News Bharati

श्री गुरु तेग बहादूर साहिब

वेदवाणी आणि गुरुवाणीच मानवतेला शांततेचा मार्ग दाखवतील – योगगुरू बाबा रामदेव

नवी मुंबई (खारघर) : \”आजच्या अस्थिर आणि संघर्षमय जगात शांततेचा खरा मार्ग हा वेदवाणी आणि गुरुवाणीतूनच मिळू शकतो. गुरु तेग बहादूर साहिबजींनी दिलेला त्याग, शौर्य आणि अध्यात्माचा वारसा हा केवळ एका समुदायासाठी नसून संपूर्ण मानवजातीला दिशा देणारा आहे,\” असा विश्वास योगगुरू स्वामी बाबा रामदेव यांनी व्यक्त केला. नवी मुंबईतील खारघर येथे आयोजित ‘हिंद दी चादर’ […]

वेदवाणी आणि गुरुवाणीच मानवतेला शांततेचा मार्ग दाखवतील – योगगुरू बाबा रामदेव Read More »

गुरु तेग बहादूर साहिबांसोबत शहादत देणारे तीन महान मोहयाल वीर

जेव्हा करवतीने शरीर चिरले जात होते, अग्नी कातडीला जाळत होता आणि उकळते तेल प्राणांची आहुती घेत होते, तेव्हा तीन नावे इतिहासात अजरामर झाली. भाई मती दास, भाई सती दास आणि भाई दयाला. मुघल सम्राट औरंगजेबाच्या साम्राज्यात, जिथे क्रूरतेचा अंमल होता आणि विवेक साखळदंडांनी जखडलेला होता, तिथे हे तीन वीर आपल्या गुरूंच्या सोबत धर्मासाठी उभे राहिले.

गुरु तेग बहादूर साहिबांसोबत शहादत देणारे तीन महान मोहयाल वीर Read More »

हिंद दी चादर : गुरु तेग बहादूर साहिब यांची हिंदू मोहयालांच्या धर्मरक्षणासाठी शहादत

भारताचा इतिहास हा अशा अनेक प्रसंगांनी भरलेला आहे, जिथे जेव्हा जेव्हा एका प्रदेशातील संस्कृतीवर संकट आले, तेव्हा संपूर्ण देशाचे अंतःकरण हेलावले. शरीराच्या एका भागाला वेदना झाल्यावर डोळ्यांत पाणी येते, तसेच काश्मीरमधील हिंदूंच्या वेदनांचा आक्रोश पंजाबमधील आनंदपूर साहिबला पोहोचला. १७ व्या शतकात मुघल सम्राट औरंगजेबाच्या जिहादी अत्याचारांनी जेव्हा काश्मीरची भूमी रक्ताळली होती, तेव्हा हिंदू मोहयाल ब्राह्मणांच्या

हिंद दी चादर : गुरु तेग बहादूर साहिब यांची हिंदू मोहयालांच्या धर्मरक्षणासाठी शहादत Read More »

खारघरमध्ये २८ फेब्रुवारी व १ मार्चला ऐतिहासिक ‘हिंद-दी-चादर’ सोहळा; २० लाख भाविकांची मांदियाळी

नवी मुंबई (खारघर) : अतुलनीय शौर्य आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी बलिदान देणारे नववे शीख गुरु, श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नवी मुंबईतील खारघर येथील ओवे मैदानावर २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६ रोजी ‘हिंद-दी-चादर’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून १८ ते २० लाख भाविक

खारघरमध्ये २८ फेब्रुवारी व १ मार्चला ऐतिहासिक ‘हिंद-दी-चादर’ सोहळा; २० लाख भाविकांची मांदियाळी Read More »

६२ एकर मैदान, २० लाख भाविक; ‘हिंद-दी-चादर’ सोहळ्यासाठी नियोजन समित्या सज्ज!

