News Bharati

बातम्या

माढ्यात आ. बबनराव शिंदेंविरोधात पुतण्याचे बंड

उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे माढ्याचे आ. बबनराव शिंदे यांच्या विरोधात त्यांचे पुतणे धनराज शिंदे यांनी जाहीरपणे बंडाची ‘तुतारी’ फुंकली आहे. माढा तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी तसेच तालुक्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण माढ्यातून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी केले. माढा तालुक्याचे राजकारण फक्त कारखानदारांभोवतीच फिरत आहे. माढा विधानसभेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लढवण्यास इच्छुक आहे […]

माढ्यात आ. बबनराव शिंदेंविरोधात पुतण्याचे बंड Read More »

सोलापूर : प्रशासकीय मान्यतेसाठी सरपंचांची गर्दी

सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण, ग्रामपंचायत विभागासह इतर विभागांतील कामांना प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी जिल्ह्यातील सरपंच, ठेकेदारांनी जिल्हा परिषदेत गर्दी केली जात आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहित येत्या पंधरा दिवसांत लागेल, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोहोळ इथल्या एका कार्यक्रमात केल्यानंर जिल्ह्यातील नेते, सरपंच आणि ठेकेदार सर्तक झाले आहेत. जिल्हा नियोजन समिती आणि जिल्हा परिषदेच्या सेसफंडाचा

सोलापूर : प्रशासकीय मान्यतेसाठी सरपंचांची गर्दी Read More »

नाशिक : महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं लोकार्पण

नाशिक : महायुतीकडून आज नाशिकमध्ये (Nashik) विविध विकासकामांचं लोकार्पण आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रम झाले. मुंबई नाका परिसरात महात्मा ज्योतिराव फुळे आणि सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सह मंत्री छगन भुजबळ आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थित हा लोकअर्पण सोहळा पार पडला. यावेळी, छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)

नाशिक : महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं लोकार्पण Read More »

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना : राज्यातील पहिली ट्रेन कोल्हापुरातून अयोध्येला रवाना; ८०० ज्येष्ठ तीर्थयात्रींची सहभागिता

कोल्हापूर : आपली वडीलधारी मंडळी ही आपली संपत्ती असून आजवर त्यांनी कष्ट उपसले आहेत. त्यांचे अनुभव, ज्ञान ही आपल्यासाठी मोठी शिदोरी आहे. त्यामुळं त्यांच्या आयुष्यात आनंद, समाधानाचे क्षण आणण्याची जबाबदारी आपलीच आहे. याच भावनेतून आपण राज्यातील सर्व धर्मियांतील ६० वर्षांवरील ज्येष्ठांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ (Mukhyamantri Teerth Darshan Yojana)

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना : राज्यातील पहिली ट्रेन कोल्हापुरातून अयोध्येला रवाना; ८०० ज्येष्ठ तीर्थयात्रींची सहभागिता Read More »

29 सप्टेंबर रोजी राज्यपालांच्या हस्ते कृषी पुरस्कारांचे वितरण

मुंबई : कृषी विभागामार्फत कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती, संस्था तसेच अधिकारी व कर्मचारी यांचा कृषी पुरस्कार (Agriculture Award) राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करून गौरव करण्यात येणार आहे. रविवार (२९) रोजी सायं. ५ वा. मुंबई येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (डोम) वरळी येथे आयोजित केल्याची माहिती कृषी मंत्री

29 सप्टेंबर रोजी राज्यपालांच्या हस्ते कृषी पुरस्कारांचे वितरण Read More »

मकाओ ओपन बॅडमिंटन: ट्रीसा जोली आणि गायत्री गोपीचंद यांचा उपांत्य फेरीत प्रवेश

मकाओ ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या महिला जोडी ट्रीसा जोली आणि गायत्री गोपीचंद यांनी दमदार खेळीमुळे उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यांनी चाइनीज ताइपेच्या यिन-हुई आणि जीह युन जोडीला सीधे सेटमध्ये २१-१२, २१-१७ अशा स्कोअरने पराभूत केले. ट्रीसा आणि गायत्री या जोडीने आपल्या खेळीतील समन्वय आणि शक्ती दाखवत एकतर्फी खेळीमुळे दर्शकांना मोहित केले. त्यांच्या यशामुळे भारतीय

मकाओ ओपन बॅडमिंटन: ट्रीसा जोली आणि गायत्री गोपीचंद यांचा उपांत्य फेरीत प्रवेश Read More »

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २९ सप्टेंबरला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून संवाद साधणार

येत्या २९ सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशविदेशातल्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा ११४वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर, आकाशवाणी वृत्त संकेतस्थळ तसंच न्यूज ऑन एआयआर या ॲपवर प्रसारित केला जाईल.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २९ सप्टेंबरला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून संवाद साधणार Read More »

जितेंद्र आव्हाडांच्या पत्नीने केली ओसामा बिन लादेनची डॉ. अब्दुल कलाम यांच्याशी तुलना; ऋता आव्हाड यांनी उधळली मुक्ताफळे

ठाणे, महाराष्ट्र – राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी दहशतवादी ओसामा बिन लादेनची तुलना भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्याशी करून राजकीय वादाला तोंड फोडले आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या विधानसभा मतदारसंघातील मुंब्रा या मुस्लिम बहुल भागामध्ये एका शैक्षणिक कार्यक्रमात बोलताना रुता आव्हाड यांनी विद्यार्थ्यांना ओसामा बिन लादेन

जितेंद्र आव्हाडांच्या पत्नीने केली ओसामा बिन लादेनची डॉ. अब्दुल कलाम यांच्याशी तुलना; ऋता आव्हाड यांनी उधळली मुक्ताफळे Read More »

विदर्भात औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद

विदर्भातल्या औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधा आणखी मजबूत करण्यासाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज नागपुरात ‘उद्यमात सकल समृद्धी, महाराष्ट्राची उद्योग भरारी’  कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात बोलताना ही माहिती दिली. मागच्या तीन महिन्यात एकट्या महाराष्ट्रात ७५ हजार कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक झाली असून, गुंतवणूकीचा हा प्रवाह असाच सुरू राहणार अ‍सल्याचं

विदर्भात औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद Read More »

हिजबुल्लाहचा कमांडर मोहम्मद हुसेन स्रुर इस्राइलच्या हवाई हल्ल्यात ठार

हिजबुल्लाह चा कमांडर मोहम्मद हुसेन स्रुर काल इस्राइलच्या हवाई हल्ल्यात मारला गेला. लेबननची राजधानी बैरुतमध्ये इस्राइलनं काल अनेक हवाई हल्ले केला. त्यात तो ठार झाल्याची माहिती इस्राइलच्या लष्करानं दिली आहे. इस्राइलवर हवाई हल्ले करणं, ड्रोन आणि क्रुझ क्षेपणास्र टाकण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. लेबननमध्ये ड्रोन उत्पादन केंद्र स्थापन केल्याचा आरोप त्याच्यावर होता.  या संघर्षात हजारो लोक

हिजबुल्लाहचा कमांडर मोहम्मद हुसेन स्रुर इस्राइलच्या हवाई हल्ल्यात ठार Read More »