News Bharati

उबाठा

उबाठा सेनेचं हे राजकीय अधःपतन? – केशव उपाध्ये

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारी यादीवरून भाजप आणि शिवसेना (UBT) यांच्यात जुंपली आहे. \”शिवसेना कधीच उमेदवारी यादी जाहीर करत नाही,\” या संजय राऊत यांच्या दाव्याचा भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी समाचार घेतला आहे. राऊतांचा हा दावा म्हणजे ‘राजकीय अध:पतन’ असल्याची घणाघाती टीका उपाध्ये यांनी केली आहे. ‘सामना’चा इतिहास नाकारला?संजय राऊत यांनी नुकतेच […]

उबाठा सेनेचं हे राजकीय अधःपतन? – केशव उपाध्ये Read More »

आवळा देऊन कोहळा काढला! उबाठाने मनसेसोबत नेमकं काय केलं?

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ‘ठाकरे बंधू’ एकत्र आले असतानाच, आता भाजपने या युतीवर सडकून टीका केली आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी फेसबुक पोस्टद्वारे उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. \”उबाठाने मनसेसोबत नेमकं तेच केलं, जे काँग्रेसने वंचितसोबत केलं आहे,\” असे म्हणत उपाध्येंनी या युतीला ‘आवळा देऊन कोहळा काढणे’ असा टोला लगावला आहे.

आवळा देऊन कोहळा काढला! उबाठाने मनसेसोबत नेमकं काय केलं? Read More »

BMC Election 2026: उबाठा आता ‘मामूंची पार्टी’ झालीय! आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर घणाघाती हल्ला

मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय आखाडा चांगलाच तापला आहे. भाजपचे नेते आणि मुंबई निवडणूक प्रभारी आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली आहे. \”उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार कधीच सोडले होते, पण आता ज्या पद्धतीने पक्षात प्रवेश होत आहेत, त्यावरून ही संघटना आता ‘मामूंची पार्टी’ झाली आहे,\” अशा शब्दांत शेलारांनी निशाणा साधला

BMC Election 2026: उबाठा आता ‘मामूंची पार्टी’ झालीय! आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर घणाघाती हल्ला Read More »

उद्धव ठाकरे, सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावली अन् आता मुंबई तोडण्याच्या बाता करताय?

मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. उबाठा गटाच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर \”मुंबई तोडण्याचा प्रयत्न\” आणि \”भाजपने शिवसेनेला वापरून घेतले\” असे गंभीर आरोप केले. मात्र, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या आरोपांचा समाचार घेत उद्धव ठाकरेंचा ‘खोटारडेपणा’ पुराव्यासह उघड केला आहे. \”संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हुतात्म्यांच्या रक्ताने हात

उद्धव ठाकरे, सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावली अन् आता मुंबई तोडण्याच्या बाता करताय? Read More »

दंगलखोरांचे लांगुनचालन करणाऱ्यांना जनता माफ नाही करणार

मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. काँग्रेसचे माजी महापौर अब्दुल रशीद खान ऊर्फ मामू यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘उबाठा’ गटात प्रवेश केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. या पक्षप्रवेशावर राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत कडक शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. \”मतांच्या लांगूलचालनासाठी

दंगलखोरांचे लांगुनचालन करणाऱ्यांना जनता माफ नाही करणार Read More »

\”बटोगे तो कटोगे! उबाठाचे हिंदुत्व की कट्टरवादाला साथ? रशीद मामू ते इक्बाल मुसा… 

मुंबई : मुंबई ही केवळ महाराष्ट्राची राजधानी नसून ती हिंदुत्वाची आणि मराठी अस्मितेची कर्मभूमी आहे. मात्र, गेल्या काही काळापासून सत्तेच्या हव्यासापोटी काही राजकीय पक्षांनी आपल्या मूळ विचारधारेला तिलांजली दिल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. भारतीय जनता पक्ष नेहमीच ‘राष्ट्र प्रथम’ या ध्येयाने चालणारा पक्ष असून, मुंबईच्या सुरक्षिततेशी आणि सांस्कृतिक वारशाशी कोणतीही तडजोड न करण्याची भूमिका पक्षाने

