News Bharati

केशव उपाध्ये

लोकसभेत ‘वंदे मातरम्’वर चर्चा; भाजपने उबाठाला थेट बाळासाहेबांच्या भूमिकेची आठवण करून दिली! ४२ वर्षांच्या इतिहासावरून काँग्रेसला घेरले!

नवी दिल्ली/मुंबई: भारतीय संसदेच्या कनिष्ठ सभागृहात, लोकसभेत आजपासून (८ डिसेंबर २०२५) ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष चर्चा सुरू होणार आहे. या चर्चेला थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरुवात करतील आणि यासाठी दहा तासांचा वेळ निश्चित करण्यात आला आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. […]

लोकसभेत ‘वंदे मातरम्’वर चर्चा; भाजपने उबाठाला थेट बाळासाहेबांच्या भूमिकेची आठवण करून दिली! ४२ वर्षांच्या इतिहासावरून काँग्रेसला घेरले! Read More »

‘विरोधी पक्षनेतेपद हवंय, पण साडेतीन वर्ष कुठे होतात?’ विरोधी पक्षनेतेपदाच्या मागणीवर भाजपने उद्धव ठाकरेंना थेट ‘हे’ ५ प्रश्न विचारले! विधानसभेत गदारोळ निश्चित!

मुंबई: महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी विरोधी पक्षनेतेपदाच्या मागणीवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत निशाणा साधला आहे. उपाध्ये यांनी ‘पाच’ थेट प्रश्न विचारत, विधिमंडळातील ठाकरे यांच्या अनुपस्थितीवर आणि कार्यशैलीवर बोट ठेवले आहे. ‘विरोधी पक्षनेतेपद द्या’, पण साडेतीन वर्षे तुम्ही कुठे होता? उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेतेपदाची मागणी

‘विरोधी पक्षनेतेपद हवंय, पण साडेतीन वर्ष कुठे होतात?’ विरोधी पक्षनेतेपदाच्या मागणीवर भाजपने उद्धव ठाकरेंना थेट ‘हे’ ५ प्रश्न विचारले! विधानसभेत गदारोळ निश्चित! Read More »

महायुती सरकारच्या वर्षपूर्तीचे ‘विकासाचे सरकार’ म्हणून केशव उपाध्ये यांच्याकडून अभिनंदन

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने (Mahayuti Sarkar) आज यशस्वीपणे एक वर्ष पूर्ण केले आहे.या पार्श्वभूमीवर भाजपचे (BJP) नेते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कामगिरीचे कौतुक करताना, ‘विकासाचे सरकार, चांगल्या बदलाचे सरकार, जनतेचे सरकार’ या तीन वाक्यांत वर्षभराच्या कामकाजाचे अचूक वर्णन केले आहे. केशव उपाध्ये यांनी

महायुती सरकारच्या वर्षपूर्तीचे ‘विकासाचे सरकार’ म्हणून केशव उपाध्ये यांच्याकडून अभिनंदन Read More »

\”राऊत बोलतील, तरच भाजप जिंकेल?\” केशव उपाध्ये यांचा संजय राऊतांवर ट्विटमधून मोठा आरोप

महाराष्ट्र : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत (Sanjay Raut) हे पुन्हा राजकीय भाष्य करण्यासाठी सज्ज होत असल्याच्या वृत्तावरून भारतीय जनता पक्षाचे (BJP) मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी त्यांच्यावर उपरोधिक टीका केली आहे. ट्विट करत उपाध्ये यांनी म्हटले आहे की, राऊत यांनी बोलणे सुरू ठेवलेच पाहिजे, कारण त्यांच्या बोलण्यामुळे भाजपच्या विजयाचा मार्ग

\”राऊत बोलतील, तरच भाजप जिंकेल?\” केशव उपाध्ये यांचा संजय राऊतांवर ट्विटमधून मोठा आरोप Read More »

‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे?’ – नगरपालिका निवडणुकीनंतर मविआचे ‘तकलादू मनोरे’ कोसळणार!

