News Bharati

निवडणुका

मुंबईचा महापौर कोण? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निकालात भाजपने मिळवलेल्या यशानंतर आता संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे ‘मुंबईचा महापौर कोण होणार?’ या प्रश्नाकडे लागले आहेत. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पुण्यात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना मोठे विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे महापौरपदाचा पेच सुटण्याऐवजी अधिकच गुंतागुंतीचा झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. \”वरच्या देवानेच ठरवलंय…\”मुंबईच्या महापौरपदाबाबत […]

मुंबईचा महापौर कोण? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान Read More »

महापालिकेत झटका, आता जिल्हा परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादींचे ‘मिशन एकत्र’

बारामती : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या मोठ्या विजयानंतर आता राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत. मुंबई, पुणे, ठाणे आणि पिंपरी-चिंचवडसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार व अजित पवार गट) मोठा धक्का बसला आहे. या पराभवातून सावरण्यासाठी आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये एकत्र येण्याच्या तयारीत

महापालिकेत झटका, आता जिल्हा परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादींचे ‘मिशन एकत्र’ Read More »

…लवकरच जय श्रीराम म्हणत आमचा महापौर खुर्चीवर बसेल – नितेश राणे

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपने ८९ जागा जिंकून ऐतिहासिक यश मिळवल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. २५ वर्षांची ठाकरेंची मक्तेदारी मोडीत काढल्यानंतर आता मुंबईचा महापौर कोण? यावर चर्चा सुरू आहे. याच दरम्यान, भाजपचे फायरब्रँड नेते नितेश राणे यांनी अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया देत, \”मुंबईचा महापौर हा हिंदूच होणार\” असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. देवेंद्रजींच्या

…लवकरच जय श्रीराम म्हणत आमचा महापौर खुर्चीवर बसेल – नितेश राणे Read More »

मुंबईत ‘महायुती’चा गुलाल! ठाकरेंचे गड ढासळले; सर्वांचे लक्ष लागलेय – \”मुंबईचा नवा महापौर कोण?\”

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या निकालाने शुक्रवारी राज्याच्या राजकारणात नवा इतिहास रचला आहे. गेल्या २५ वर्षांपासून मुंबईवर असलेली शिवसेना आणि ठाकरेंची एकहाती सत्ता अखेर भाजप-शिंदे सेना युतीने उलथवून लावली आहे. या निवडणुकीत भाजपने ८९ जागा जिंकत सर्वात मोठ्या पक्षाचा बहुमान मिळवला आहे, तर मित्रपक्ष असलेल्या शिंदे सेनेने २९ जागा खिशात टाकल्या आहेत. आता सर्वांचे

मुंबईत ‘महायुती’चा गुलाल! ठाकरेंचे गड ढासळले; सर्वांचे लक्ष लागलेय – \”मुंबईचा नवा महापौर कोण?\” Read More »

पवार ब्रँडची पीछेहाट! पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील बालेकिल्ल्यांत राष्ट्रवादीची ‘तुतारी’ आणि ‘घड्याळ’ शांत

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले असून, या निकालांनी राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. भारतीय जनता पक्षाने (BJP) पुन्हा एकदा ‘न भूतो न भविष्यती’ अशी झेप घेत २९ पैकी तब्बल २६ महानगरपालिकांमध्ये सत्ता मिळवण्याकडे वाटचाल केली आहे. मात्र, दुसरीकडे राज्याच्या राजकारणातील सर्वात प्रभावी मानल्या जाणाऱ्या पवार कुटुंबाला मतदारांनी मोठा

पवार ब्रँडची पीछेहाट! पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील बालेकिल्ल्यांत राष्ट्रवादीची ‘तुतारी’ आणि ‘घड्याळ’ शांत Read More »

विरोधकांच्या आरोपांना जनतेची चपराक; भाजपच्या ‘महाविजया’नंतर आमदार महेश लांडगे यांची पहिली प्रतिक्रिया

पिंपरी-चिंचवड : बहुचर्चित पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (BJP) अभूतपूर्व यश मिळवत पुन्हा एकदा सत्तेचे कमळ फुलवले आहे. विशेष म्हणजे, एकेकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अभेद्य बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट आणि शरद पवार गट) भाजपने मोठा धक्का दिला आहे. १२८ पैकी तब्बल ८४ जागांवर विजय मिळवून भाजपने स्पष्ट

विरोधकांच्या आरोपांना जनतेची चपराक; भाजपच्या ‘महाविजया’नंतर आमदार महेश लांडगे यांची पहिली प्रतिक्रिया Read More »

\”जनतेने सुशासनाला आशीर्वाद दिला!\” महापालिका निकालांनंतर पंतप्रधान मोदींचे महाराष्ट्रासाठी खास ट्विट

महाराष्ट्र : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (BJP) ऐतिहासिक मुसंडी मारली आहे. प्राथमिक कल आणि निकालांनुसार, २९ पैकी तब्बल २५ महानगरपालिकांमध्ये भाजप आणि महायुतीची सत्ता येणे जवळपास निश्चित झाले आहे. या अभूतपूर्व यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले असून भाजप कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. महाराष्ट्राचा ‘महाकौल’ विकासाच्या अजेंड्याला!पंतप्रधान

\”जनतेने सुशासनाला आशीर्वाद दिला!\” महापालिका निकालांनंतर पंतप्रधान मोदींचे महाराष्ट्रासाठी खास ट्विट Read More »

महापालिका निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय! पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास – देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या दणदणीत विजयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. \”भाजपने महानगरपालिका निवडणूक २०२५-२६ मध्ये पुन्हा एकदा इतिहास रचला आहे,\” अशा शब्दांत त्यांनी या विजयाचा आनंद व्यक्त केला आहे. नेतृत्वाचा विजय आणि कार्यकर्त्यांची मेहनतदेवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये या यशाचे श्रेय पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला

महापालिका निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय! पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास – देवेंद्र फडणवीस Read More »

छोटा भाऊ ते ‘किंगमेकर’! मुंबईत भाजपची ‘शंभरी’ पार; पहिल्यांदाच भाजपचा ‘मराठी महापौर’ बसणार?

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निकालांचे चित्र स्पष्ट होत असतानाच राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. \”मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचा मराठी महापौर विराजमान होईल, यात शंका बाळगण्याचे कारण नाही,\” असे ठाम प्रतिपादन भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे विधान केले असून, यामुळे राजकीय हालचालींना

छोटा भाऊ ते ‘किंगमेकर’! मुंबईत भाजपची ‘शंभरी’ पार; पहिल्यांदाच भाजपचा ‘मराठी महापौर’ बसणार? Read More »

दहिसरमध्ये ठाकरेंना मोठा धक्का! १० हजारांहून अधिक मतांनी तेजस्वी घोसाळकर यांचा दणदणीत विजय

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या दहिसरमधील प्रभाग क्रमांक २ मध्ये भाजपने ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. भाजपच्या उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) उमेदवार धनश्री कोलगे यांचा १०,७५५ मतांच्या प्रचंड फरकाने पराभव केला. फेसबुक लाईव्हदरम्यान झालेल्या अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या सहभाभूतीच्या लाटेत आणि राजकीय संघर्षात अखेर भाजपने

दहिसरमध्ये ठाकरेंना मोठा धक्का! १० हजारांहून अधिक मतांनी तेजस्वी घोसाळकर यांचा दणदणीत विजय Read More »