News Bharati

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मी विरोधी पक्षनेता असताना दादा मला मुख्यमंत्री म्हणायचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सभागृहात भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. \”महाराष्ट्राला एक अत्यंत सक्षम मुख्यमंत्री मिळाला असता, असे नेतृत्व आज आपल्यात नाही. राज्याने खऱ्या अर्थाने एक न लाभलेला मुख्यमंत्री गमावला आहे,\” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दादांचा तो अचूक ‘टायमिंग’ आणि […]

मी विरोधी पक्षनेता असताना दादा मला मुख्यमंत्री म्हणायचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

दिव्यांगांसाठी ‘डिजिटल क्रांती’! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘दिव्यांग सहाय्यक पोर्टल’ आणि ॲपचे लोकार्पण

मुंबई : दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ सुलभ, पारदर्शक आणि वेळेत मिळावा, यासाठी दिव्यांग कल्याण विभागाने दिव्यांग सहाय्यक पोर्टल हे एकात्मिक ऑनलाइन पोर्टल आणि मोबाईल ॲप विकसित केले आहे. यामुळे सेवा वितरणाला डिजिटल गती मिळणार असून दिव्यांगांच्या सेवा वितरण होणार अधिक सुलभ व पारदर्शक होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे ‘दिव्यांग

दिव्यांगांसाठी ‘डिजिटल क्रांती’! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘दिव्यांग सहाय्यक पोर्टल’ आणि ॲपचे लोकार्पण Read More »

जनसामान्यांना दिलासा देताना आर्थिक शिस्तही राखणारा; अर्थसंकल्पापूर्वी मुख्यमंत्र्यांचे कडक पावले उचलण्याचे संकेत!

मुंबई : राज्याच्या येत्या अर्थसंकल्पामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अपेक्षित असलेले सर्व मुद्दे, सूचना अंतर्भूत करण्यात येतील. तसेच जनसामान्यांना दिलासा देत असताना आर्थिक शिस्त देखील पाळली जाईल यासाठी काही कडक पावलेही उचलायची आवश्यकता वाटल्यास उचलली जातील. जनसामान्यांना दिलासा देणारा आणि आर्थिक शिस्त राखणारा अर्थसंकल्प सादर केला जाईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त

जनसामान्यांना दिलासा देताना आर्थिक शिस्तही राखणारा; अर्थसंकल्पापूर्वी मुख्यमंत्र्यांचे कडक पावले उचलण्याचे संकेत! Read More »

एआय चर्चेपुरते नको, बांधापर्यंत पोहोचवा!\” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले ‘महाॲग्री एआय’ मॉडेल

नवी दिल्ली : कृषी क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (AI) सहाय्याने अन्न सुरक्षितता, वातावरणातील बदलाला सामोरे जाण्याची क्षमता, महिला सक्षमीकरणासह सर्वांगीण समृध्दी आणण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करीत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. एआय चा वापर ही बाब केवळ प्रदर्शने आणि चर्चेपुरती मर्यादीत न राहता ती मोठ्या संख्येने लोकांपर्यंत पोहोचण्याची गरजही मुख्यमंत्र्यांनी प्रतिपादित केली. नवी

एआय चर्चेपुरते नको, बांधापर्यंत पोहोचवा!\” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले ‘महाॲग्री एआय’ मॉडेल Read More »

भीतीवर लोकशाहीचा प्रहार! 800 जवान, सी-60 कमांडो आणि ‘ती’ 44 स्मारके उद्ध्वस्त; मुख्यमंत्र्यांनी ठोकली शाबासकीची थाप

गडचिरोली : जिल्ह्याला माओवादाच्या छायेतून मुक्त करण्याच्या प्रवासात सुरक्षा दलांनी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांच्या दहशतीचे प्रतीक म्हणून उभारण्यात आलेली उरलेली शेवटची 44 स्मारके सुरक्षा दलांनी यशस्वीरित्या उद्ध्वस्त केल्याने जिल्ह्यातील माओवादाविरोधी लढ्याला मोठे यश मिळाले आहे. या कारवाईबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’ वर पोस्ट करत गडचिरोली पोलीस दलाचे अभिनंदन करत ही

