत्यांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्या. जोयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने या प्रकरणातील पक्षकारांना अशा प्रकारच्या वर्तणुकीपासून

सरन्यायाधीशांच्या शिवसेना उबाठाला कानपिचक्या Read More »

निवडणूक पारदर्शकतेसाठी ‘एस.आय.आर’ची घोषणा

महाराष्ट्राच्या राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रात अलीकडेच “एसआयआर” अर्थात Special Intensive Revision प्रक्रियेची घोषणा हा चर्चेचा विषय ठरला आहे. राज्यातील मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने निवडणूक आयोगाने ही विशेष मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका तसेच विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रक्रियेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. लोकशाही

निवडणूक पारदर्शकतेसाठी ‘एस.आय.आर’ची घोषणा Read More »

जोडीदार नकोच, का वाढतोय हा ट्रेंड… एकटं जगणं खरंच इतकं सोपं असतं?

वयात आल्यावर आपल्या विरुद्ध लिंगाचे आकर्षण वाटणे अगदीच स्वाभाविक आहे. साधारणत: शाळा संपत असताना म्हणजेच ९-१० वीच्या वयात या गोष्टींचे भान यायला लागते असे म्हणतात. हल्ली ते वय आणखी कमी झाले आहे असे तज्ज्ञ म्हणतात. ठराविक वयानंतर स्वत:ची, शरीराची, भावनांची पुरेशी ओळख झालेली असते आणि अशावेळी विरुद्ध लिंगी व्यक्तीशी जवळीक वाढायला लागते. अशावेळीच अभ्यास, करियर,

जोडीदार नकोच, का वाढतोय हा ट्रेंड… एकटं जगणं खरंच इतकं सोपं असतं? Read More »

आर्थिक गुन्हेगारीचे चक्रव्यूह भेदण्याचे अस्त्र

महाराष्ट्र हे केवळ भारताचे एक राज्य नाही, तर ते देशाच्या अर्थव्यवस्थेचे हृदय आहे. मुंबईसारखी जागतिक वित्तीय राजधानी आणि पुणे-नागपूरसारखी वेगाने वाढणारी औद्योगिक केंद्रे जेव्हा प्रगतीची शिखरे पादाक्रांत करत असतात, तेव्हाच त्यांच्या सावलीत ‘पांढरपेशा गुन्हेगारी’ (White Collar Crime) आपली मुळे घट्ट करत असते. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात आर्थिक फसवणुकीचे जे स्वरूप समोर आले आहे, ते केवळ

आर्थिक गुन्हेगारीचे चक्रव्यूह भेदण्याचे अस्त्र Read More »

मुंबई विमानतळ : कचऱ्याचा पुनर्वापर, वसुंधरेचे रक्षण

मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (MIAL) द्वारे संचालित छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला (CSMIA) कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) कडून प्रतिष्ठित ‘झिरो वेस्ट टू लँडफिल (ZWL) प्लॅटिनम – क्लास I रेटिंग’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे. MIAL हा अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड (AAHL) आणि एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) यांचा संयुक्त उपक्रम असून, त्यात AAHL ची

मुंबई विमानतळ : कचऱ्याचा पुनर्वापर, वसुंधरेचे रक्षण Read More »

“हिंदुत्व ही एक जीवनपद्धती आहे”: सर्वोच्च न्यायालयाचा पुनरुच्चार

“हिंदुत्व ही एक जीवनपद्धती आहे” या आपल्या ऐतिहासिक निरीक्षणाचा पुनर्विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने दिलेला नकार केवळ न्यायालयीन पुनरुच्चार नाही. हे एक सांस्कृतिक समर्थन आहे. अशा वेळी, जेव्हा हिंदुत्वाला संकुचित राजकीय चष्म्यातून चुकीच्या पद्धतीने मांडले जात आहे, तेव्हा न्यायालयाने बुधवारी शबरीमला प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान भारताच्या ऐतिहासिक आणि तात्विक जाणीवेमध्ये खोलवर रुजलेले सत्य पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे

“हिंदुत्व ही एक जीवनपद्धती आहे”: सर्वोच्च न्यायालयाचा पुनरुच्चार Read More »

MiG-29K आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे इजेक्शन सीट

भारतीय वायुसेनेच्या (IAF) नाशिकमधील ओझरस्थित बेस रिपेअर डेपो (11 BRD) ने भारतीय नौदलाच्या मिग-२९के (MiG-29K) विमानांच्या इजेक्शन सीटचे स्वदेशी ओव्हरहॉल (दुरुस्ती) यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. १३ मे २०२६ रोजी, ओझर येथे आयोजित सोहळ्यात एअर मार्शल यल्ला उमेश आणि व्हाइस ॲडमिरल राहुल गोखले यांच्या उपस्थितीत ही दुरुस्त केलेली सीट भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली. ओझरचा ११

MiG-29K आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे इजेक्शन सीट Read More »

कोनिका आणि सीमा हैदर प्रकरण: सुरक्षेपुढील नवे आव्हान?

जागतिकीकरण, स्मार्टफोन आणि सोशल मीडियाच्या युगात मानवी संबंधांचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, पबजी सारखे ऑनलाईन खेळ यांसारख्या डिजिटल माध्यमांनी भौगोलिक सीमा भेदल्या आहेत. परंतु त्याचबरोबर काही नव्या सुरक्षाविषयक आणि सामाजिक समस्या देखील निर्माण केल्या आहेत. अलीकडील बांगलादेशी युवती कोनिका राणी आणि पाकिस्तानी महिला सीमा हैदर यांच्या प्रकरणांनी भारतात सीमापार प्रेमसंबंध, अवैध घुसखोरी

कोनिका आणि सीमा हैदर प्रकरण: सुरक्षेपुढील नवे आव्हान? Read More »

कुणी विजय देता का विजय: महाराष्ट्रातील डाव्यांची वैचारिक दिवाळखोरी

सी.जोसेफ विजय (थलपती विजय) याने तामिळनाडूचे १७ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.  तमिळगा वेत्री कळघम (TVK) या पक्षाचे सरकार सत्तेत आले. २०२४ साली अभिनेता विजय यानी या पक्षाची स्थापना केली. तामिळनाडूमध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत घवघवीत यश थलपतीला मिळाले. यानंतर महाराष्ट्रातील तथाकथित पुरोगामी लोक विजयचे गुणगान गायला लागले. सोशल मिडियावरच अस्तित्व राहिलेल्या या पुरोगाम्यांपैकी कोणी तरी

कुणी विजय देता का विजय: महाराष्ट्रातील डाव्यांची वैचारिक दिवाळखोरी Read More »