News Bharati

सामाजिक

पॉक्सो कायदा, फाशी, फास्ट ट्रॅक न्यायालय

भोरमध्ये नुकत्याच झालेल्या चिमुकलीवरील अत्याचाराने जनक्षोभ उसळला जो अत्यंत रास्त आहे. ४ वर्षाच्या बालिकेवर बलात्कार करणारा नराधम ६५ वर्षाचा सराईत, तत्सम आरोपांखाली अटक झालेला विकृत गुन्हेगार होता. विकृती आणि गुन्हेगारांपासून संरक्षण देणे, समाजात शिक्षेचा धाक निर्माण करणे की जेणेकरून इतर व्यक्तींना जरब बसून गुन्हे करण्यापासून ते परावृत्त होतील हे कायद्याचे, न्यायसंस्थेचे आणि सरकारचे काम आहे. […]

पॉक्सो कायदा, फाशी, फास्ट ट्रॅक न्यायालय Read More »

१८५७ चा क्रांतीसूर्य: वीर बाबुराव पुल्लेसूर शेडमाके यांच्या बलिदानाचा इतिहास

भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास हा फक्त महानगरांतील चळवळींपुरता मर्यादित नाही, तर तो दऱ्याखोऱ्यांत आणि घनदाट जंगलांत राहणाऱ्या वनपुत्रांच्या रक्तानेही लिहिला गेला आहे. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात महाराष्ट्रातील चंद्रपूर-गडचिरोलीच्या भूमीतून एका तरुणाने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. तो महान योद्धा म्हणजे ‘वीर बाबुराव पुल्लेसूर शेडमाके’. आजच्या पिढीला बाबुरावांचा हा प्रेरणादायी लढा माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे.

१८५७ चा क्रांतीसूर्य: वीर बाबुराव पुल्लेसूर शेडमाके यांच्या बलिदानाचा इतिहास Read More »

समरसतेचा नवा आयाम आणि दलित चळवळीचे स्थित्यंतर

‘समरसता’ ही संकल्पना आता केवळ संघ परिवारापुरती मर्यादित न राहता, दलित समाजातही रुजू लागली आहे. रामदास आठवले यांनी घोषित केलेला ‘समरसता मार्च’ हे याचे द्योतक आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, दलित चळवळीने (विशेषतः दलित पँथरने) प्रस्थापित हिंदू, समाजवादी आणि कम्युनिस्ट विचारधारांच्या मक्तेदारीविरुद्ध संघर्ष करून आपली एक ‘समांतर व्यवस्था’ उभी केली. या व्यवस्थेने दलित साहित्य, कला आणि संस्कृतीला स्वतंत्र

समरसतेचा नवा आयाम आणि दलित चळवळीचे स्थित्यंतर Read More »

पुणे, कोल्हापूर, अहिल्यानगरमध्ये १ मे रोजी ‘विजयघोष’

‘राष्ट्र सेविका समिती’च्या स्थापनेला यंदा ९० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने राष्ट्र सेविका समितीच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत शारीरिक – घोष (बॅंड) विभागामार्फत शुक्रवारी, १ मे २०२६ रोजी भव्य ‘विजयघोष-२०२६’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे एकाच दिवशी आणि एकाच वेळी चार वेगवेगळ्या ठिकाणी ‘घोष प्रतियोगिता’ आणि ‘सांघिक वादन’ होणार आहे.

पुणे, कोल्हापूर, अहिल्यानगरमध्ये १ मे रोजी ‘विजयघोष’ Read More »

आहे मनोहर तरी – विष्णू शेगडी

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या काही भागांत थोडी गॅस टंचाई निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने उपलब्ध गॅस साठ्यांच्या वितरणात व्यावसायिक गॅस पुरवठ्यापेक्षा घरगुती गॅस पुरवठ्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा अत्यंत स्तुत्य असा व्यावहारिक निर्णय घेतला आहे. त्यामुळे काही रेस्टॉरंटमध्ये तात्पुरत्या स्वरूपात आपल्या मेन्यूतील काही पदार्थ कमी केले आहेत किंवा काही पदार्थ बंद केले आहेत.

