News Bharati

मुंबई

मुंबईच्या महापौरपदाचा मुहूर्त ठरला! ११ फेब्रुवारीला होणार निवड; ८९ जागांसह भाजपचा दावा प्रबळ

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आता सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या महापौरपदाच्या निवडणुकीचा मुहूर्त अखेर ठरला आहे. येत्या ११ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईला ७८ वा महापौर मिळणार आहे. विशेष म्हणजे, यंदा हे पद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित असल्याने देशाच्या आर्थिक राजधानीचे नेतृत्व पुन्हा एकदा एका महिला नेत्याकडे जाणार आहे. निवडणुकीचे वेळापत्रक आणि प्रक्रियामहापालिका आयुक्त भूषण गगराणी […]

मुंबईच्या महापौरपदाचा मुहूर्त ठरला! ११ फेब्रुवारीला होणार निवड; ८९ जागांसह भाजपचा दावा प्रबळ Read More »

महापौर आरक्षण जाहीर! मुंबई, पुण्यासह १५ शहरांत महिलांचे वर्चस्व; पाहा तुमच्या शहराचे आरक्षण

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौरपदाचा सस्पेन्स अखेर संपला आहे. आगामी अडीच वर्षांच्या कालावधीसाठी महापौरांच्या आरक्षणाची सोडत आज मंत्रालयात जाहीर करण्यात आली. या सोडतीने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली असून, अनेक दिग्गजांची गणिते बिघडली आहेत तर काहींसाठी नवीन संधीची दारे उघडली आहेत. यावेळच्या आरक्षण सोडतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे निम्म्याहून अधिक शहरांचा कारभार आता महिलांच्या हाती

महापौर आरक्षण जाहीर! मुंबई, पुण्यासह १५ शहरांत महिलांचे वर्चस्व; पाहा तुमच्या शहराचे आरक्षण Read More »

असंगाशी संग : उबाठाचा फायदा, मनसेचा तोटा; आकडेवारीतून धक्कादायक वास्तव समोर

मुंबई : राजकारणात ‘असंगाशी संग’ केल्याचा परिणाम काय होतो, याचे जिवंत उदाहरण नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या आकडेवारीतून समोर आले आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यास सुरुवात झाली आहे. \”उबाठा (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांच्यातील युतीचा सर्वाधिक फटका राज ठाकरे यांच्या पक्षाला बसला असून, उबाठाने मनसेचा वापर करून आपली मतटक्केवारी वाढवून

असंगाशी संग : उबाठाचा फायदा, मनसेचा तोटा; आकडेवारीतून धक्कादायक वास्तव समोर Read More »

दलितांचे अक्षम्य गुन्हेगार – मुंबईत काँग्रेसला स्वतःच्याच पापांची फळे

मुंबई महानगरपालिकेची ही निवडणूक केवळ सत्तेसाठीची चुरस नव्हती, तर ती राजकीय नीतिमत्ता, सामाजिक प्रतिनिधित्व आणि नेतृत्वाच्या विश्वासार्हतेची मोठी परीक्षा होती. विशेषतः दलित आणि बहुजन समाजाशी काँग्रेसचे नेमके नाते काय, हे या निवडणुकीने आरशासारखे स्वच्छ केले. केवळ युतीचे गणित किंवा संघटनात्मक विस्कळीतपणा एवढेच हे मर्यादित नसून, काँग्रेसच्या प्रदीर्घ राजकारणातील ढोंगीपणा आणि दिशाहीनतेचा हा अटळ परिणाम आहे.

दलितांचे अक्षम्य गुन्हेगार – मुंबईत काँग्रेसला स्वतःच्याच पापांची फळे Read More »

नगरसेवक हॉटेलवर, मुंबईत पळवापळवीची भीती? फडणवीसांनी एका वाक्यात संपवला सगळा सस्पेन्स

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निकालाने महायुतीला स्पष्ट बहुमत दिले असले, तरी ‘महापौर’ कुणाचा? यावरून राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. नगरसेवकांच्या संभाव्य फोडाफोडीच्या चर्चा आणि शिंदे गटाने आपल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये हलवल्याने मुंबईत खळबळ माजली होती. या सर्व प्रकरणावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मौन सोडले असून, महायुतीमधील स्थैर्यावर शिक्कामोर्तब केले आहे. फोडाफोडीच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांचे उत्तरनिवडणुकीनंतर शिंदे

नगरसेवक हॉटेलवर, मुंबईत पळवापळवीची भीती? फडणवीसांनी एका वाक्यात संपवला सगळा सस्पेन्स Read More »

ठाकरेंचा गड गेला, पण भाजपची ‘शिंदें’नी अडवणूक केली? मुंबईत महापौरपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला?

