News Bharati

NCP

सुनेत्रा पवार होणार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; आज संध्याकाळी पार पडणार शपथविधी

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक नवा इतिहास रचला जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर, त्यांच्या राजकीय वारसाची धुरा आता त्यांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार सांभाळणार आहेत. आज (३१ जानेवारी) संध्याकाळी ५ वाजता सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. राजकीय हालचालींना वेग: ‘देवगिरी’वर खलबतंआज पहाटेपासूनच मुंबईतील ‘देवगिरी’ या शासकीय […]

सुनेत्रा पवार होणार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; आज संध्याकाळी पार पडणार शपथविधी Read More »

\”सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्रीपद द्या\”; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची मोठी मागणी

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी बारामतीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अलोट जनसागराच्या उपस्थितीत आणि साश्रू नयनांनी ‘दादां’ना निरोप दिला जात असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री नरहरी झिरवळ यांनी एक मोठी राजकीय मागणी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. \”सुनेत्रा वहिनींना मंत्रिमंडळात स्थान मिळावे\”अंत्यविधीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नरहरी झिरवळ यांनी अजित

\”सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्रीपद द्या\”; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची मोठी मागणी Read More »

“अजितदादा अमर रहे…”; अलोट जनसागराच्या साक्षीने लाडक्या ‘दादां’ना अखेरचा निरोप

बारामती : \”अजितदादा अमर रहे…\”, \”परत या दादा…\” अशा हृदयस्पर्शी घोषणा आणि साश्रू नयनांनी आज महाराष्ट्राचे लाडके ‘दादा’ उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यात आला. काल (२८ जानेवारी) बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात त्यांचे दुर्दैवी निधन झाले होते. आज, २९ जानेवारी रोजी बारामती येथील विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

“अजितदादा अमर रहे…”; अलोट जनसागराच्या साक्षीने लाडक्या ‘दादां’ना अखेरचा निरोप Read More »

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निधन अत्यंत दुर्दैवी; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भावपूर्ण श्रद्धांजली

नागपूर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) तीव्र दुःख व्यक्त केले आहे. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाले यांनी एका अधिकृत संदेशाद्वारे अजितदादांच्या कार्याचा गौरव करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. \”दीर्घ आणि प्रभावी सार्वजनिक जीवन\”दत्तात्रेय होसबाले यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, \”महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार जी यांचे आज

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निधन अत्यंत दुर्दैवी; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भावपूर्ण श्रद्धांजली Read More »

\”माझा मोठा भाऊ गेल्याची भावना…\”; अजित पवारांच्या निधनाने एकनाथ शिंदे भावूक

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अपघाती निधनाची बातमी अविश्वसनीय आणि धक्कादायक आहे. ते माझ्यापेक्षा अनुभवाने आणि वयानेही मोठे होते. त्यांच्या निधनाने माझा मोठा भाऊ गेल्याची भावना माझ्या मनात आहे. महाराष्ट्रासाठी आजचा काळा दिवस असून एक दूरदर्शी, स्पष्टवक्ता आणि अतिशय अभ्यासू नेता आपण गमावला आहे. महायुती सरकारमधले ते केवळ माझे सहकारी नव्हते तर माझे चांगले मित्रही

\”माझा मोठा भाऊ गेल्याची भावना…\”; अजित पवारांच्या निधनाने एकनाथ शिंदे भावूक Read More »

\”आज पुन्हा पोरका झालो…\”; अजितदादांच्या निधनाने धनंजय मुंडेंना अश्रू अनावर

परळी : \”माझे वडील गेल्यानंतर दादांनी मला कधीही वडील नसल्याची जाणीव होऊ दिली नाही. आज दादांच्या जाण्याने मी पुन्हा पोरका झालो आहे,\” अशा अत्यंत हृदयद्रावक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसला असून त्यांनी आपल्या लाडक्या

\”आज पुन्हा पोरका झालो…\”; अजितदादांच्या निधनाने धनंजय मुंडेंना अश्रू अनावर Read More »

\”मी माझा दिलदार मित्र गमावला…\”; अजित पवारांच्या निधनाने देवेंद्र फडणवीस भावूक

मुंबई/बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या वृत्ताने अवघा महाराष्ट्र सुन्न झाला आहे. या दुर्दैवी घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत भावूक शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या असून, \”आज महाराष्ट्रासाठी अत्यंत कठीण दिवस आहे,\” अशा शब्दांत त्यांनी आपला शोक व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, \”विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाल्याची बातमी

\”मी माझा दिलदार मित्र गमावला…\”; अजित पवारांच्या निधनाने देवेंद्र फडणवीस भावूक Read More »

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन

Ajit Pawar Plane Crash : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (एनसीपी) ज्येष्ठ नेते अजित पवार (६६) यांचे आज सकाळी बारामती येथे खासगी विमानाच्या भीषण अपघातात निधन झाले. या दुर्दैवी दुर्घटनेत विमानातील अन्य ४ जणांचा मृत्यू झाला आहे. माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईहून बारामतीकडे खासगी विमानाने रवाना झाले होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन Read More »

महापालिकेत झटका, आता जिल्हा परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादींचे ‘मिशन एकत्र’

बारामती : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या मोठ्या विजयानंतर आता राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत. मुंबई, पुणे, ठाणे आणि पिंपरी-चिंचवडसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार व अजित पवार गट) मोठा धक्का बसला आहे. या पराभवातून सावरण्यासाठी आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये एकत्र येण्याच्या तयारीत

महापालिकेत झटका, आता जिल्हा परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादींचे ‘मिशन एकत्र’ Read More »

पवार ब्रँडची पीछेहाट! पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील बालेकिल्ल्यांत राष्ट्रवादीची ‘तुतारी’ आणि ‘घड्याळ’ शांत

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले असून, या निकालांनी राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. भारतीय जनता पक्षाने (BJP) पुन्हा एकदा ‘न भूतो न भविष्यती’ अशी झेप घेत २९ पैकी तब्बल २६ महानगरपालिकांमध्ये सत्ता मिळवण्याकडे वाटचाल केली आहे. मात्र, दुसरीकडे राज्याच्या राजकारणातील सर्वात प्रभावी मानल्या जाणाऱ्या पवार कुटुंबाला मतदारांनी मोठा

पवार ब्रँडची पीछेहाट! पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील बालेकिल्ल्यांत राष्ट्रवादीची ‘तुतारी’ आणि ‘घड्याळ’ शांत Read More »