News Bharati

Vinayak A

मंकीपॉक्सच्या सर्व संशयित प्रकरणांची पडताळणी करण्याचे केंद्राचे निर्देश

मंकीपॉक्स रोगाच्या सर्व संशयित प्रकरणांची पडताळणी आणि चाचण्या करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. या रोगाबाबत जनतेत असलेली भीती दूर करण्यासाठी तसंच जनजागृतीसाठी उपाय योजावेत, असं केंद्रानं राज्यांना सांगितलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं एकंदर परिस्थितीवर बारकाईनं लक्ष असून, याबाबत सर्व राज्यांना शक्य ती सगळी मदत केली जाईल, असं आरोग्य मंत्रालयाचे […]

मंकीपॉक्सच्या सर्व संशयित प्रकरणांची पडताळणी करण्याचे केंद्राचे निर्देश Read More »

राज्यात आजपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेटअभियान

शासनाच्या १० महत्त्वाच्या योजनांची माहिती घरोघरी देण्यासाठी राज्यात आजपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाला सुरुवात होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे १५ कुटुंबांची भेट घेऊन अभियानाचा शुभारंभ करणार आहेत. काल मुंबईत पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी या अभियानाबाबत माहिती दिली. या अभियानात शिवसैनिक दररोज १५ कुटुंबाची भेट घेऊन ज्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचली नाही, त्यांना योजनेत

राज्यात आजपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेटअभियान Read More »

जीएसटी परिषदेची (GST Council) ५४ वी बैठक केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सुरु

वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी परिषदेची (GST Council) चोपन्नावी बैठक आज नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी आणि सर्वराज्यांचे अर्थमंत्री बैठकीला उपस्थित आहेत. गेल्या जून महिन्यात झालेल्या जीएसटी परिषदेच्याबैठकीत लोखंड, पोलाद आणि ऍल्युमिनियमच्या दुधाच्या कॅनवर बारा टक्के समान जीएसटी दर लागूकरण्याची शिफारस करण्यात आली होती. भारतीय

जीएसटी परिषदेची (GST Council) ५४ वी बैठक केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सुरु Read More »

ऊर्जा विभागामधील कंत्राटी कामगारांच्या वेतनात 19% वाढ

मुंबई : वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांच्या वेतनात घसघशीत वाढ केली आहे. राज्याच्या विविध भागातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या मूळ वेतनामध्ये १९ टक्के वाढ करण्यात येत असल्याची घोषणा ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत केली. ही वाढ मार्च 2024 पासून लागू करण्यात आली

ऊर्जा विभागामधील कंत्राटी कामगारांच्या वेतनात 19% वाढ Read More »

नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठाची स्थापना, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ८०% आरक्षण

महाराष्ट्र सरकारने आदिवासी समुदायासाठी शैक्षणिक सुविधा वाढविण्यासाठी नाशिकमध्ये एक आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. या विद्यापीठात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ८०% आरक्षण असेल, तर उर्वरित २०% स्थाने इतर विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवली जाणार आहेत. हे निर्णय राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी नाशिक येथे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी संवाद साधताना जाहीर केला. हे विद्यापीठ आदिवासी समुदायाच्या शैक्षणिक, सांस्कृतिक

नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठाची स्थापना, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ८०% आरक्षण Read More »

बावनकुळे यांची स्पष्ट भूमिका; अपघात प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई व्हावी

नागपूर : नागपूरमध्ये रविवारी रात्री एका भरधाव वेगाने आलेल्या ऑडी कारने शहरात अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडेबारा वाजता हा अपघात घडला. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या अपघातात दोघं जखमी झाले असून गाड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे ज्या कारने हा अपघात झाला, त्या कारची नोंदणी भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar

बावनकुळे यांची स्पष्ट भूमिका; अपघात प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई व्हावी Read More »

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे उपाय सुचविण्यासाठी हायकोर्टाकडून सात सदस्यीय समिती स्थापन

शाळा, शालेय आवार तसेच शाळेसाठीच्या वाहतुकीदरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे उपाय सुचविण्यासाठीमुंबई उच्च न्यायालयाने सात सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. या समितीचे नेतृत्व निवृत्तन्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती शालिनी फणसळकर-जोशी या करणार आहेत. बदलापूर येथे अल्पवयीन विद्यार्थिनींवरील लैंगिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर लहानग्यांच्या सुरक्षेचामुद्दा ऐरणीवर आला. या घटनेची दखल घेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे उपाय सुचविण्यासाठीन्यायालयाने समितीची स्थापना केली आहे. या

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे उपाय सुचविण्यासाठी हायकोर्टाकडून सात सदस्यीय समिती स्थापन Read More »

विश्वकर्मा कॉलेजच्या आर्यन खोळगडेचे बेल्जियममध्ये आंतरराष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेत यश

पुणे : पुण्यातील विश्वकर्मा कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज (VCACS), कोंढवा, आपल्या शैक्षणिक यशासाठीच नाही, तर विद्यार्थ्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागासाठी दिलेल्या पाठिंब्यामुळे चर्चेत आहे. कॉलेजने विद्यार्थ्यांच्या विविध क्षेत्रातील कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी खास प्रयत्न केले आहेत, ज्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारा दुसऱ्या वर्षाचा बीएससीचा विद्यार्थी आर्यन

विश्वकर्मा कॉलेजच्या आर्यन खोळगडेचे बेल्जियममध्ये आंतरराष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेत यश Read More »

हॉकी: भारताने मेन्स एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जपानला ५-१ अंतराने हरविले

भारताच्या पुरुष हॉकी संघाने चीनमध्ये आयोजित मेन्स एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जपानला ५-१ अंतराने पराभूत केले. हा भारतासाठी दुसरा सामना होता, ज्यामुळे भारताने आपल्या यशाचा मार्ग सुरू ठेवला आहे. सुखजीत सिंह यांनी सामन्याच्या दुसऱ्या मिनिटालाच भारतासाठी मार्ग काढला आणि अखेरच्या मिनिटाला आणखी एक गोल करत सामना विजयी केला. अभिषेक, संजय आणि उत्तम सिंह यांनीही गोल करत

हॉकी: भारताने मेन्स एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जपानला ५-१ अंतराने हरविले Read More »

समृद्धी महामार्ग पुण्याला जोडणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या विस्तारात आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे पुणे शहराला जोडण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या हालचालीतून समोर आला आहे. या निर्णयाने महाराष्ट्राच्या आर्थिक व सामाजिक विकासाला चालना मिळणार आहे. समृद्धी महामार्ग हा फक्त मुंबई आणि नागपूर जोडणारा नाही तर आता पुणेला देखील जोडणारा महामार्ग बनणार आहे. हा महामार्ग पूर्णतः नवीन मार्ग असून, वाहतूकीच्या वर्दळीला सामोरे

समृद्धी महामार्ग पुण्याला जोडणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय Read More »