News Bharati

Team NB Marathi

अयोध्येत श्रीरामनवमीची तयारी सुरू

अयोध्येतील यंदाची श्रीरामनवमी अत्यंत आनंदाची आणि उत्साहाची असेल. श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानंतर होत असलेल्या श्रीराम जन्मोत्सवाची तयारी अयोध्येत सुरू झाली असून १५ ते १७ एप्रिल दरम्यान प्रभू श्रीरामांचे मंदिर रोज वीस तास खुले ठेवण्यात येणार आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासची बैठक नुकतीच मणिराम दास छावणी येथे पार पडली. न्यासाचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दासजी महाराज […]

अयोध्येत श्रीरामनवमीची तयारी सुरू Read More »

श्रीरामलल्लाला नवीन वस्त्रे

नववर्ष विक्रम संवत २०८१ चा आरंभ झाला आहे. चैत्र नवरात्रीच्या शुभारंभापासून अयोध्येतील प्रभू श्रीरामलल्ला विशेष वस्त्र परिधान करणार आहेत. श्रीरामनवमीपर्यंत श्रीरामलल्ला रोज नवीन वस्त्र परिधान करतील. प्राणप्रतिष्ठेनंतर प्रथमच प्रभू श्रीरामांच्या वस्त्रांची शैली बदलण्यात आली आहे. ही वस्त्रे खादी-कॉटनपासून तयार करण्यात आली आहेत. सोन्या – चांदीच्या तारांनी यावरील हस्तछपाई करण्यात आली आहे. या डिझाईनमध्ये वापरण्यात आलेली

श्रीरामलल्लाला नवीन वस्त्रे Read More »

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढत

हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा कोल्हापूर जिल्ह्यातील चार आणि सांगली जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ एकत्र करून तयार करण्यात आलेला मतदारसंघ आहे. राज्यात या मतदारसंघाचा ४८ वा क्रमांक लागतो. या लोकसभा मतदारसंघात शाहुवाडी, हातकणंगले, इचलकरंजी, शिरोळ हे चार विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर इस्लामपूर आणि शिराळा हे दोन विधानसभा मतदारसंघ सांगली जिल्ह्यातील आहेत. असा एकूण दोन

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढत Read More »

डॉ. हेडगेवार वरच्या पायरीवर कधीच दिसले नाहीत…

वर्षप्रतिपदा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांचा जन्मदिन. संघासारखी देशव्यापी संघटना उभी करणारे डॉ. हेडगेवार संघाच्या प्रत्येक स्वयंसेवकाला आणि त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येक स्वयंसेवकाला मित्राप्रमाणे वाटत, हा त्यांचा फार मोठा गुणविशेष होय. हा गुणविशेष अधोरेखित करणाऱ्या डॉक्टरांच्या या काही आठवणी. ८ फेब्रुवारी १९३५ : यवतमाळ येथे डॉ.भास्कर महादेव उपाख्य काकासाहेब टेंभे यांच्या मुलाच्या

डॉ. हेडगेवार वरच्या पायरीवर कधीच दिसले नाहीत… Read More »

पुण्यातील तुळशीबागेचा रामनवमी उत्सव

गुढीपाडव्यापासून सुरू होणाऱ्या पुण्यातील तुळशीबागेतील श्रीरामनवमी उत्सवाचे यंदा २६४ वे वर्ष आहे. या मंदिरातील श्रीरामनवमीचा उत्सव प्रसिद्ध आहे. भर मध्यानीच्या उन्हात सर्वत्र पसरणारा सुवासिक फुले आणि सुगंधी दवण्याचा दरवळ, ‘श्रीराम जय राम जय जय राम’चा गजर, ‘सियावर रामचंद्र की जय’च्या घोषणा, रामजन्माचे कीर्तन, चौघडावादनाच्या तालावर सुवासिनींनी म्हटलेला पाळणा, रामाच्या पोषाखाचे सूत प्रसाद म्हणून घेण्यासाठी भाविकांची

पुण्यातील तुळशीबागेचा रामनवमी उत्सव Read More »

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ यशस्वी की अयशस्वी?