आहे मनोहर तरी – विष्णू शेगडी Read More »

पता नहीं वे कहां हैं, अतीत में समा गए दीपक मोहम्मद!

उत्तराखंडातील कोटद्वारमधील वकील अहमद यांचे ‘बाबा स्कूल ड्रेस’ नावाचे दुकान आहे. २६ जानेवारी २०२६ रोजी स्थानिक बजरंग दलाचे कार्यकर्ते \”बाबा स्कूल ड्रेस\” दुकानात पोचले आणि त्यांनी दुकानाचे मालक वकील अहमद यांना दुकानाच्या नावातील \”बाबा\” हे हिंदुदर्शक नाव काढून टाकायला सांगितले. उत्तर भारतात हिंदू समाज साधुसंतांना बाबा म्हणतो. देवराह बाबांपासून बुलडोझरबाबांपर्यंत उत्तर भारतातील अनेक बाबा प्रसिद्ध

पता नहीं वे कहां हैं, अतीत में समा गए दीपक मोहम्मद! Read More »

नेत्रदान श्रीलंकेचा अभिमान

२५ मे १९६४ ला श्रीलंकेत \”वेसक दिवस\” (Vesak Day) साजरा केला जात होता. वेसक दिवस म्हणजे बुद्ध पौर्णिमा. आणि त्याच दिवशी श्रीलंकेने चहाच्या थर्मासमध्ये बर्फात व्यवस्थित पॅक करून विमानाने एका व्यक्तीच्या हस्ते आपला पहिला \”नेत्रदानाच्या डोळ्यांचा पहिला संच\” सिंगापूरला रवाना केला. या ऐतिहासिक घटनेची शिल्पकार होती श्रीलंका आय डोनेशन सोसायटी. ७०% बौद्ध पंथीय असलेल्या श्रीलंकेत पुढच्या

नेत्रदान श्रीलंकेचा अभिमान Read More »

स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे वेगाने परिवर्तन होईल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

मुंबई : महाराष्ट्र विविध क्षेत्रांसह देशाच्या प्रगतीमध्ये वेगळा ठसा उमटवीत आहे. राज्याच्या प्रगतीचा वेग असाच कायम ठेवून राज्य शासनाच्या विविध स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे वेगाने परिवर्तन होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन सोबत करण्यात आलेल्या करारावेळी व्यक्त केला. टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन सोबत झालेल्या करारामुळे

स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे वेगाने परिवर्तन होईल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास Read More »

सद्गुण विकृतीचा कळस अमरकोटचे राजपूत सोढा राणा

मुघल शासक अकबराचा जन्म हुमायून आणि हमिदा बानो यांच्या पोटी १५ ऑक्टोबर १५४२ रोजी सिंध प्रांतातील अमरकोट संस्थानाच्या (जहागीर) किल्ल्यात झाला. हुमायून शेरशाह सूरीकडून पराभूत होऊन निर्वासित म्हणून भटकत असताना अमरकोटचे तत्कालीन हिंदू शासक राणा प्रसाद यांनी त्याला आपल्या किल्ल्यात आश्रय दिला होता. तिथेच अकबराचा जन्म झाला. तेव्हापासून अमरकोटच्या या सोढा राजपूत राणांचे इस्लामी शासक

सद्गुण विकृतीचा कळस अमरकोटचे राजपूत सोढा राणा Read More »

बस्तरचा बदलता चेहरा आणि ‘पद्म’ सन्मान

डॉ. गोडबोले दांपत्याच्या संघर्षाची आणि विश्वासाची कहाणी नुकताच केंद्र सरकारतर्फे या वर्षीचा ‘पद्म’ पुरस्कार जाहीर झाला आणि त्यात डॉ. रामचंद्रजी व सुनीताताई गोडबोले या दांपत्याच्या नावाचा समावेश झाला. हा पुरस्कार जाहीर होत असतानाचा प्रसंग अत्यंत विलक्षण आणि योगायोगाचा होता. काही दिवसांपूर्वी ‘इंडियन एक्सप्रेस’मध्ये ‘When a highway comes to Bastar’ नावाचा एक सविस्तर लेख प्रसिद्ध झाला

बस्तरचा बदलता चेहरा आणि ‘पद्म’ सन्मान Read More »