News Bharati

बातम्या

पुण्यात खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे स्वदेशी महोत्सव

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे पुण्यात ‘स्वदेशी महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून ग्रामीण उत्पादकांना थेट बाजारपेठही मिळत आहे. खादीच्या उत्पादनांना आणि ग्रामीण उत्पादनांना प्रोत्साहन मिळावे तसेच या वस्तूंचा वापर वाढावा या उद्देशाने पुण्यात ‘स्वदेशी महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. पुणेकरांकडून या महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी वस्तूंच्या वापराचे आवाहन […]

पुण्यात खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे स्वदेशी महोत्सव Read More »

‘‘समाजाच्या सोबतीने भटके-विमुक्तांच्या विकासाला गती मिळेल\”

भटके-विमुक्तांच्या सर्वेक्षणासाठी आणि त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी ‘भटके विमुक्त विकास परिषदे’तर्फे मोबाईल सर्वेक्षण ॲप तयार करण्यात आले आहे. ‘भटके विमुक्त विकास परिषदे’ने हे एक महत्त्वपूर्ण काम केले आहे. समाजातील सज्जन शक्तीला सोबत घेऊन भटके विमुक्तांचे सर्वेक्षण आणि त्यांना मूलभूत कागदपत्रे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू या. समाजाला बरोबर घेऊन हे काम केले तर भटके विमुक्तांच्या विकासाला निश्चितच गती मिळेल, असा

‘‘समाजाच्या सोबतीने भटके-विमुक्तांच्या विकासाला गती मिळेल\” Read More »

​लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांची भारतीय लष्कर दलात पदोन्नती

पुणे : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएच्या कोर्टाने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह भारतीय लष्करातील लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित (Prasad Purohit) यांची नुकतीच निर्दोष मुक्तता केली. पुरोहित यांची या खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आल्यानंतर लष्कराने त्यांना पदोन्नती दिली आहे. लेफ्टनंट कर्नल पदावर असलेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने कर्नल पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. एनआयएच्या विशेष न्यायालयाने ३१

​लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांची भारतीय लष्कर दलात पदोन्नती Read More »

देण्याचा आनंद मिळवून देणारे… देणे समाजाचे

देणगीदार आणि सामाजिक संस्था यांच्यामध्ये विश्वासार्ह दुवा ठरलेला देणे समाजाचे हा उपक्रम पुण्यात सुरू झाला आहे. देणे समाजाचे हे प्रदर्शन रविववारपर्यंत (१४ सप्टेंबर) निवारा सभागृह, नवी पेठ येथे सकाळी १० ते रात्री ९ यावेळेत खुले आहे. अनेकांना सामाजिक कार्यासाठी मदत करायची इच्छा असते पण कुठली संस्था योग्य आहे, हा प्रश्न पडतो. त्याचे उत्तर ह्या प्रदर्शनात मिळते. दान करण्यासाठी

देण्याचा आनंद मिळवून देणारे… देणे समाजाचे Read More »

नागपुरात राज्यव्यापी अभ्युदय सेवा प्रदर्शन

सेवा संस्थांसाठी नागपुरात आयोजिण्यात आलेले अभ्युदय सेवा प्रदर्शन म्हणजे समाजाचे सहकार्य मिळवण्याचे व्यासपीठ आहे. नागरिकांच्या भेटीने सेवा संस्थांचा कार्याचा उत्साह निश्चितच वाढणार आहे. राज्यातील सेवा संस्थांचे काम समाजासमोर आणण्याच्या आणि त्यांना समाजातून समर्थन, सहकार्य मिळवून देण्याच्या उद्देशातून नागपुरातील ग्रामायण प्रतिष्ठानतर्फे यंदाही अभ्युदय सेवा प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे या उपक्रमाचे दुसरे वर्ष असून १२, १३ आणि

नागपुरात राज्यव्यापी अभ्युदय सेवा प्रदर्शन Read More »