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट २२ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित झाला. रणदीप हुडा यांची निर्मिती, दिग्दर्शन, प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला अल्पावधीत चांगला प्रतिसाद मिळू लागला. मात्र, विशिष्ट वर्गाकडून त्याविरोधात लिहिले जाऊ लागले, चित्रपटाचे यश ‘गल्ल्या’त मोजले जाऊ लागले. खरेच असे यश पैशात मोजता येते? विशेषतः चित्रपट जेव्हा ‘वीर सावरकर’ या व्यक्तीच्या जीवनकार्यावर आधारित असतो; विविध

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ यशस्वी की अयशस्वी? Read More »

कोल्हापूर: १९ लाख २१ हजार मतदार; शहरी ग्रामीण दोन्ही भागांचा समावेश

कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत. यातील एक मतदारसंघ कोल्हापूर लोकसभा हा आहे. राज्यात या मतदारसंघाचा ४७ वा क्रमांक येतो. महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती हे काॅंग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत. महायुतीकडून शिवसेनेच्या (शिंदे गट) चिन्हावर प्रा. संजय मंडलिक येथे निवडणूक लढवत आहेत. या लोकसभा मतदारसंघात चंदगड, राधानगरी, कागल, कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर आणि करवीर

कोल्हापूर: १९ लाख २१ हजार मतदार; शहरी ग्रामीण दोन्ही भागांचा समावेश Read More »

सागरी क्षेत्राचा विकास आणि आत्मनिर्भर भारत – २

राष्ट्रीय सागरी दिनाच्या निमित्ताने देशाचा सागरी इतिहास, नौदलाचे महत्त्व, देशाने गेल्या दहा वर्षात सागरी सामर्थ्यात केलेली वाढ आणि झालेली प्रगती यांचा सविस्तर आढावा घेणाऱ्या लेखमालेचा हा उत्तरार्ध. २०१४ मध्ये सत्तेत आलेल्या सरकारने संपूर्ण रक्षा विभागात स्वदेशीकरणावर भर दिला. भारताच्या तिन्ही सशस्त्र सेना मुख्यालयात \”स्वदेशीकरण संचालनालया\”ची स्थापना करण्यात आली. उपकरणे आणि सुटे भाग यांच्या वाढत्या आयात

सागरी क्षेत्राचा विकास आणि आत्मनिर्भर भारत – २ Read More »

हे यश अथक परिश्रमांचे

महाराष्ट्रातील भाजपची वाटचाल सर्वार्थाने बिकट होती. भाजपच्या विचारसरणीला प्रखर विरोध होता. पक्षप्रसार अत्यंत अवघड होता. अशाही परिस्थितीत कार्यकर्त्यांच्या बळावर भाजप पाय रोवून उभा राहिला. ‘माधव थिअरी’ आणून भाजपने आपला सामाजिक पाया विस्तारला आणि पुढे तो मजबूतही केला. भाजपचा ६ एप्रिल हा स्थापना दिन. त्यानिमित्ताने या वाटचालीचा आढावा. काही वर्षांपूर्वी भाजपची महाराष्ट्रात `भटाबामनांचा’ पक्ष अशी अवहेलना

हे यश अथक परिश्रमांचे Read More »

पुण्याची मतदारसंख्या २० लाखांवर

राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांची निवडणूक पाच टप्प्यांमध्ये होणार आहे. महाराष्ट्रात १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि ५ मे या दिवशी प्रत्यक्ष मतदान होईल. पुणे लोकसभेसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे. त्यादृष्टीने जिल्हा निवडणूक शाखेची तयारी पूर्ण झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे मुरलीधऱ मोहोळ, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि वंचितचे वसंत मोरे यांच्यात

पुण्याची मतदारसंख्या २० लाखांवर Read More »