News Bharati

Vinayak A

लातूर येथे २१ ते २६ मार्च दरम्यान हिरकणी हाट प्रदर्शन

लातूर : लातूर जिल्ह्यातील ग्रामीण महिला बचत गटांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ‘हिरकणी हाट – २०२५-२६’ या भव्य जिल्हास्तरीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि जिल्हा परिषद, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या प्रदर्शनाचा शुभारंभ आज, २१ मार्च २०२६ […]

लातूर येथे २१ ते २६ मार्च दरम्यान हिरकणी हाट प्रदर्शन Read More »

पोहंडुळमध्ये २२ मार्चला ‘विराट हिंदू संमेलन’; शोभायात्रा आणि महाप्रसादाचे आयोजन

पोहंडुळ (जि. परभणी) : हिंदू समाजाचे संघटन आणि संस्कृती रक्षणाच्या उद्देशाने खडका मंडळांतर्गत येणाऱ्या पोहंडुळ (ता. सोनपेठ) येथे येत्या रविवारी, २२ मार्च २०२६ रोजी ‘विराट हिंदू संमेलना’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील समस्त हिंदू बांधवांना एकत्र आणण्यासाठी या संमेलनाच्या माध्यमातून मोठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. हे संमेलन पोहंडुळ येथील श्री हनुमान मंदिर परिसरात

पोहंडुळमध्ये २२ मार्चला ‘विराट हिंदू संमेलन’; शोभायात्रा आणि महाप्रसादाचे आयोजन Read More »

अकोला व नागपूर येथे ‘हिंद-दी-चादर’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

अकोला/नागपूर : धर्म, स्वातंत्र्य आणि मानवतेसाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणारे नववे शीख गुरु श्री गुरु तेग बहादुर साहेबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ‘हिंद-दी-चादर’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम विदर्भातील अकोला आणि नागपूर शहरात

अकोला व नागपूर येथे ‘हिंद-दी-चादर’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन Read More »

लोअर परळ येथे १९ ते २६ मार्च दरम्यान ‘सांस्कृतिक महोत्सवा’चे आयोजन

मुंबई : महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने ‘महासंस्कृती’ अभियानांतर्गत राज्याच्या सांस्कृतिक परंपरांचे जतन करण्यासाठी लोअर परळ येथे ‘सांस्कृतिक महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. १९ मार्चपासून सुरू झालेला हा महोत्सव २६ मार्च २०२६ पर्यंत चालणार असून, मुंबईकरांना दररोज सायंकाळी सांस्कृतिक मेजवानी अनुभवायला मिळत आहे. हा महोत्सव दररोज सायंकाळी ७:३० वाजता

लोअर परळ येथे १९ ते २६ मार्च दरम्यान ‘सांस्कृतिक महोत्सवा’चे आयोजन Read More »

औरंगजेबाची कबर हटवा; सोलापूरमध्ये टी. राजा सिंह कडाडले

सोलापूर : भाग्यनगर (हैदराबाद) येथील गोशामहलचे भाजप आमदार टी. राजा सिंह यांनी सोलापूर येथील एका कार्यक्रमात बोलताना औरंगजेबाची कबर हटवण्याबाबत मोठे विधान केले आहे. \”केवळ महाराष्ट्रातच नाही, तर ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आता संपूर्ण देशभरातील हिंदूंकडून औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी जोर धरत आहे,\” असे त्यांनी म्हटले. यावेळी बोलताना राजा सिंह थेट मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र

औरंगजेबाची कबर हटवा; सोलापूरमध्ये टी. राजा सिंह कडाडले Read More »

\”माऊलींचे विचार आत्मशांतीसाठी आवश्यक\”; सोलापूरमध्ये ‘ज्ञानियांचा राजा, मोगरा फुलला’ सोहळ्याचा दिमाखदार प्रारंभ