मुंबई : महाविकास आघाडी (MVA) आता शेवटच्या टप्प्यात आली असून, येत्या ३ डिसेंबर रोजी नगरपालिका निवडणुकीचे निकाल लागताच ही आघाडी संपुष्टात येईल, असा थेट दावा महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे (BJP) मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी केला आहे. ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ या संभ्रमात अडकलेल्या मविआला लागलेली घरघर आता अखेरच्या टप्प्यात पोहोचली आहे, असे

‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे?’ – नगरपालिका निवडणुकीनंतर मविआचे ‘तकलादू मनोरे’ कोसळणार! Read More »

‘मुंबईच्या प्रदूषणाचे खरे धनी उद्धव ठाकरे!’ भाजप नेत्याचा ‘सामना’वर निशाणा; २५ वर्षांच्या सत्ताकाळातील अपयशावर थेट प्रश्न

मुंबई : मुंबईतील (Mumbai) वाढत्या वायू प्रदूषणावरून राजकारण तापले असून, भारतीय जनता पक्षाचे (BJP) मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटावर आणि त्यांच्या ‘सामना’ वृत्तपत्रावर जोरदार हल्ला चढवला आहे. उपाध्ये यांनी प्रदूषणाच्या समस्येसाठी थेट उद्धव ठाकरे आणि मुंबई महापालिकेतील त्यांच्या २५ वर्षांच्या सत्तेला जबाबदार धरले आहे.

‘मुंबईच्या प्रदूषणाचे खरे धनी उद्धव ठाकरे!’ भाजप नेत्याचा ‘सामना’वर निशाणा; २५ वर्षांच्या सत्ताकाळातील अपयशावर थेट प्रश्न Read More »

सोनिया ते सपकाळ: काँग्रेसच्या ‘अपशब्द’ परंपरेवर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा पलटवार; \”मोहब्बत की दुकान\”चा खरा चेहरा उघड!

पाथरी: काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्यावर केलेल्या अत्यंत खालच्या पातळीवरील आणि अमर्याद टीकेमुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर बोलताना सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांना \”जाती-पातीचे भांडण लावणारा सर्वांत मोठा आका\” आणि महाराष्ट्रातील सर्वांत मोठा दरिंदा असे अत्यंत अपमानजनक अपशब्द

सोनिया ते सपकाळ: काँग्रेसच्या ‘अपशब्द’ परंपरेवर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा पलटवार; \”मोहब्बत की दुकान\”चा खरा चेहरा उघड! Read More »

\”मराठी माणसाने प्रेम दिले, परत काय मिळाले? भकास मुंबई आणि द्वेष!\” – भाजपचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे (BJP) मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि मनसेच्या नेतृत्वावर जोरदार हल्ला चढवला आहे. मराठी माणसाने दिलेले प्रेम आणि सत्तेचा ठाकरे बंधूंनी केवळ स्वार्थासाठी वापर केला आणि मुंबईला ‘भकास’ केले, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. \”परत काय मिळाले? भकास मुंबई

\”मराठी माणसाने प्रेम दिले, परत काय मिळाले? भकास मुंबई आणि द्वेष!\” – भाजपचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल Read More »

मराठा आरक्षण मोर्चा मुंबईत दाखल होताच राजकीय वातावरण तापले; भाजपचा शरद पवार, ठाकरे आणि काँग्रेसवर हल्लाबोल

मुंबई : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचा मराठा आरक्षण (Maratha Reservation) मोर्चा मुंबईत (Mumbai) दाखल होताच, राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीमध्ये (MVA) थेट संघर्ष सुरू झाला असून, भाजपने महाविकास आघाडीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे आणि मराठा समाजाच्या प्रश्नावर यापूर्वी लक्ष न दिल्याने त्यांच्यावर जोरदार टीका केली

मराठा आरक्षण मोर्चा मुंबईत दाखल होताच राजकीय वातावरण तापले; भाजपचा शरद पवार, ठाकरे आणि काँग्रेसवर हल्लाबोल Read More »