राजकारणातील महिलांसाठी कुटुंब ठरते शक्तीस्थान

‘दृष्टी’ स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्राच्या वतीने प्रकाशित“राजकारणातील महिलांचा सहभाग” या विशेषांकाच्या मराठी व हिंदी आवृत्तीच्या प्रकाशनानिमित्त पुण्यात परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, शेवाळवाडीच्या माजी सरपंच सुमन थोरात आणि पिंपरी दुमाळा (शिरूर) येथील माजी सरपंच गायत्री चिखले यांनी या चर्चासत्रात सहभाग घेतला. सरपंच ते खासदार अशा विविध स्तरांवरील

राजकारणातील महिलांसाठी कुटुंब ठरते शक्तीस्थान Read More »

कामगार कायद्यात बदल : गुंतवणुकीला चालना, कामगारांसाठी नवे पर्याय

राज्यातील मंत्रिमंडळ बैठकीत नुकताच कामगार कायद्यांमध्ये महत्वाचा बदल करण्यात आला आहे. केंद्र सरकारने स्थापन केलेल्या कृती दलाच्या सूचनांनुसार हा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे कारखान्यांमधील कामगारांच्या दैनंदिन कामाच्या वेळेत ९ तासांवरून १२ तासांपर्यंत वाढ होणार आहे. तसेच दुकाने व आस्थापनांमध्ये कामगारांची दैनंदिन कामाची वेळ ९ तासांवरून १० तासांपर्यंत करण्यात आली आहे. मात्र साप्ताहिक कामाचे ४८

कामगार कायद्यात बदल : गुंतवणुकीला चालना, कामगारांसाठी नवे पर्याय Read More »

मराठा आरक्षण मोर्चा मुंबईत दाखल होताच राजकीय वातावरण तापले; भाजपचा शरद पवार, ठाकरे आणि काँग्रेसवर हल्लाबोल

मुंबई : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचा मराठा आरक्षण (Maratha Reservation) मोर्चा मुंबईत (Mumbai) दाखल होताच, राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीमध्ये (MVA) थेट संघर्ष सुरू झाला असून, भाजपने महाविकास आघाडीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे आणि मराठा समाजाच्या प्रश्नावर यापूर्वी लक्ष न दिल्याने त्यांच्यावर जोरदार टीका केली

मराठा आरक्षण मोर्चा मुंबईत दाखल होताच राजकीय वातावरण तापले; भाजपचा शरद पवार, ठाकरे आणि काँग्रेसवर हल्लाबोल Read More »

शिवसृष्टीमुळे बारामतीला ऐतिहासिक व पर्यटन महत्त्व मिळेल, अजित पवारांचा विश्वास

बारामती : कन्हेरी परिसरात शिवसृष्टीमुळे (Shivsrushti) पर्यटकांना इतिहासाची ओळख आणि त्यातून प्रेरणा मिळेल. तसेच बारामतीचे (Baramati) सांस्कृतिक व पर्यटन महत्त्व अधिक वाढेल, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री पवार यांनी बारामती परिसरातील विविध विकास कामांची पाहणी केली. शिवसृष्टी, कन्हेरी वन उद्यान परिसर, तांदुळवाडी येथील वृद्धाश्रम तसेच

शिवसृष्टीमुळे बारामतीला ऐतिहासिक व पर्यटन महत्त्व मिळेल, अजित पवारांचा विश्वास Read More »

मराठा आरक्षण मोर्चाला सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचा ‘ऑन-ग्राउंड’ पाठिंबा; आंदोलकांना केली मोठी मदत

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या दिशेने निघालेल्या मराठा आंदोलकांना आता सत्ताधारी पक्षाकडूनही पाठिंबा मिळत आहे. वसमतचे (Vasmat) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे आमदार राजू नवघरे (Raju Navghare) हे केवळ या मोर्चात सहभागी झाले नाहीत, तर त्यांनी आंदोलकांसाठी ठिकठिकाणी भोजन आणि पाण्याची सोय करून मदतीचा हात दिला

मराठा आरक्षण मोर्चाला सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचा ‘ऑन-ग्राउंड’ पाठिंबा; आंदोलकांना केली मोठी मदत Read More »