News Bharati

निवडणुका

अमरावती : \”आश्वासनं नाही, काम बोलतं!\” फडणवीसांनी मांडलं विकासाचं व्हिजन

अमरावती : \”आम्ही केवळ पोकळ आश्वासने देत नाही, तर केलेल्या कामांच्या जोरावर मते मागत आहोत. अमरावतीचा सर्वांगीण विकास हेच आमचे व्हिजन आहे. येत्या १५ तारखेला अमरावतीकरांनी भाजपाची जबाबदारी स्वीकारावी, पुढची ५ वर्षे शहराच्या विकासाची संपूर्ण जबाबदारी आमची असेल,\” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीकरांना साद घातली. अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित भव्य ‘रोड शो’मध्ये […]

अमरावती : \”आश्वासनं नाही, काम बोलतं!\” फडणवीसांनी मांडलं विकासाचं व्हिजन Read More »

महानगरपालिकेवर भाजपा-शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी चंद्रपूरकर सज्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

चंद्रपूर : \”चंद्रपूरचा चेहरामोहरा बदलण्याचे काम महायुती सरकारने प्रामाणिकपणे केले आहे. आता या शहराला महाराष्ट्रातील एक आधुनिक शहर बनवण्यासाठी चंद्रपूरकर सज्ज झाले असून, महानगरपालिकेवर भाजपा-शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही,\” असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. चंद्रपुरात आयोजित भव्य ‘विजय संकल्प यात्रे’त उसळलेल्या अलोट जनसागराला संबोधित करताना ते बोलत होते. महाकालीच्या चरणी नतमस्तक

महानगरपालिकेवर भाजपा-शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी चंद्रपूरकर सज्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

\”वचननामा नाही, हा तर ‘अपचननामा’!\” आशिष शेलारांनी करमाफीवरून ठाकरेंना घेरलं

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मालमत्ता कर माफीचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. उद्धव ठाकरे गटाने प्रसिद्ध केलेल्या वचननाम्यावर भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी जळजळीत टीका केली आहे. \”आमच्या जुन्या मागण्या चोरून तुम्ही वचननामा काढलात, तर तो मुंबईकरांसाठी ‘वचननामा’ नाही तर तुम्हाला होणारा ‘अपचननामा’ ठरेल,\” अशा शब्दांत शेलारांनी ठाकरेंना

\”वचननामा नाही, हा तर ‘अपचननामा’!\” आशिष शेलारांनी करमाफीवरून ठाकरेंना घेरलं Read More »

\”मत हे देशासाठी, द्वेषासाठी नाही..!\” भाजपचा उबाठा-काँग्रेसवर ‘सर्जिकल स्ट्राईक’

मुंबई : मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली असून, आता खऱ्या अर्थाने प्रचाराचा धुराळा उडणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी \”मत हे देशासाठी, द्वेषासाठी नाही\” असा नवा नारा देत विरोधकांवर जोरदार प्रहार केला आहे. आगामी ९ दिवस हे केवळ निवडणुका नसून महाराष्ट्राच्या भविष्यातील ‘भूमिकेचा मुद्दा’ असल्याचे त्यांनी

\”मत हे देशासाठी, द्वेषासाठी नाही..!\” भाजपचा उबाठा-काँग्रेसवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ Read More »

अधिकृतपणे सांगतो…\” मुंबईच्या महापौराबाबत देवेंद्र फडणवीसांची सिंहगर्जना

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण कमालीचे तापले असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौराच्या मुद्द्यावर अत्यंत स्पष्ट आणि रोखठोक भूमिका मांडली आहे. \”मी या पक्षाचा नेता म्हणून अधिकृतपणे सांगतो की, मुंबईचा पुढचा महापौर हा ‘मराठी’ आणि ‘हिंदू’ च असेल,\” अशा शब्दांत फडणवीस यांनी विरोधकांना चारीमुंड्या चित केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत

अधिकृतपणे सांगतो…\” मुंबईच्या महापौराबाबत देवेंद्र फडणवीसांची सिंहगर्जना Read More »

पुण्यात विजयाचा ‘शंखनाद’! भाजपचे दोन नगरसेवक बिनविरोध; मुरलीधर मोहोळ म्हणाले, \”हा तर…!

