News Bharati

राजकीय

राज ठाकरे संतापले! ‘त्या’ युतीच्या चर्चांवर थेट माध्यमांना झापले… नेमकं काय घडलं?

मुंबई : ‘विजयी मेळाव्या’नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) नवा रंग भरताना दिसतोय. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) (Shivsena UBT) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या दोन्ही नेत्यांमधील जवळीक आणि संवाद वाढल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यामुळे, संभाव्य युतीची चर्चा पुन्हा ऐरणीवर आली […]

राज ठाकरे संतापले! ‘त्या’ युतीच्या चर्चांवर थेट माध्यमांना झापले… नेमकं काय घडलं? Read More »

मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करणार – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : मुक्ताईनगर (Muktainagar) तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिले. विधानभवनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan), आमदार चंद्रकांत पाटील, आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकरी

मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करणार – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे Read More »

या पक्षामध्येही ‘शिंदे-ठाकरे’ पॅटर्नची पुनरावृत्ती? या आमदाराने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवली!

गंगाखेड : गंगाखेड (Gangakhed) विधानसभा मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुट्टे (Ratnakar Gutte), जे राष्ट्रीय समाज पक्षाचे (Rashtriya Samaj Paksha) एकमेव आमदार म्हणून ओळखले जातात, त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट्सवरून सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. ५ जुलै रोजी मुंबईत आयोजित \”मराठी माणसांचा विजयी मेळावा\” या कार्यक्रमात राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर (Mahadev Jankar) उपस्थित होते.

या पक्षामध्येही ‘शिंदे-ठाकरे’ पॅटर्नची पुनरावृत्ती? या आमदाराने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवली! Read More »

‘मराठीसाठी लढायचे असेल तर मोहम्मद अली रोडवर जा, दाढीवाल्यांना सांगा!; नितेश राणे कडाडले

ठाणे : ठाण्यातील भाईंदर परिसरात मराठीत (Marathi) बोलण्यास नकार दिल्याच्या कारणावरून एका फूड स्टॉल मालकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने महाराष्ट्रातील (Maharashtra) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेचा भाजप (BJP) नेते आणि मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. माध्यमांशी बोलताना राणे म्हणाले, \”हे लोक फक्त गरीब हिंदूंवरच का

‘मराठीसाठी लढायचे असेल तर मोहम्मद अली रोडवर जा, दाढीवाल्यांना सांगा!; नितेश राणे कडाडले Read More »

भाजपकडून पक्षसंघटना आणि सरकारमध्ये समन्वय साधण्यासाठी राज्यभर १७ जिल्ह्यांसाठी संपर्क मंत्री नियुक्त!

मुंबई : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र (BJP Maharashtra) प्रदेशच्या वतीने पक्ष संघटना आणि राज्य सरकार यांच्यात समन्वय साधण्यासाठी राज्य सरकारमधील मंत्र्यांची जिल्हा संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी या संपर्क मंत्र्यांची यादी जाहीर केली असून, राज्यभरातील १७ जिल्ह्यांसाठी भाजपने संपर्क मंत्र्यांची नियुक्ती केली आहे. जिल्हाशः

भाजपकडून पक्षसंघटना आणि सरकारमध्ये समन्वय साधण्यासाठी राज्यभर १७ जिल्ह्यांसाठी संपर्क मंत्री नियुक्त! Read More »

राज्यसभेच्या तालिका अध्यक्षपदी सुनेत्रा पवार! पहिल्याच टर्ममध्ये मोठी जबाबदारी

महाराष्ट्र : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी तथा राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार (MP Sunetra Pawar) यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी त्यांना राज्यसभेत पाठवले होते. पहिल्याच कार्यकाळात त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तालिका अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित

राज्यसभेच्या तालिका अध्यक्षपदी सुनेत्रा पवार! पहिल्याच टर्ममध्ये मोठी जबाबदारी Read More »

…तर लगेच राजीनामा देणार! धनंजय मुंडेंची स्पष्ट भूमिका

बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. या हत्याकांडात वाल्मिक कराडसह आठ जणांना अटक करण्यात आली असून, कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. वाल्मिक कराड हे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय असल्याने

…तर लगेच राजीनामा देणार! धनंजय मुंडेंची स्पष्ट भूमिका Read More »

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

महाराष्ट्र : राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपालिका, तसेच महानगरपालिका निवडणुकांच्या वेळापत्रकासंदर्भातील निर्णय या सुनावणीत होण्याची अपेक्षा आहे. गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. यामध्ये ओबीसी आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असून, सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. याआधी २२ जानेवारीला सुनावणी होणार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी Read More »

अजित पवार बीडचे पालकमंत्री; पंकजा मुंडे म्हणाल्या, \”बीडचे पालकमंत्रीपद मिळाले असते तर…\”

बीड : महायुती सरकारचा 18 जानेवारी रोजी पालकमंत्र्यांची (Guardian Minister) यादी जाहीर करण्यात आली आहे. बीड (Beed) जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कुणाला मिळेल याकडे सर्वांचंच लक्ष होतं. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन धनंजय मुंडे व पंकजा मुंडे (Dhananjay Munde and Pankaja Munde) यांना लक्ष्य केले जात आहे. त्यांना पालकमंत्रीपद मिळू नये विरोधकांचा सूर होता. परिणामी उपमुख्यमंत्री

अजित पवार बीडचे पालकमंत्री; पंकजा मुंडे म्हणाल्या, \”बीडचे पालकमंत्रीपद मिळाले असते तर…\” Read More »

पालकमंत्री – सह-पालकमंत्र्यांची यादी जाहीर, तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? पहा संपूर्ण यादी

महाराष्ट्र : महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप पार पडल्यानंतर पालकमंत्र्यांची (Guardian Minister) आणि सह – पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. 18 जानेवारी रोजी ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोपवण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे ठाणे आणि मुंबई

पालकमंत्री – सह-पालकमंत्र्यांची यादी जाहीर, तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? पहा संपूर्ण यादी Read More »