News Bharati

मुंबई महापालिका निवडणूक

निवडणूक MM नाही HMचं होणार…

उबाठा-मनसे युतीच्या घोषणेने भारावून गेलेला लाचार सेनेचा एक सैनिक… (आपण त्याला मर्द मावळा म्हणू…) भेटला… विधानसभा निवडणुकीनंतर पार ढेपाळलेला हा गडी युती झाल्यापासून सत्तरीच्या म्हाताऱ्याने व्हायेग्रा खाऊन तरतरीत व्हावे… तशा टणाटण उड्या मारत होता… त्याचा एकच धोशा चालला होता… आता एमएम… MM आमचाच… आता एमएम… MM आमचाच… मी MM म्हणजे मुंबईचा मेयर समजलो… म्हटलं MM […]

निवडणूक MM नाही HMचं होणार… Read More »

अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा… मुंबई मनपा निवडणुकीत ‘अटल’ विचारांचा विजय निश्चित – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : \”भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांनी आधुनिक भारताचा जो पाया रचला, त्यावरच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या भारताची भव्य इमारत उभी करत आहेत,\” असे गौरवद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. मुंबईत आयोजित ‘अटल सुशासन संमेलनात’ ते बोलत होते. यावेळी त्यांनी अटलजींच्या आठवणींना उजाळा देत आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी विजयाचा शंखनाद केला. अटलजी: आधुनिक भारताचे

अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा… मुंबई मनपा निवडणुकीत ‘अटल’ विचारांचा विजय निश्चित – मुख्यमंत्री फडणवीस Read More »

२४ डिसेंबर २०२५ – झाली बाबा शेवटी एकदाची युती…

होणार होणार म्हणून गेली कित्येक दिवस बोंबाबोंब चालली होती… शेवटी एकदाचं गंगेत घोडं न्हालं… गेले कित्येक दिवसांचे अनैतिक संबंध आता जाहीरपणे नैतिकतेने बांधले गेले… झाली बाबा शेवटी एकदाची युती… युती कसली… ७४ हजार कोटी वार्षिक उलाढाल असलेली मुंबई महानगरपालिका आपली वडिलोपार्जित संपत्ती असल्यासारखे गेली ४o वर्षे तोऱ्यात मिरवणारे ठाकरे बंधू… या निवडणुकीत देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालील भाजप

२४ डिसेंबर २०२५ – झाली बाबा शेवटी एकदाची युती… Read More »

काँग्रेसचा ‘मुस्लिम लीग’ अवतार; तुष्टीकरणासाठी हिंदूविरोधी अजेंडा!

मुंबई : महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसने जाहीर केलेल्या ४० स्टार प्रचारकांच्या यादीवरून आता राजकारण चांगलेच तापले आहे. या यादीतील विशिष्ट धर्माच्या उमेदवारांच्या संख्येवरून भाजपने काँग्रेसवर ‘व्होटबँक’ राजकारणाचा गंभीर आरोप केला आहे. भाजपचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी काँग्रेसच्या या अजेंड्याचा पर्दाफाश करत, \”काँग्रेस आता मुस्लिम लीगच्या पावलावर पाऊल टाकत आहे,\” अशी घणाघाती टीका केली

काँग्रेसचा ‘मुस्लिम लीग’ अवतार; तुष्टीकरणासाठी हिंदूविरोधी अजेंडा! Read More »

राऊतांच्या ‘त्या’ विधानाचा भाजपकडून पंचनामा; ‘उबाठा’च्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह

मुंबई : \”निष्ठावंत कार्यकर्त्याची उमेदवारी कापण्याची वेळ आमच्यावर नाही,\” असे म्हणणाऱ्या ठाकरे गटाचे (उबाठा) खासदार संजय राऊत यांचा भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जोरदार समाचार घेतला आहे. \”उबाठा गटामध्ये मुळात कार्यकर्तेच उरलेत कुठे?\” असा बोचरा सवाल करत, उपाध्ये यांनी ठाकरे गटाच्या सद्यस्थितीवर कडाडून टीका केली आहे. प्रश्न उमेदवारीचा नाही, तर ‘चेहरे’ शोधण्याचा! केशव उपाध्ये

राऊतांच्या ‘त्या’ विधानाचा भाजपकडून पंचनामा; ‘उबाठा’च्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह Read More »

मुंबई काँग्रेसला मोठे खिंडार! माजी नगरसेवक ॲड. धर्मेश व्यास यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे मुंबई कमिटी उपाध्यक्ष आणि माजी नगरसेवक ॲड. धर्मेश व्यास यांनी अखेर काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. काँग्रेसचा एक

मुंबई काँग्रेसला मोठे खिंडार! माजी नगरसेवक ॲड. धर्मेश व्यास यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश Read More »

ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहूर्त ठरला? संजय राऊतांच्या ‘त्या’ फोटोने खळबळ; भाजपने दिला ‘१२ वाजणार’चा इशारा!

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती आता अंतिम टप्प्यात आल्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंचा एक फोटो शेअर करत, उद्या (बुधवारी) दुपारी १२ वाजता मोठ्या घोषणेचे संकेत दिले आहेत. मात्र, या ट्विटला भाजपने अत्यंत

ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहूर्त ठरला? संजय राऊतांच्या ‘त्या’ फोटोने खळबळ; भाजपने दिला ‘१२ वाजणार’चा इशारा! Read More »

\”राज ठाकरेंनी काळजी घ्यायला हवी!\”

मुंबई : शिवसेना (उबाठा) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) या दोन्ही पक्षांच्या संभाव्य युतीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असतानाच, भाजपने यावर अत्यंत तीक्ष्ण प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राज ठाकरे यांना सावधानतेचा इशारा दिला असून, उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवणे महागात पडू शकते, असे संकेत दिले आहेत. \”नंतर नगरसेवक पळवले जातील,\”

\”राज ठाकरेंनी काळजी घ्यायला हवी!\” Read More »

मिशन ‘महापालिका’: आजपासून अर्जांचा श्रीगणेशा; १५ जानेवारीला मतदान, तर १६ ला स्पष्ट होणार निकाल

महापालिका निवडणूक 2026 : महाराष्ट्रात महापालिका निवडणुकींच्या (Maharashtra Municipal Corporation Election 2026) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. राज्यातील एकूण 29 महापालिकांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत असून, ही प्रक्रिया 30 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. अर्जांची छाननी 31 डिसेंबर रोजी होणार आहे. उमेदवारांना 2 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येणार असून, 3 जानेवारीला

मिशन ‘महापालिका’: आजपासून अर्जांचा श्रीगणेशा; १५ जानेवारीला मतदान, तर १६ ला स्पष्ट होणार निकाल Read More »

\”नगरपंचायत तो झांकी है, मुंबई मनपा बाकी है;\” अमीत साटम यांची हुंकार

मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये महायुतीने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करत विरोधकांचा अक्षरशः धुरळा उडवत ‘महाविजय’ संपादन केला आहे. या विजयावर प्रतिक्रिया देताना मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार अमीत साटम यांनी आगामी मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीसाठी अत्यंत सूचक विधान केले आहे. \”नगरपंचायत तो झांकी है, मुंबई मनपा बाकी है!\” या घोषणेद्वारे त्यांनी

\”नगरपंचायत तो झांकी है, मुंबई मनपा बाकी है;\” अमीत साटम यांची हुंकार Read More »