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदानापूर्वीच भारतीय जनता पार्टीने विजयाचा गुलाल उधळला आहे. प्रभाग क्र. ३५ मधून भाजपचे उमेदवार मंजुषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे. या ऐतिहासिक यशाचे स्वागत करताना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी, \”हा विजय म्हणजे पुण्यातील विकास आणि सुशासनाला मिळालेली ठोस पावती आहे,\” अशा शब्दांत आनंद

पुण्यात विजयाचा ‘शंखनाद’! भाजपचे दोन नगरसेवक बिनविरोध; मुरलीधर मोहोळ म्हणाले, \”हा तर…! Read More »

फडणवीस-चव्हाण यांचा ‘मास्टरस्ट्रोक’! महापालिकेत भाजप-महायुतीचा धमाका; ६८ नगरसेवक बिनविरोध!

मुंबई : राज्यात मिनी विधानसभा मानल्या जाणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या रणांगणात भाजपने मतदानापूर्वीच विरोधकांना चारीमुंड्या चित केले आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप आणि महायुतीचे तब्बल ६८ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. या विजयामुळे भाजपचा राज्यात मोठा विक्रम प्रस्थापित झाला असून, महायुतीने निवडणुकीच्या सुरुवातीलाच विजयाचा गुलाल उधळला आहे. ८ महापालिकांमध्ये ‘कमळ’ जोरातसध्या

फडणवीस-चव्हाण यांचा ‘मास्टरस्ट्रोक’! महापालिकेत भाजप-महायुतीचा धमाका; ६८ नगरसेवक बिनविरोध! Read More »

ठाकरे गटाला ‘हिंदुद्वेषाचा वास’? उपाध्येंचा जळजळीत वार

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपने आता ‘हिंदुत्व’ आणि ‘विकासाच्या’ मुद्द्यावरून विरोधकांना पूर्णपणे घेरले आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एका पोस्टद्वारे उबाठा शिवसेना, काँग्रेस आणि एमआयएम यांच्यावर प्रहार केला आहे. \”कुराणावर हात ठेवून शपथ घेणारा ‘ममदानी’ मुंबईत हवा म्हणून लांगूलचालन सुरू झाले आहे,\” अशा शब्दांत उपाध्येंनी धोक्याचा इशारा दिला आहे. मराठी महापौर

ठाकरे गटाला ‘हिंदुद्वेषाचा वास’? उपाध्येंचा जळजळीत वार Read More »

पुण्याचा महापौर पुन्हा भाजपचाच होणार! मुरलीधर मोहोळ यांचा ठाम विश्वास

पुणे: \”पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात गेल्या ११ वर्षांत अभूतपूर्व विकासकामे झाली आहेत. पुणेकर नेहमीच विकासाच्या राजकारणाला साथ देतात, त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत पुण्याचा महापौर पुन्हा भारतीय जनता पक्षाचाच होईल,\” असा ठाम विश्वास केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला. पुण्यात भाजपच्या ‘मीडिया सेंटर’च्या उद्घाटनानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत

पुण्याचा महापौर पुन्हा भाजपचाच होणार! मुरलीधर मोहोळ यांचा ठाम विश्वास Read More »

मुंबईत ठाकरेंना मोठा सुरुंग! बड्या महिला नेत्याने सोडली साथ, थेट भाजपमध्ये प्रवेश

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उद्धव ठाकरे गटाला मोठा राजकीय फटका बसला आहे. पक्षाच्या उपनेत्या आणि मुंबई सिनेट सदस्या शीतल देवरुखकर यांनी तिकीट न मिळाल्याने संताप व्यक्त करत शिवबंधन तोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शीतल देवरुखकर या मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक ५१ मधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होत्या. त्यांनी या मतदारसंघात मोठी तयारीही केली होती.

मुंबईत ठाकरेंना मोठा सुरुंग! बड्या महिला नेत्याने सोडली साथ, थेट भाजपमध्ये प्रवेश Read More »