जितेंद्र आव्हाडांच्या पत्नीने केली ओसामा बिन लादेनची डॉ. अब्दुल कलाम यांच्याशी तुलना; ऋता आव्हाड यांनी उधळली मुक्ताफळे
ठाणे, महाराष्ट्र – राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी दहशतवादी ओसामा बिन लादेनची तुलना भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्याशी करून राजकीय वादाला तोंड फोडले आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या विधानसभा मतदारसंघातील मुंब्रा या मुस्लिम बहुल भागामध्ये एका शैक्षणिक कार्यक्रमात बोलताना रुता आव्हाड यांनी विद्यार्थ्यांना ओसामा बिन लादेन […]