सोलापूर : \”संत ज्ञानेश्वर माऊली हे जगातील सर्वात कमी वयाचे आध्यात्मिक बालसाहित्यिक आहेत. त्यांचे साहित्य मानवी मनाला शांती आणि समाधान देणारे असून, आजच्या धावपळीच्या जीवनात आत्मशांती मिळवण्यासाठी माऊलींचे विचार अत्यंत आवश्यक आहेत,\” असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले. सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय (महाराष्ट्र राज्य)

\”माऊलींचे विचार आत्मशांतीसाठी आवश्यक\”; सोलापूरमध्ये ‘ज्ञानियांचा राजा, मोगरा फुलला’ सोहळ्याचा दिमाखदार प्रारंभ Read More »

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या २ मुसलमानांना अटक

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश आतंकवादविरोधी पथक (ATS), गुप्तचर यंत्रणा आणि स्थानिक पोलिसांनी एका संयुक्त कारवाईत पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या दोन मुसलमान तरुणांना अटक केली आहे. अजीम राणा आणि आझाद राजपूत अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून, ते भारतातील संवेदनशील धार्मिक स्थळे आणि सार्वजनिक ठिकाणांची माहिती पाकिस्तानला पुरवत असल्याचे तपासात समोर आले आहे. अन्वेषण यंत्रणांनी दिलेल्या

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या २ मुसलमानांना अटक Read More »

इराणमधील युद्धाच्या छायेत मुसलमान तरुणीने गायले फारसी भाषेत \”शिवभजन\”

तेहरान : सध्या संपूर्ण जग युद्ध आणि भू-राजकीय तणावाच्या छायेत आहे. विशेषतः अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध इराण अशा संघर्षामुळे इराणमध्ये चिंतेचे वातावरण असताना, तेथून एक अत्यंत सुखद आणि आध्यात्मिक शांतता देणारा व्हिडिओ समोर आला आहे. इराणमधील एका मुसलमान तरुणीने तिची मातृभाषा असलेल्या फारसी (पर्शियन) भाषेत भगवान शंकराला समर्पित असलेले ‘शिवभजन’ गायले असून, हा व्हिडिओ सध्या

इराणमधील युद्धाच्या छायेत मुसलमान तरुणीने गायले फारसी भाषेत \”शिवभजन\” Read More »

दिल्लीत २२ मार्चपर्यंत ‘महाराष्ट्र साडी प्रदर्शन’; फॅशन शोचेही आयोजन

नवी दिल्ली : महाराष्ट्राची समृद्ध वस्त्रपरंपरा आणि ग्रामीण कारागिरांच्या कलाकुसरीचे दर्शन घडविणाऱ्या ‘महाराष्ट्र साडी प्रदर्शना’चे काल नवी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदन येथे उत्साहात उद्घाटन झाले. पहिल्याच दिवशी दिल्लीकर आणि महाराष्ट्रप्रेमींनी या प्रदर्शनाला मोठी गर्दी केली असून, महाराष्ट्राच्या पारंपरिक साड्यांचे आकर्षण राजधानीत पाहायला मिळत आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन ‘आयएएस ऑफिसर्स वाईव्हज् असोसिएशन’च्या अध्यक्षा हेमा सोमनाथन यांच्या

दिल्लीत २२ मार्चपर्यंत ‘महाराष्ट्र साडी प्रदर्शन’; फॅशन शोचेही आयोजन Read More »

प्रजासत्ताक दिनी प्रथम ठरलेला महाराष्ट्राचा चित्ररथ मुंबईकरांच्या भेटीला; गिरगाव येथे प्रदर्शनाचे आयोजन

मुंबई : नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनी ‘कर्तव्यपथा’वर पार पडलेल्या भव्य संचलनात देशभरात प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाचे आता मुंबईत आगमन झाले आहे. गिरगाव येथे या चित्ररथाचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून, महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. महाराष्ट्राची लोकसंस्कृती, प्रगत संत परंपरा, कला आणि परंपरागत वैभवाचे प्रभावी

प्रजासत्ताक दिनी प्रथम ठरलेला महाराष्ट्राचा चित्ररथ मुंबईकरांच्या भेटीला; गिरगाव येथे प्रदर्शनाचे आयोजन Read More »