News Bharati

Vinayak A

\”मराठा समाजाच्या मागण्या योग्य, पण;\” मराठा आरक्षणाबद्दल देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

नवी मुंबई : \”मराठा (Maratha) समाजाच्या मागण्या योग्य, पण त्या कायद्याच्या चौकटीत बसायला हवी. अन्यथा एखादा निर्णय घेतल्यावर तो न्यायलयाने रद्द करायचा, अशी मराठा समाजाची फरफट होता कामा नये. त्यामुळे यातून मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे,\” असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) केले आहे. स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त माथाडी कामगारांचा […]

\”मराठा समाजाच्या मागण्या योग्य, पण;\” मराठा आरक्षणाबद्दल देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले Read More »

महायुती सरकारने घेतला पुणे विमानतळाचे नाव बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय

पुणे विमानतळाचे नामकरण ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हे नामकरण पुणे शहराच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वारसाशी जोडलेले असून, संत तुकाराम महाराजांच्या स्मरण करणारे आहे. संत तुकाराम महाराज हे मराठी संत परंपरेतील महान कवी आणि संत होते, ज्यांनी आपल्या अभंगांतून सामाजिक न्याय आणि भक्तीचे संदेश पसरवले.

महायुती सरकारने घेतला पुणे विमानतळाचे नाव बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय Read More »

मुंबईकरांना मोठा दिलासा; मुंबई मेट्रो लाइन ३ चा फेज १ उद्घाटन

मुंबईत राहणाऱ्यांसाठी एक मोठा दिलासा मिळणार आहे! मुंबई मेट्रो लाइन ३ च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. हा मेट्रो मार्ग मुंबईकरांना वेगळ्याच सोयीस्कर आणि वेगवान प्रवासाचा अनुभव देणार आहे. अंडरग्राऊंड मेट्रोची सेवा मुंबईत पहिल्यांदाच सुरू होणार असल्याने, हे उद्घाटन अधिक महत्त्वाचे ठरत आहे. आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा असून, हा प्रवास आता फक्त ३०

मुंबईकरांना मोठा दिलासा; मुंबई मेट्रो लाइन ३ चा फेज १ उद्घाटन Read More »

पालघरमध्ये दहा वर्षांपासून बेकायदेशीर राहणाऱ्या पाच बांगलादेशी नागरिकांना अटक

पालघर : महाराष्ट्रातील पालघर (Palghar) जिल्हा पोलिसांनी वैध कागदपत्रांशिवाय भारतात राहणाऱ्या पाच बांगलादेशी नागरिकांना (Bangladeshi citizen) छापा टाकून अटक (Arrested) केली आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी नदीमार्गे बेकायदेशीरपणे भारतात दाखल झाले होते. दहा वर्षांपासून ते बेकायदेशीरपणे वास्तव्य करत होते आणि प्रवेश झाल्यापासून ते या परिसरात मजूर म्हणून काम करत आहेत. 22 सप्टेंबर 2024 रोजी नालासोपारा येथील

पालघरमध्ये दहा वर्षांपासून बेकायदेशीर राहणाऱ्या पाच बांगलादेशी नागरिकांना अटक Read More »

चीन ला पराभूत करत पुण्यातील सख्या बहिणींनी रचला इतिहास

इटलीत पार पडलेल्या जागतिक स्केट स्पर्धा २०२४ मध्ये भारतीय महिला रोलर डर्बी संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे . पुण्याच्या श्रुतिका सरोदेच्या नेतृत्वाखालील या संघाने चीनवर 127-39 अशा मोठ्या फरकाने विजय मिळवला आणि कांस्य पदका जिंकले. हे भारतासाठी रोलर डर्बीमध्ये पहिलेच पदक आहे. या ऐतिहासिक विजयामुळे संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण पसरले आहे. श्रुतिका सरोदे आणि तिच्या

चीन ला पराभूत करत पुण्यातील सख्या बहिणींनी रचला इतिहास Read More »

