नवी मुंबईत साकारणार श्री गुरु तेग बहादूर साहिबजींच्या नावाने अत्याधुनिक रुग्णालय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
नवी मुंबई (खारघर) : ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांनी धर्म आणि मानवतेच्या रक्षणासाठी दिलेले सर्वोच्च बलिदान हे जगासाठी सदैव प्रेरणादायी आहे. या महान बलिदानाला खऱ्या अर्थाने मानवंदना देण्यासाठी नवी मुंबई परिसरात गुरुजींच्या नावाने एक अत्याधुनिक आणि सर्वसोयींनी युक्त रुग्णालय उभारण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. अल्पसंख्याक विकास […]