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निकालाने राज्याच्या राजकारणात नवी समीकरणे जन्माला घातली आहेत. २२७ सदस्यांच्या सभागृहात महायुतीने ११८ जागांनिशी काठावरचं बहुमत (मॅजिक फिगर ११४) गाठलं खरं, पण सत्तास्थापनेचा मार्ग वाटतो तितका सोपा राहिलेला नाही. ८९ जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी सत्ता टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या २९ नगरसेवकांचा पाठिंबा अनिवार्य आहे. यामुळेच आता शिंदे

ठाकरेंचा गड गेला, पण भाजपची ‘शिंदें’नी अडवणूक केली? मुंबईत महापौरपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला? Read More »

मुंबईचा महापौर कोण? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निकालात भाजपने मिळवलेल्या यशानंतर आता संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे ‘मुंबईचा महापौर कोण होणार?’ या प्रश्नाकडे लागले आहेत. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पुण्यात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना मोठे विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे महापौरपदाचा पेच सुटण्याऐवजी अधिकच गुंतागुंतीचा झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. \”वरच्या देवानेच ठरवलंय…\”मुंबईच्या महापौरपदाबाबत

मुंबईचा महापौर कोण? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान Read More »

…लवकरच जय श्रीराम म्हणत आमचा महापौर खुर्चीवर बसेल – नितेश राणे

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपने ८९ जागा जिंकून ऐतिहासिक यश मिळवल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. २५ वर्षांची ठाकरेंची मक्तेदारी मोडीत काढल्यानंतर आता मुंबईचा महापौर कोण? यावर चर्चा सुरू आहे. याच दरम्यान, भाजपचे फायरब्रँड नेते नितेश राणे यांनी अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया देत, \”मुंबईचा महापौर हा हिंदूच होणार\” असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. देवेंद्रजींच्या

…लवकरच जय श्रीराम म्हणत आमचा महापौर खुर्चीवर बसेल – नितेश राणे Read More »

मुंबईत ‘महायुती’चा गुलाल! ठाकरेंचे गड ढासळले; सर्वांचे लक्ष लागलेय – \”मुंबईचा नवा महापौर कोण?\”

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या निकालाने शुक्रवारी राज्याच्या राजकारणात नवा इतिहास रचला आहे. गेल्या २५ वर्षांपासून मुंबईवर असलेली शिवसेना आणि ठाकरेंची एकहाती सत्ता अखेर भाजप-शिंदे सेना युतीने उलथवून लावली आहे. या निवडणुकीत भाजपने ८९ जागा जिंकत सर्वात मोठ्या पक्षाचा बहुमान मिळवला आहे, तर मित्रपक्ष असलेल्या शिंदे सेनेने २९ जागा खिशात टाकल्या आहेत. आता सर्वांचे

मुंबईत ‘महायुती’चा गुलाल! ठाकरेंचे गड ढासळले; सर्वांचे लक्ष लागलेय – \”मुंबईचा नवा महापौर कोण?\” Read More »

छोटा भाऊ ते ‘किंगमेकर’! मुंबईत भाजपची ‘शंभरी’ पार; पहिल्यांदाच भाजपचा ‘मराठी महापौर’ बसणार?

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निकालांचे चित्र स्पष्ट होत असतानाच राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. \”मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचा मराठी महापौर विराजमान होईल, यात शंका बाळगण्याचे कारण नाही,\” असे ठाम प्रतिपादन भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे विधान केले असून, यामुळे राजकीय हालचालींना

छोटा भाऊ ते ‘किंगमेकर’! मुंबईत भाजपची ‘शंभरी’ पार; पहिल्यांदाच भाजपचा ‘मराठी महापौर’ बसणार? Read More »