मुंबई महानगर क्षेत्रातील दळणवळण, पायाभूत सुविधा, आर्थिक विकास वाढीच्या प्रकल्पांना गती द्या

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची १५८ वी बैठक काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मुंबई महानगर क्षेत्रातील दळणवळण, पायाभूत सुविधा आणि आर्थिक विकास वाढविण्याच्या प्रकल्पांना गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. बॅकबे रिक्लेमेशन प्रारूप विकास आराखडा, बदलापूर ते विरार-अलिबाग मल्टीमोडल कॉरीडॉर प्रवेश नियंत्रित महामार्गासाठी सल्लागाराची नेमणुक आदी

मुंबई महानगर क्षेत्रातील दळणवळण, पायाभूत सुविधा, आर्थिक विकास वाढीच्या प्रकल्पांना गती द्या Read More »

राज्यातील २१ सिंचन प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता; बळीराजाला सिंचनासाठी मोठा दिलासा

मुंबई : राज्यात मोठे, मध्यम, लघू प्रकल्प व साठवण तलावांची कामे सुरू आहेत. सिंचनासाठी बळीराजाला मुबलक पाणी उपलब्धततेसाठी प्रकल्पांच्या कामांना गती द्यावी. बळीराजाला सुखी, समृद्धी करण्यासाठी राज्याची सिंचन क्षमता वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रगतीपथावरील प्रकल्प पूर्ण करून राज्याच्या सिंचन क्षमतेत वाढ करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिल्या. राज्यात

राज्यातील २१ सिंचन प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता; बळीराजाला सिंचनासाठी मोठा दिलासा Read More »

मविआ ला मत म्हणजे योजना बंद आणि महायुतीला मत म्हणजे योजना सुरू – चंद्रशेखर बावनकुळे

महाराष्ट्र : आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्यातील महायुती सरकार आणि विरोधी महाविकास विकास आघाडीचे नेते सध्या आरोप-प्रत्यारोप करतांना दिसत आहेत. दरम्यान, \”महाविकास आघाडीला मत म्हणजे योजना बंद आणि महायुतीला मत म्हणजे योजना सुरू,\” असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) माध्यमांशी बोलतांना म्हणाले. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले कि, संकलन समितीच्या बैठकीत तिन्ही पक्षाचे एक-एक सदस्य आहेत. आणि

मविआ ला मत म्हणजे योजना बंद आणि महायुतीला मत म्हणजे योजना सुरू – चंद्रशेखर बावनकुळे Read More »

भारतीय शेअर बाजरांमधे सलग चौथ्या सत्रात निर्देशांकांचा नवा उच्चांक

अमेरिकी फेडरल रिझर्व्हने गेल्या आठवड्यात केलेल्या कर्जावरच्या व्याज दरकपातीचा परिणाम भारतीय शेअर बाजारांवर दिसून आला. भारतीय शेअर बाजाराच्या सेन्सेक्स आणि निफ्टी या निर्देशांकांनी आज सलग चौथ्या सत्रात नवा विक्रमी उच्चांक गाठला. आज सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने प्रथमच ८५ हजाराची पातळी ओलांडली तर निफ्टीनेही २५ हजार ९७९ अंकांची विक्रमी वाढ नोंदवली.

भारतीय शेअर बाजरांमधे सलग चौथ्या सत्रात निर्देशांकांचा नवा उच्चांक Read More »

यंदा देशभरात ११ कोटी ४ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी

यंदा देशभरात ११ कोटी ४ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली आहे. त्यापैकी ४ कोटी १३ लाख हेक्टर क्षेत्र भाताच्या पिकाखाली असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. यंदा कडधान्याच्या क्षेत्रात वाढ झाली असून १ कोटी २८ लाख हेक्टर क्षेत्रावर कडधान्याची लागवड झाली आहे. १ कोटी ९२ लाख हेक्टरवर तृणधान्य, तर

यंदा देशभरात ११ कोटी ४ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी Read More »