नवी मुंबई (खारघर) : ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षाचे औचित्य साधून खारघरमध्ये आयोजित होणाऱ्या भव्य सोहळ्याची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर, सर्व नियोजन समित्यांची महत्त्वाची बैठक नुकतीच यशस्वीपणे संपन्न झाली. २० लाख भाविकांची उपस्थिती अपेक्षितखारघरमधील सेक्टर २९ येथील ओवे मैदानावर सुमारे ६२ एकर विस्तीर्ण

६२ एकर मैदान, २० लाख भाविक; ‘हिंद-दी-चादर’ सोहळ्यासाठी नियोजन समित्या सज्ज! Read More »

सिर दिया, पर सिर्र-ए-इमान न दिया; शीखांचा वारसा आणि निरंतर शहीदी परंपरा

शीख धर्म हा केवळ आध्यात्मिक मार्ग नाही, तर तो न्याय, सत्य आणि धर्मासाठी शहीदी देण्याची एक अतुलनीय गाथा आहे. गुरु नानक देव यांनी लावलेला हा समतेचा आणि ‘एक ओंकार’ चा वृक्ष, वेळोवेळी स्वतःच्या रक्ताने सिंचन करून वाढवण्यात आला आहे. या महान परंपरेतील सर्वात तेजस्वी तारे म्हणजे शीखांचे नववे गुरु, ‘गुरु तेग बहादूर जी’, ज्यांनी धर्माच्या

सिर दिया, पर सिर्र-ए-इमान न दिया; शीखांचा वारसा आणि निरंतर शहीदी परंपरा Read More »

हिंद-दी-चादर : श्री गुरु तेग बहादूर साहिबजींच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त सातारा जिल्ह्यात मोफत आरोग्य शिबिरांचा जागर!

सातारा : ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नवी मुंबईतील खारघर येथे २८ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ या कालावधीत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक सोहळ्याची व्याप्ती लक्षात घेऊन, आरोग्य विभागाने सातारा जिल्ह्यात विशेष ‘आरोग्य सप्ताह’ आणि मोफत आरोग्य शिबिरांचे नियोजन केले आहे. जिल्ह्यातील या रुग्णालयांमध्ये

हिंद-दी-चादर : श्री गुरु तेग बहादूर साहिबजींच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त सातारा जिल्ह्यात मोफत आरोग्य शिबिरांचा जागर! Read More »

खालसाचे अग्रणी ‘भाई दया सिंग’ जी यांचा अद्वितीय त्यागमय जीवनगाथा

शीख इतिहासातील प्रत्येक पान हे शौर्य, बलिदान आणि ईश्वरी श्रद्धेने व्यापलेले आहे. या तेजस्वी इतिहासात ३० मार्च १६९९ हा दिवस सुवर्णाक्षरांनी कोरला गेला आहे. या दिवशी एका नव्या पंथाचा उदय झाला, या पंथाने एका अशा समर्पित पिढीचा जन्म दिला ज्यांनी अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देण्यासही मागेपुढे पाहिले नाही. या क्रांतीचे सर्वात मोठे नायक आणि

खालसाचे अग्रणी ‘भाई दया सिंग’ जी यांचा अद्वितीय त्यागमय जीवनगाथा Read More »

सिकलकर समाजाचा शौर्य आणि कारागिरीचा अभेद्य वारसा

शीख धर्माचा इतिहास अध्यात्मिक शिकवणीचा असा प्रवास आहे ज्यात मानवी हक्कांसाठी दिलेल्या प्रखर लढ्याचा आणि अतुलनीय बलिदानाचा वारसा आहे. जेव्हा आपण खालसा सैन्याच्या पराक्रमाच्या गोष्टी ऐकतो, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर तळपत्या तलवारी आणि ‘जो बोले सो निहाल’चा जयघोष करणारे वीर उभे राहतात. परंतु, या वीर सैनिकांच्या हातात ज्या तलवारी होत्या आणि त्यांच्या देहाचे रक्षण करणारी जी

सिकलकर समाजाचा शौर्य आणि कारागिरीचा अभेद्य वारसा Read More »

खेडोपाडी घुमणार ‘हिंद-दी-चादर’ गुरुजींचा संदेश; नांदेडमध्ये १० लाख भाविक येणार!

नांदेड : शीख धर्माचे नववे गुरु ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या ऐतिहासिक ‘शहीदी समागम’ सोहळ्यासाठी नांदेड नगरी सज्ज होत आहे. या महासोहळ्याचे विचार खेडोपाडी आणि प्रत्येक घरापर्यंत पोहोचले पाहिजेत, असे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. येत्या २४ आणि २५ जानेवारी रोजी नांदेडमध्ये होणाऱ्या या भव्य सोहळ्याच्या

खेडोपाडी घुमणार ‘हिंद-दी-चादर’ गुरुजींचा संदेश; नांदेडमध्ये १० लाख भाविक येणार! Read More »