News Bharati

Vinayak A

PM नरेंद्र मोदींकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रशंसा

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यात येत असलेल्या विविध प्रयत्नांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी प्रशंसा केली आहे. नववर्षाच्या प्रारंभी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेला गडचिरोली दौरा हा येथील नागरिकांच्या आयुष्यात सुख-समाधान आणण्यासह सकारात्मक बदल घडवून आणेल, असा विश्वास प्रधानमंत्री मोदी यांनी […]

PM नरेंद्र मोदींकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रशंसा Read More »

रुग्णसेवा ही ईश्वरसेवा: मंत्री प्रकाश आबिटकर यांचा दर्जेदार आरोग्य सेवेवर भर

मुंबई : रुग्णसेवा ही ईश्वरसेवा असून राज्यातील जनतेचे आरोग्य जपण्याची जबाबदारी महत्त्वपूर्ण आहे. उत्कृष्ट वैद्यकीय उपचार, औषधे आणि अनुषंगिक सेवांच्या माध्यमातून राज्यातील जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी सांगितले. महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणामार्फत पुरविण्यात आलेल्या औषधांच्या नमुन्यांची त्रयस्थ

रुग्णसेवा ही ईश्वरसेवा: मंत्री प्रकाश आबिटकर यांचा दर्जेदार आरोग्य सेवेवर भर Read More »

महाराष्ट्र तयार करणार पहिले AI धोरण; जागतिक तंत्रज्ञान स्पर्धेत होणार आघाडी – आशिष शेलार

मुंबई : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राने दिशादर्शक व्हावे, यासाठी राज्याचे पहिले एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) धोरण तयार करण्याचे निर्देश माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार (Adv. Ashish Shelar) यांनी दिले. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उद्योग, व्यवसाय उभे राहतील. तरुणांना रोजगार मिळेल व तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्र सक्षमपणे स्पर्धा करु शकेल, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र तयार करणार पहिले AI धोरण; जागतिक तंत्रज्ञान स्पर्धेत होणार आघाडी – आशिष शेलार Read More »

नववर्षासोबत गडचिरोलीत विकासाची नवी पहाट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गडचिरोली : नववर्षाचा पहिला दिवस गडचिरोलीसाठी विकासाची नवीन पहाट घेवून आला असून विकासाच्या, सामाजिक सलोख्याच्या, शांततेच्या आणि औद्योगीकरणाच्या दिशेने गडचिरोलीची (Gadchiroli) वाटचाल सुरू राहील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी येथे व्यक्त केला. नवीन वर्षाचा पहिला दिवस मुख्यमंत्री फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यात व्यतित केला. त्यांच्या उपस्थितीत जहाल नक्षली ताराक्कासह 11 नक्षलवाद्यांनी शरणागती

नववर्षासोबत गडचिरोलीत विकासाची नवी पहाट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

विश्वकर्मा कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स (VCACS) आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; 150+ रक्तदात्यांचा सहभाग

पुणे : विश्वकर्मा कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स (VCACS) आणि रेड प्लस ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराला (Blood Donation Camp) समाजाकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. या शिबिरात १५० हून अधिक रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत समाजसेवेचा एक उत्कृष्ट संदेश दिला. शिबिरादरम्यान प्रत्येक रक्तदात्याला डिजिटल घड्याळ, इअरफोन्स, हेल्मेट आणि प्रमाणपत्र भेट म्हणून देण्यात आले.

विश्वकर्मा कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स (VCACS) आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; 150+ रक्तदात्यांचा सहभाग Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतले माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे अंत्यदर्शन

नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (Dr. Manmohan Singh) यांचे गुरुवारी रात्री दिल्लीच्या एम्स रुग्णालयात 92 व्या वर्षी निधन झाले. त्यामुळे आज (२७ डिसेंबर) आयोजित केलेले सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. संपूर्ण देशात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, त्यांच्या निधनानंतर 7 दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला आहे. मनमोहन सिंग

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतले माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे अंत्यदर्शन Read More »

27 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘स्वामित्व योजने’चा शुभारंभ होणार

नागपूर : राज्यातील ग्रामीण भागांतील वाड्या-पाड्यांवर, मूळ गावठानातील वाडवडिलोपार्जित जमिनींवर स्थायिक असलेल्या नागरिकांना त्यांच्या जमिनीचे स्वामित्व मिळावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी महत्त्वाची ‘स्वामित्व योजना’ (Svamitva Scheme) जाहीर केली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेचा शुभारंभ येत्या २७ डिसेंबर रोजी राज्यातील ३० जिल्ह्यांमधील ३०,५१५ गावांमध्ये होणार

27 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘स्वामित्व योजने’चा शुभारंभ होणार Read More »

पूंछ येथे रस्ते अपघातात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद, राज्य सरकारकडून १ कोटींची मदत जाहीर

मुंबई : जम्मू-कश्मीरमधील पूंछ येथे कर्तव्य बजावत असताना झालेल्या रस्ते अपघातात राज्यातील दोन जवानांचा मृत्यू झाला. या शूर जवानांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने १ कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी या जवानांना आदरांजली अर्पण केली आहे. या अपघातात भारतीय सैन्यदलाचे पाच जवान शहीद झाले. यामध्ये मराठा रेजिमेंटचे नायक

पूंछ येथे रस्ते अपघातात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद, राज्य सरकारकडून १ कोटींची मदत जाहीर Read More »

‘वीर बालदिवस’ निमित्ताने मुख्यमंत्र्यांचे गुरु गोविंद सिंहजी यांच्या साहिबजाद्यांना विनम्र अभिवादन

मुंबई : मुंबईतील सागर या आपल्या शासकीय निवासस्थानी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी ‘वीर बालदिवस’ (Veer Bal Diwas) निमित्ताने साहिबजादे बाबा जोरावार सिंह आणि बाबा फतेह सिंह यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.यावेळी, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. भारतात दरवर्षी २६ डिसेंबर रोजी ‘वीर बाल दिवस’ साजरा केला जातो. हा

‘वीर बालदिवस’ निमित्ताने मुख्यमंत्र्यांचे गुरु गोविंद सिंहजी यांच्या साहिबजाद्यांना विनम्र अभिवादन Read More »

अटलजींच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आदरांजली

नागपूर : दिवंगत माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी आज नागपूरच्या रामगिरी येथील शासकीय निवासस्थानी अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती \”सुशासन दिन\” म्हणून साजरी केली जाते. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने जागतिक पटलावर आपली ओळख

अटलजींच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आदरांजली Read More »