News Bharati

बातम्या

शिवनेरी किल्ला प्रेरणेची तर आग्र्याचा लाल किल्ला ही स्वाभिमानाची भूमी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आग्रा (उत्तर प्रदेश) : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही देशाला एक तेजस्वी प्रेरणादायी इतिहासाचे पुन्हा स्मरण करण्याची संधी आहे. शिवरायांची जन्मभूमी असलेला शिवनेरी किल्ला प्रेरणेची तर आग्र्याचा लाल किल्ला ही स्वाभिमानाची भूमी आहे. आग्रा येथे ज्या ठिकाणी महाराजांना कैद केले होते तेथे पुढील वर्षी स्मारकाचे काम सुरु झालेले असेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]

शिवनेरी किल्ला प्रेरणेची तर आग्र्याचा लाल किल्ला ही स्वाभिमानाची भूमी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

काव्यगत न्याय : विलासराव देशमुख ते राम प्रधान… ज्या काँग्रेसला पवारांनी वारंवार हरवलं, आज त्यांच्याच दारात जाण्याची वेळ

मुंबई : आगामी राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. महाविकास आघाडीत जागावाटपावरून रस्सीखेच सुरू असतानाच, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) अध्यक्ष शरद पवार यांच्यावर बोचरी टीका केली आहे. \”ज्या काँग्रेस उमेदवारांचा पवारांनी वेळोवेळी पराभव घडवून आणला, आज स्वतःसाठी त्याच काँग्रेसची मनधरणी करण्याची वेळ त्यांच्यावर

काव्यगत न्याय : विलासराव देशमुख ते राम प्रधान… ज्या काँग्रेसला पवारांनी वारंवार हरवलं, आज त्यांच्याच दारात जाण्याची वेळ Read More »

रासायनिक शेतीचे दुष्परिणाम घातक; राज्यपालांचे पर्यावरण तज्ज्ञांना कृषी क्षेत्राकडे लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन

मुंबई : कृषी क्षेत्रातील रसायनांच्या वाढत्या वापरामुळे शेती बरोबरच पर्यावरणाचीही मोठी हानी होत आहे. रासायनिक शेतीचे दुष्परिणाम घातक आहेत. त्यामुळे एकूणच पर्यावरण तर प्रदूषित होतच आहे, शिवाय गंभीर आजारांचे संकटही वाढत आहे. त्यामुळे पर्यावरण तज्ज्ञांनी जागतिक पर्यावरण रक्षणाचा विचार करताना कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्थेचाही विचार करावा, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी मुंबईतील जिओ

रासायनिक शेतीचे दुष्परिणाम घातक; राज्यपालांचे पर्यावरण तज्ज्ञांना कृषी क्षेत्राकडे लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन Read More »

छत्रपती शिवरायांनी दिलेला मार्ग हाच सर्वांगीण विकासाचा मार्ग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : छत्रपती शिवरायांनी दिलेला मार्ग हाच सर्वांगीण विकासाचा मार्ग आहे. त्यांच्या कार्याचा हा आदर्श जगासमोर ठेवण्यासाठी २०३० साली छत्रपती शिवाजी महाराजांची ४०० वी जयंती भव्य आणि जागतिक स्तरावर साजरी केली जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री

छत्रपती शिवरायांनी दिलेला मार्ग हाच सर्वांगीण विकासाचा मार्ग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

‘कुर्बानी देगा कौन?’ मविआच्या राज्यसभा आणि विधानपरिषद उमेदवारीवरून भाजपचा खोचक टोला!

मुंबई : आगामी राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये (MVA) जागावाटपाचा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. याच मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ‘आंखें’ चित्रपटातील एका जुन्या संवादाचा दाखला देत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. \”यांच्या मैत्रीत आता कुर्बानी नक्की कोण देणार?\” असा खोचक सवाल उपाध्ये

‘कुर्बानी देगा कौन?’ मविआच्या राज्यसभा आणि विधानपरिषद उमेदवारीवरून भाजपचा खोचक टोला! Read More »

नवी मुंबई विमानतळावर फेडेक्सच्या ‘कार्गो हब’चे भूमिपूजन; ६ हजार रोजगार अन् २,५०० कोटींची गुंतवणूक!

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे फेडेक्सच्या समर्पित कार्गो हबचे भूमिपूजन हा भारत, मुंबई आणि महाराष्ट्रासाठी पुरवठा व्यवस्थापन खर्च क्षेत्रातील ऐतिहासिक टप्पा असून, या सुविधेमुळे राज्यातील उद्योग, निर्यात आणि व्यापाराला मोठी चालना मिळणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. बदलत्या जागतिक व्यापार परिस्थितीत फेडेक्सने मुंबईत गुंतवणूक करण्याचा घेतलेला निर्णय हा

नवी मुंबई विमानतळावर फेडेक्सच्या ‘कार्गो हब’चे भूमिपूजन; ६ हजार रोजगार अन् २,५०० कोटींची गुंतवणूक! Read More »

मंत्रालयातील लाचखोरी प्रकरण: \”माझ्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील\” – नरहरी झिरवळ

मुंबई : मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभागातील लिपिक लाच घेताना रंगेहाथ पकडला गेल्याने अडचणीत आलेले मंत्री नरहरी झिरवळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. \”मंत्रिपद द्यायचे की काढायचे, हा सर्वस्व अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे, तेच माझ्या राजीनाम्याबाबत अंतिम निर्णय घेतील,\” असे खळबळजनक वक्तव्य झिरवळ यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. नेमके प्रकरण काय?अन्न

मंत्रालयातील लाचखोरी प्रकरण: \”माझ्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील\” – नरहरी झिरवळ Read More »

अल्पसंख्याक संस्था दर्जा प्रमाणपत्र प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा

मुंबई : अल्पसंख्याक समाजासाठी असलेला निधी प्रत्येक घटकाला सम प्रमाणात आणि पारदर्शकपणे वितरित व्हावा, तसेच विभागाचे कामकाज अधिक लोकाभिमुख व समाजाप्रती उत्तरदायी राहण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्याक विकास मंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिल्या. तसेच शाळांना चुकीच्या पद्धतीने अल्पसंख्याक दर्जाचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आलेल्या प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे

अल्पसंख्याक संस्था दर्जा प्रमाणपत्र प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा Read More »

और दिवार पर आज दिल की बात आ गई…

मालेगाव महानगरपालिकेत सत्तापालट होताच नवनियुक्त उपमहापौर शान-ए-हिंद निहाल अहमद यांनी आपल्या अधिकृत दालनात टिपू सुलतान याचे छायाचित्र लावल्याने शहरात नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. या निर्णयामुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून प्रशासकीय वर्तुळात तणावाचे वातावरण आहे. (हा लेख लिहीत असताना उपमहापौरांनी तो फोटो हटवल्याचे वृत्त आले आहे.) २००१ साली नाशिक जिल्ह्यातील \”मालेगाव\” शहरासाठी महानगरपालिका

और दिवार पर आज दिल की बात आ गई… Read More »

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा चेंडू आमदारांच्या कोर्टात! सुनेत्रा पवार उद्या घेणार ‘वन-टू-वन’ बैठक

मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) सर्व आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत बोलावली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असताना, सुनेत्रा पवार आता प्रत्येक आमदाराचे वैयक्तिक मत जाणून घेणार आहेत. या बैठकीमुळे विलीनीकरणाच्या प्रक्रियेला गती मिळणार की पेच वाढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा चेंडू आमदारांच्या कोर्टात! सुनेत्रा पवार उद्या घेणार ‘वन-टू-वन’ बैठक Read More »