भीतीवर लोकशाहीचा प्रहार! 800 जवान, सी-60 कमांडो आणि ‘ती’ 44 स्मारके उद्ध्वस्त; मुख्यमंत्र्यांनी ठोकली शाबासकीची थाप Read More »

ग्रामीण महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी; केंद्राकडून ३ कोटी अतिरिक्त ‘मनुष्यदिवसां’ना मंजुरी

मुंबई : महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ‘विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन हमी ग्रामीण’ (VB-G RAM G) योजनेंतर्गत महाराष्ट्राच्या श्रमिक बजेटमध्ये १३ कोटींवरून १६ कोटी मनुष्यदिवसांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या ३ कोटी अतिरिक्त मनुष्यदिवसांच्या निर्णयामुळे ग्रामीण भागात रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. निर्णयाचे महत्त्व

ग्रामीण महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी; केंद्राकडून ३ कोटी अतिरिक्त ‘मनुष्यदिवसां’ना मंजुरी Read More »

शिवनेरी किल्ला प्रेरणेची तर आग्र्याचा लाल किल्ला ही स्वाभिमानाची भूमी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आग्रा (उत्तर प्रदेश) : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही देशाला एक तेजस्वी प्रेरणादायी इतिहासाचे पुन्हा स्मरण करण्याची संधी आहे. शिवरायांची जन्मभूमी असलेला शिवनेरी किल्ला प्रेरणेची तर आग्र्याचा लाल किल्ला ही स्वाभिमानाची भूमी आहे. आग्रा येथे ज्या ठिकाणी महाराजांना कैद केले होते तेथे पुढील वर्षी स्मारकाचे काम सुरु झालेले असेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

शिवनेरी किल्ला प्रेरणेची तर आग्र्याचा लाल किल्ला ही स्वाभिमानाची भूमी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

छत्रपती शिवरायांनी दिलेला मार्ग हाच सर्वांगीण विकासाचा मार्ग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : छत्रपती शिवरायांनी दिलेला मार्ग हाच सर्वांगीण विकासाचा मार्ग आहे. त्यांच्या कार्याचा हा आदर्श जगासमोर ठेवण्यासाठी २०३० साली छत्रपती शिवाजी महाराजांची ४०० वी जयंती भव्य आणि जागतिक स्तरावर साजरी केली जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री

छत्रपती शिवरायांनी दिलेला मार्ग हाच सर्वांगीण विकासाचा मार्ग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

मंत्रालयातील लाचखोरी प्रकरण: \”माझ्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील\” – नरहरी झिरवळ

मुंबई : मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभागातील लिपिक लाच घेताना रंगेहाथ पकडला गेल्याने अडचणीत आलेले मंत्री नरहरी झिरवळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. \”मंत्रिपद द्यायचे की काढायचे, हा सर्वस्व अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे, तेच माझ्या राजीनाम्याबाबत अंतिम निर्णय घेतील,\” असे खळबळजनक वक्तव्य झिरवळ यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. नेमके प्रकरण काय?अन्न

मंत्रालयातील लाचखोरी प्रकरण: \”माझ्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील\” – नरहरी झिरवळ Read More »

तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रात वाकायामा प्रांताशी सहकार्य अधिक दृढ करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : महाराष्ट्र आणि जपानच्या वाकायामा प्रांतामधील संबंध मैत्रीपूर्ण आहेत. तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रात सहकार्य अधिक वाढवून हे संबंध येणाऱ्या काळात अधिक दृढ करण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जपानसोबतचे आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक मजबूत करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला. जपानच्या वाकायामा प्रांताचे राज्यपाल मियाझाकी इजुमी यांनी जपानच्या शिष्टमंडळासह

तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रात वाकायामा प्रांताशी सहकार्य अधिक दृढ करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »