News Bharati

मुंबई

आवळा देऊन कोहळा काढला! उबाठाने मनसेसोबत नेमकं काय केलं?

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ‘ठाकरे बंधू’ एकत्र आले असतानाच, आता भाजपने या युतीवर सडकून टीका केली आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी फेसबुक पोस्टद्वारे उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. \”उबाठाने मनसेसोबत नेमकं तेच केलं, जे काँग्रेसने वंचितसोबत केलं आहे,\” असे म्हणत उपाध्येंनी या युतीला ‘आवळा देऊन कोहळा काढणे’ असा टोला लगावला आहे. […]

आवळा देऊन कोहळा काढला! उबाठाने मनसेसोबत नेमकं काय केलं? Read More »

मतदानापूर्वीच भाजपचा ‘डबल धमाका’; कल्याण-डोंबिवलीत दोन उमेदवार बिनविरोध!

कल्याण/डोंबिवली : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान पार पडणार आहे. मात्र, प्रचाराची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वीच कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजपने आपले विजयाचे खाते उघडले आहे. विशेष म्हणजे, एकापाठोपाठ एक अशा दोन जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची माहिती समोर आली आहे. १. प्रभाग २६ (क): आसावरी नवरेडोंबिवलीतील प्रभाग क्रमांक २६ (क) मधून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार

मतदानापूर्वीच भाजपचा ‘डबल धमाका’; कल्याण-डोंबिवलीत दोन उमेदवार बिनविरोध! Read More »

BMC Election 2026: मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसची पहिली उमेदवार यादी जाहीर

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीचे बिगुल वाजले असून, राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने आज आपल्या अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. \”आपली मुंबई घडवूया… मुंबईच्या हितासाठी काँग्रेसला निवडूया\” अशा घोषणांसह काँग्रेसने प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. पहिल्या टप्प्यात काँग्रेसने मुंबईतील महत्त्वाच्या प्रभागांमधील ८७ उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. यामध्ये अनुभवी

BMC Election 2026: मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसची पहिली उमेदवार यादी जाहीर Read More »

मविआचे ‘राजकीय विसर्जन’; उमेदवारी अर्जापूर्वीच महाविकास आघाडीचा डोलारा कोसळला

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महाविकास आघाडीत (मविआ) सुरू असलेला अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला असून, मविआतील घटक पक्ष स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत असल्याचे चित्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मविआच्या सद्यस्थितीवर जोरदार प्रहार केला असून, \”मविआ नावाच्या फसवी एकजुटीचे आता राजकीय विसर्जन झाले

मविआचे ‘राजकीय विसर्जन’; उमेदवारी अर्जापूर्वीच महाविकास आघाडीचा डोलारा कोसळला Read More »

\”जो हिंदू हित की बात करेगा, वही…;\” मुंबई महापालिका निवडणुकीत हिंदुत्वाचा हुंकार

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election 2025) रणधुमाळीत आता हिंदुत्वाचा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे. गेल्या काही वर्षांत मुंबईच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ झाली असली तरी, भारतीय जनता पक्षाने आपली ‘राष्ट्र प्रथम’ आणि ‘हिंदू हित’ ही विचारधारा अधिक आक्रमकपणे मांडायला सुरुवात केली आहे. मुंबई ही केवळ आर्थिक राजधानी नसून ती हिंदुत्वाची आणि मराठी अस्मितेची

\”जो हिंदू हित की बात करेगा, वही…;\” मुंबई महापालिका निवडणुकीत हिंदुत्वाचा हुंकार Read More »

\”बटोगे तो कटोगे! उबाठाचे हिंदुत्व की कट्टरवादाला साथ? रशीद मामू ते इक्बाल मुसा… 

मुंबई : मुंबई ही केवळ महाराष्ट्राची राजधानी नसून ती हिंदुत्वाची आणि मराठी अस्मितेची कर्मभूमी आहे. मात्र, गेल्या काही काळापासून सत्तेच्या हव्यासापोटी काही राजकीय पक्षांनी आपल्या मूळ विचारधारेला तिलांजली दिल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. भारतीय जनता पक्ष नेहमीच ‘राष्ट्र प्रथम’ या ध्येयाने चालणारा पक्ष असून, मुंबईच्या सुरक्षिततेशी आणि सांस्कृतिक वारशाशी कोणतीही तडजोड न करण्याची भूमिका पक्षाने

\”बटोगे तो कटोगे! उबाठाचे हिंदुत्व की कट्टरवादाला साथ? रशीद मामू ते इक्बाल मुसा…  Read More »

निवडणूक MM नाही HMचं होणार…

उबाठा-मनसे युतीच्या घोषणेने भारावून गेलेला लाचार सेनेचा एक सैनिक… (आपण त्याला मर्द मावळा म्हणू…) भेटला… विधानसभा निवडणुकीनंतर पार ढेपाळलेला हा गडी युती झाल्यापासून सत्तरीच्या म्हाताऱ्याने व्हायेग्रा खाऊन तरतरीत व्हावे… तशा टणाटण उड्या मारत होता… त्याचा एकच धोशा चालला होता… आता एमएम… MM आमचाच… आता एमएम… MM आमचाच… मी MM म्हणजे मुंबईचा मेयर समजलो… म्हटलं MM

निवडणूक MM नाही HMचं होणार… Read More »

काँग्रेसचा ‘मुस्लिम लीग’ अवतार; तुष्टीकरणासाठी हिंदूविरोधी अजेंडा!

मुंबई : महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसने जाहीर केलेल्या ४० स्टार प्रचारकांच्या यादीवरून आता राजकारण चांगलेच तापले आहे. या यादीतील विशिष्ट धर्माच्या उमेदवारांच्या संख्येवरून भाजपने काँग्रेसवर ‘व्होटबँक’ राजकारणाचा गंभीर आरोप केला आहे. भाजपचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी काँग्रेसच्या या अजेंड्याचा पर्दाफाश करत, \”काँग्रेस आता मुस्लिम लीगच्या पावलावर पाऊल टाकत आहे,\” अशी घणाघाती टीका केली

काँग्रेसचा ‘मुस्लिम लीग’ अवतार; तुष्टीकरणासाठी हिंदूविरोधी अजेंडा! Read More »

राऊतांच्या ‘त्या’ विधानाचा भाजपकडून पंचनामा; ‘उबाठा’च्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह

मुंबई : \”निष्ठावंत कार्यकर्त्याची उमेदवारी कापण्याची वेळ आमच्यावर नाही,\” असे म्हणणाऱ्या ठाकरे गटाचे (उबाठा) खासदार संजय राऊत यांचा भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जोरदार समाचार घेतला आहे. \”उबाठा गटामध्ये मुळात कार्यकर्तेच उरलेत कुठे?\” असा बोचरा सवाल करत, उपाध्ये यांनी ठाकरे गटाच्या सद्यस्थितीवर कडाडून टीका केली आहे. प्रश्न उमेदवारीचा नाही, तर ‘चेहरे’ शोधण्याचा! केशव उपाध्ये

राऊतांच्या ‘त्या’ विधानाचा भाजपकडून पंचनामा; ‘उबाठा’च्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह Read More »

मुंबई काँग्रेसला मोठे खिंडार! माजी नगरसेवक ॲड. धर्मेश व्यास यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे मुंबई कमिटी उपाध्यक्ष आणि माजी नगरसेवक ॲड. धर्मेश व्यास यांनी अखेर काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. काँग्रेसचा एक

मुंबई काँग्रेसला मोठे खिंडार! माजी नगरसेवक ॲड. धर्मेश व्यास यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश Read More »