News Bharati

Vinayak A

रोहित पाटीलांच्या कार्यकर्त्यांनी वाटले पैसे ?

शरद पवार पक्षाच्या दोन कार्यकर्त्यांवर मतदारांना पैसे आणि फराळ वाटून आचारसंहितेचा भंग केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडला आहे, जिथे राजकीय तणाव वाढला आहे.निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या भरारी पथकाने ही कारवाई केली. हे भरारी पथक संजयकाका पाटलांचे आरोप लक्षात घेत हि कार्यवाही केली. जेथे रोहित पाटलांच्या कार्यकर्त्यांनी […]

रोहित पाटीलांच्या कार्यकर्त्यांनी वाटले पैसे ? Read More »

\”मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे\” – स्वामी गोविंददेव गिरी महाराज

शेवगाव : श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष आणि श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्टचे उपाध्यक्ष, स्वामी गोविंददेव गिरी महाराज (Swami Govind Dev Giri Maharaj), ४ नोव्हेंबर रोजी शेवगाव (Shevgaon) येथे आले होते. या प्रसंगी त्यांनी प्रत्येकाने येणाऱ्या निवडणुकीत स्वतः मतदान करावे व हिंदू बांधवांकडूनही मतदान करून घ्यावे असे आवाहन केले. गरज लागल्यास त्यांना मतदान प्रक्रियेत मदत करावी, असे त्यांनी

\”मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे\” – स्वामी गोविंददेव गिरी महाराज Read More »

नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भव्य रॅली

आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून आपल्या प्रचाराची सुरुवात केली आहे . हिंगणा टी पॉईंट पेट्रोल पंप येथे झालेल्या रॅलीत फडणवीसांनी आपल्या समर्थकांना संबोधित करताना स्पष्ट केले की, \”विधानसभा निवडणुकीत महायुतीला विजय मिळणार आहे.\” हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत ही रॅली अतिशय उत्साहवर्धक होती. फडणवीस म्हणाले, \”या निवडणुकीत आम्ही जनतेचा विश्वास जिंकण्यासाठी सर्व शक्ती लावणार

नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भव्य रॅली Read More »

विधानसभेसाठी रिंगणातील आखणी तयार…उमेदवारांनी दंड थोपटले

विधानसभेसाठी रिंगणातील आखणी तयार होत असून उमेदवारांची नावे अंतिम झाल्याने निवडणूकीसाठी दंड थोपटले जात आहेत. राज्यात २० तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी चित्र आज स्पष्ट झालं. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेतले तरी बंडखोरी पूर्णपणे शमलेली नाही. मुंबई उपनगर जिल्ह्यातल्या २६ मतदारसंघातून आज ५३ जणांनी माघार घेतली. नवी मुंबईतल्या बेलापूर

विधानसभेसाठी रिंगणातील आखणी तयार…उमेदवारांनी दंड थोपटले Read More »

विधानसभा रणधुमाळी…काँग्रेसचे बंडखोर उमेदवार नॉट रिचेबल

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजचा दिवस अत्यंत महत्वाचा असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत दुपारी तीन वाजता संपली. यानंतर राज्यभरातील लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. या दरम्यान कसबा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची डोकेदुखी वाढली कारण येथील माजी महापौर व काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार कमल व्यवहारे या कालपासून नॉट रिचेबल आहेत. सध्या राज्यभरात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणात

विधानसभा रणधुमाळी…काँग्रेसचे बंडखोर उमेदवार नॉट रिचेबल Read More »

हिंगोलीतही भाजपला बंडखोरी शमविण्यात यश

हिंगोलीतील वसमत मतदारसंघातून भाजपचे बंडखोर उमेदवार मिलिंद यंबल यांनी आपली माघार घेतल्याची घोषणा झाली आहे. हा निर्णय भाजपला मोठा दिलासा देणारा ठरला आहे. मिलिंद यंबल हे भाजपच्या तिकीटावरून उमेदवारी लढवणार होते, परंतु काही वादग्रस्त मुद्द्यांमुळे बंडाचा मार्ग स्वीकारला होता. त्यांच्या माघारीमुळे वसमत मतदारसंघातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपच्या नेत्यांनी हे वृत्त

हिंगोलीतही भाजपला बंडखोरी शमविण्यात यश Read More »

भाजपाला दिलासा…बोरिवली विधानसभा मतदारसंघातील बंडखोरी थोपवली

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस ४ नोव्हेंबर आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांना बंडखोरी थांबवण्याचे आव्हान होते. यात भाजपने मुंबईतील बोरिवली विधानसभा मतदारसंघातील पहिली बंडखोरी यशस्वीपणे थोपवली आहे. माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी अखेर अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप नेते विनोद तावडेंनी त्यांची समजूत काढत हा निर्णय घडवून आणला. गोपाळ

भाजपाला दिलासा…बोरिवली विधानसभा मतदारसंघातील बंडखोरी थोपवली Read More »

सदाभाऊ खोत यांचा शरद पवारांवर हल्लाबोल

सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर तीव्र टीका केली आहे. खोत यांनी शरद पवारांना मराठा आरक्षणाचा ‘मारेकरी’ असे म्हटले आहे आणि सांगितले की, शरद पवार पक्ष चालवत नसून टोळी चालवत आहेत. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. खोत म्हणाले, \”शरद पवार हे मराठा समाजाच्या आरक्षणाचे मारेकरी आहेत. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण

सदाभाऊ खोत यांचा शरद पवारांवर हल्लाबोल Read More »

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये मध्ये सोशल मीडिया ‘वॉर’

कोकणातील राजकीय वातावरण हे दिवसेंदिवस गरम होत आहे. येथे शिवसेनेचे दोन गट, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांमध्ये, सोशल मीडियावर एक चांगलाच युद्धाचा वेध लागला आहे. हे वाद विशेषत: राजापूर मतदारसंघात राजन साळवी आणि किरण सामंत या उमेदवारांच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सुरू झाले आहेत. शिंदे आणि ठाकरे गटांमधील वादलेल्या व्हिपच्या प्रकरणापासून सुरू झालेला हा झगडा

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये मध्ये सोशल मीडिया ‘वॉर’ Read More »

बोरिवलीतील बंडखोरी शमविण्यात भाजप ला यश

बोरिवली विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेल्या गोपाळ शेट्टी यांनी सोमवारी (३ नोव्हेंबर २०२४) आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. हा निर्णय घेतल्याने भारतीय जनता पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे, कारण शेट्टी यांच्या बंडखोरीने पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता होती. भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी शेट्टी यांच्याशी चर्चा केल्यानंतर ही माघार

बोरिवलीतील बंडखोरी शमविण्यात भाजप ला यश Read More »