News Bharati

बातम्या

पूंछ येथे रस्ते अपघातात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद, राज्य सरकारकडून १ कोटींची मदत जाहीर

मुंबई : जम्मू-कश्मीरमधील पूंछ येथे कर्तव्य बजावत असताना झालेल्या रस्ते अपघातात राज्यातील दोन जवानांचा मृत्यू झाला. या शूर जवानांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने १ कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी या जवानांना आदरांजली अर्पण केली आहे. या अपघातात भारतीय सैन्यदलाचे पाच जवान शहीद झाले. यामध्ये मराठा रेजिमेंटचे नायक […]

पूंछ येथे रस्ते अपघातात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद, राज्य सरकारकडून १ कोटींची मदत जाहीर Read More »

‘वीर बालदिवस’ निमित्ताने मुख्यमंत्र्यांचे गुरु गोविंद सिंहजी यांच्या साहिबजाद्यांना विनम्र अभिवादन

मुंबई : मुंबईतील सागर या आपल्या शासकीय निवासस्थानी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी ‘वीर बालदिवस’ (Veer Bal Diwas) निमित्ताने साहिबजादे बाबा जोरावार सिंह आणि बाबा फतेह सिंह यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.यावेळी, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. भारतात दरवर्षी २६ डिसेंबर रोजी ‘वीर बाल दिवस’ साजरा केला जातो. हा

‘वीर बालदिवस’ निमित्ताने मुख्यमंत्र्यांचे गुरु गोविंद सिंहजी यांच्या साहिबजाद्यांना विनम्र अभिवादन Read More »

अटलजींच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आदरांजली

नागपूर : दिवंगत माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी आज नागपूरच्या रामगिरी येथील शासकीय निवासस्थानी अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती \”सुशासन दिन\” म्हणून साजरी केली जाते. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने जागतिक पटलावर आपली ओळख

अटलजींच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आदरांजली Read More »

पुण्यात उद्योगांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी उदय सामंत यांचे निर्देश

पुणे : उद्योगांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने सर्व संबंधित विभागांशी समन्वय साधून आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिले. त्यांनी आश्वासन दिले की, रस्ते, वाहतूक कोंडी, पार्किंग समस्यांसह आवश्यक तेथे उद्योगांना जागा व पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. पिंपरी-चिंचवड येथे आयोजित उद्योग विभागाच्या आढावा बैठकीत ते

पुण्यात उद्योगांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी उदय सामंत यांचे निर्देश Read More »

राज्यात २७-२८ डिसेंबरदरम्यान मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात २७ आणि २८ डिसेंबर रोजी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. या कालावधीत राज्याच्या विविध भागांमध्ये हवामानात बदल होण्याची शक्यता असून, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांनी या हवामान बदलांच्या अंदाजाकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कालपासून राज्यातील विविध भागांमध्ये काही प्रमाणात आभाळी हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. २६ डिसेंबर रोजी कोल्हापूर, सांगली, सोलापूर

राज्यात २७-२८ डिसेंबरदरम्यान मेघगर्जनेसह पावसाची शक्यता Read More »

महाराष्ट्रातील बेघरांना मोठा दिलासा; प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सर्वाधिक १९ लाख ६६ हजार घरे मिळणार!

पुणे : केंद्रीय कृषी मंत्री आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी मोठी घोषणा केली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या (PMAY) माध्यमातून महाराष्ट्रातील ग्रामीण गरीबांसाठी यावर्षी १९ लाख ६६ हजार घरे मंजूर करण्यात आली आहेत. पुण्यात आज किसान सन्मान दिवस 2024 च्या निमित्ताने केंद्र सरकारच्या कृषी विज्ञान केंद्रात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात

महाराष्ट्रातील बेघरांना मोठा दिलासा; प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सर्वाधिक १९ लाख ६६ हजार घरे मिळणार! Read More »

मनुक्याला कृषी उत्पादनाचा दर्जा; जीएसटीमधून वगळण्याचा ऐतिहासिक निर्णय

मुंबई : महाराष्ट्राच्या मागणीला यश मिळाले असून, द्राक्षापासून तयार होणाऱ्या मनुक्याला कृषी उत्पादनाचा दर्जा देत वस्तू व सेवा कर (GST) मधून वगळण्यात आले आहे. वस्तू व सेवा कर परिषदेच्या जैसलमेर, राजस्थान येथे २१-२२ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या ५५व्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. या बैठकीचे अध्यक्षपद केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharama) यांनी भूषवले,

मनुक्याला कृषी उत्पादनाचा दर्जा; जीएसटीमधून वगळण्याचा ऐतिहासिक निर्णय Read More »

नववर्षात एसटीच्या ताफ्यात ३५०० नव्या लालपरी बसेस सामील होणार

नागपूर : एसटी महामंडळाच्या बसने (MSRTC Bus) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! येत्या नवीन वर्षात एसटीमधील बसची कमतरता लवकरच दूर होणार आहे. नवीन वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला चांगल्या आणि दर्जेदार प्रवासी सेवा देण्याच्या उद्देशाने सुमारे ३५०० नव्या साध्या \” लालपरी \” बसेस एसटी च्या ताफ्यात दाखल होणार आहेत अशी माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि मंत्री

नववर्षात एसटीच्या ताफ्यात ३५०० नव्या लालपरी बसेस सामील होणार Read More »

महाराष्ट्रात भयंकर थंडी; पुणे, महाबळेश्वरपेक्षा थंड!

पुणे : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात घसरला आहे. राज्यात भयंकर थंडी आणि गारठ्याचे प्रमाण वाढले असून, उत्तरेकडील शीत लहरींमुळे पुढील चार दिवसांसाठी राज्यात थंडीची लाट कायम राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हाडं गोठवणाऱ्या थंडीनं नागरिकांना असह्य केलं आहे. आज महाबळेश्वरपेक्षा (Mahabaleshwar) पुण्यात तापमान कमी नोंदवले गेले आहे. पुण्यात (Pune) तापमान

महाराष्ट्रात भयंकर थंडी; पुणे, महाबळेश्वरपेक्षा थंड! Read More »

द मालेगाव फाइल्स

एखादा देश किंवा भाग जेव्हा मुस्लिम बहुल बनतो तेव्हा तेथे काय परिस्थिती निर्माण होते, हे आपल्याला अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि अगदीच ताजं उदाहरण घ्यायचे झाले तर बांगलादेश या देशांमधील परिस्थिती बघून कळून येते. भारत जे एक हिंदू बहुल राष्ट्र आहे, तेथील एक भाग जेव्हा “मुस्लिम बहुल बनतो”, तेव्हा तेथे हिंदूंची काय परिस्थिती होते ते आपल्याला “पश्चिम

द मालेगाव फाइल्स Read More »