\”बटोगे तो कटोगे! उबाठाचे हिंदुत्व की कट्टरवादाला साथ? रशीद मामू ते इक्बाल मुसा…  Read More »

राऊतांच्या ‘त्या’ विधानाचा भाजपकडून पंचनामा; ‘उबाठा’च्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह

मुंबई : \”निष्ठावंत कार्यकर्त्याची उमेदवारी कापण्याची वेळ आमच्यावर नाही,\” असे म्हणणाऱ्या ठाकरे गटाचे (उबाठा) खासदार संजय राऊत यांचा भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जोरदार समाचार घेतला आहे. \”उबाठा गटामध्ये मुळात कार्यकर्तेच उरलेत कुठे?\” असा बोचरा सवाल करत, उपाध्ये यांनी ठाकरे गटाच्या सद्यस्थितीवर कडाडून टीका केली आहे. प्रश्न उमेदवारीचा नाही, तर ‘चेहरे’ शोधण्याचा! केशव उपाध्ये

राऊतांच्या ‘त्या’ विधानाचा भाजपकडून पंचनामा; ‘उबाठा’च्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह Read More »

\”उबाठाचे ‘निर्धार’ मेळावे नव्हे, तर ‘निराधारांचे’ मेळावे;\” भाजपचा उबाठा गटावर जोरदार पलटवार

मुंबई : उद्धव ठाकरे गटाकडून (शिवसेना उबाठा) मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘निर्धार मेळाव्यां’वरून भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या मेळाव्यांचा उल्लेख ‘निराधारांचे मेळावे’ असा करत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करताना केशव उपाध्ये यांनी उबाठा गटाला ‘निराधार’ ठरवण्यासाठी पाच महत्त्वाचे मुद्दे

\”उबाठाचे ‘निर्धार’ मेळावे नव्हे, तर ‘निराधारांचे’ मेळावे;\” भाजपचा उबाठा गटावर जोरदार पलटवार Read More »

\”हो, आम्ही ‘अन्यायाचे शत्रू’ आहोतच;\” भाजप आमदाराने काढले ठाकरे गटाचे वाभाडे

मुंबई : राजकीय वर्तुळात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असताना, भाजपचे नेते आणि कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे गटावर (उबाठा) जोरदार निशाणा साधला आहे. \”उबाठा गटाचे आमच्याशी युद्ध सुरू आहे, कारण आम्ही अन्यायाचे शत्रू आहोत,\” अशा शब्दांत भातखळकरांनी उबाठा गटाच्या टीकेचा समाचार घेतला. ‘खोटारडा माणूसही कधीतरी खरं बोलतो’सोशल मीडियावर आपली भूमिका मांडताना

\”हो, आम्ही ‘अन्यायाचे शत्रू’ आहोतच;\” भाजप आमदाराने काढले ठाकरे गटाचे वाभाडे Read More »

‘भगव्या ध्वजाला फडकं’ म्हणणारे आता हिंदुत्वावर बोलू लागले! भाजप प्रदेशाध्यक्षांचा थेट ‘उबाठा’वर हल्ला

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राज्यात राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला आहे. महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे-उबाठा) गटावर जोरदार टीका करत त्यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘राक्षसाचा जीव पोपटात’ आणि हिंदुत्वाचे ढोंग रवींद्र चव्हाण यांनी उबाठा गटावर दुटप्पीपणाचा आरोप केला आहे. \”हिंदुत्वाच्या भगव्या ध्वजाला ‘फडकं’

‘भगव्या ध्वजाला फडकं’ म्हणणारे आता हिंदुत्वावर बोलू लागले! भाजप प्रदेशाध्यक्षांचा थेट ‘उबाठा’वर हल्ला Read More »