News Bharati

Kharghar Samagam

नवी मुंबईत साकारणार श्री गुरु तेग बहादूर साहिबजींच्या नावाने अत्याधुनिक रुग्णालय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

नवी मुंबई (खारघर) : ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांनी धर्म आणि मानवतेच्या रक्षणासाठी दिलेले सर्वोच्च बलिदान हे जगासाठी सदैव प्रेरणादायी आहे. या महान बलिदानाला खऱ्या अर्थाने मानवंदना देण्यासाठी नवी मुंबई परिसरात गुरुजींच्या नावाने एक अत्याधुनिक आणि सर्वसोयींनी युक्त रुग्णालय उभारण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. अल्पसंख्याक विकास […]

नवी मुंबईत साकारणार श्री गुरु तेग बहादूर साहिबजींच्या नावाने अत्याधुनिक रुग्णालय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा Read More »

इतिहास केवळ स्मरणात न ठेवता तो आचरणात आणा; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा ‘हिंद दी चादर’ समागमासाठी संदेश

नवी मुंबई (खारघर) : महाराष्ट्राच्या पवित्र भूमीवर ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० वा शहिदी समागमाच्या माध्यमातून आपण महान परंपरेचे साक्षीदार होत आहोत. गुरुंनी दिलेला त्याग आणि सामाजिक एकतेचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे, असा संदेश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ध्वनिचित्रफितीद्वारे दिला. अल्पसंख्याक विकास विभाग आणि राज्यस्तरीय समागम समितीच्या वतीने खारघर

इतिहास केवळ स्मरणात न ठेवता तो आचरणात आणा; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा ‘हिंद दी चादर’ समागमासाठी संदेश Read More »

हिंद-दी-चादर : अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिली लंगरसेवा; ८ भव्य लंगरमध्ये लाखो भाविकांची घेतला महाप्रसादाचा लाभ

नवी मुंबई (खारघर) : ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजींच्या ३५० व्या शहीदी समागम सोहळ्यात सत्तेचा अहंकार बाजूला ठेवून सेवेचा आदर्श पाहायला मिळाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लंगरमध्ये संत-महंतांना आणि भाविकांना भोजन वाढून सेवा दिली. शीख परंपरेतील ‘सेवा आणि समता’ या मूल्यांचा सन्मान करत दोन्ही नेत्यांनी सामान्य स्वयंसेवकाप्रमाणे या

हिंद-दी-चादर : अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिली लंगरसेवा; ८ भव्य लंगरमध्ये लाखो भाविकांची घेतला महाप्रसादाचा लाभ Read More »

सिखलीगर समाजावरील ब्रिटिशांचे जाचक निर्बंध हटवले; बाबा हरनाम सिंग जी यांच्याकडून मुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतुक

नवी मुंबई (खारघर) : ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम सोहळ्यात राज्य समन्वय समितीचे मार्गदर्शक आणि दमदमी टकसालचे मुखी बाबा हरनाम सिंग जी यांनी महाराष्ट्र आणि पंजाब या दोन प्रांतांमधील शतकानुशतके चालत आलेल्या आध्यात्मिक व ऐतिहासिक संबंधांवर प्रकाश टाकला. आध्यात्मिक नात्याचा इतिहास बाबा हरनाम सिंग जी म्हणाले की,

सिखलीगर समाजावरील ब्रिटिशांचे जाचक निर्बंध हटवले; बाबा हरनाम सिंग जी यांच्याकडून मुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतुक Read More »

९६ रथ, २० हजार गावे अन् ५०० कार्यकर्त्यांचे पूर्णवेळ परिश्रम; शरदराव ढोले यांनी मांडला ‘शहीदी समागम’चा यशस्वी प्रवास!

नवी मुंबई (खारघर) : नवी मुंबईतील खारघर येथे आयोजित ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमात अखिल भारतीय धर्मजागरण मंचाचे प्रमुख शरदराव ढोले यांनी सोहळ्याचे प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राबवण्यात आलेल्या व्यापक जनजागरण मोहिमेची माहिती दिली. आध्यात्मिक नात्याचा वारसा आपल्या भाषणात शरदराव ढोले यांनी

९६ रथ, २० हजार गावे अन् ५०० कार्यकर्त्यांचे पूर्णवेळ परिश्रम; शरदराव ढोले यांनी मांडला ‘शहीदी समागम’चा यशस्वी प्रवास! Read More »

हिंद-दी-चादर : तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शौर्याचा जागर: शहीदी समागमातील विशेष उपक्रम

नवी मुंबई (खारघर) : ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम सोहळ्यात केवळ धार्मिक विधीच नव्हे, तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून इतिहासाचे दर्शन घडवले जात आहे. कार्यक्रमाच्या परिसरात उभारण्यात आलेला विशेष ऑडिओ-व्हिज्युअल कक्ष भाविकांसाठी, विशेषतः तरुणाईसाठी प्रमुख आकर्षण ठरला आहे. कक्षाची वैशिष्ट्ये आणि तंत्रज्ञान या सुसज्ज कक्षात एकावेळी सुमारे १ हजार भाविक

हिंद-दी-चादर : तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शौर्याचा जागर: शहीदी समागमातील विशेष उपक्रम Read More »

वेदवाणी आणि गुरुवाणीच मानवतेला शांततेचा मार्ग दाखवतील – योगगुरू बाबा रामदेव

नवी मुंबई (खारघर) : \”आजच्या अस्थिर आणि संघर्षमय जगात शांततेचा खरा मार्ग हा वेदवाणी आणि गुरुवाणीतूनच मिळू शकतो. गुरु तेग बहादूर साहिबजींनी दिलेला त्याग, शौर्य आणि अध्यात्माचा वारसा हा केवळ एका समुदायासाठी नसून संपूर्ण मानवजातीला दिशा देणारा आहे,\” असा विश्वास योगगुरू स्वामी बाबा रामदेव यांनी व्यक्त केला. नवी मुंबईतील खारघर येथे आयोजित ‘हिंद दी चादर’

वेदवाणी आणि गुरुवाणीच मानवतेला शांततेचा मार्ग दाखवतील – योगगुरू बाबा रामदेव Read More »

सिकलकर समाजाचा शौर्य आणि कारागिरीचा अभेद्य वारसा

शीख धर्माचा इतिहास अध्यात्मिक शिकवणीचा असा प्रवास आहे ज्यात मानवी हक्कांसाठी दिलेल्या प्रखर लढ्याचा आणि अतुलनीय बलिदानाचा वारसा आहे. जेव्हा आपण खालसा सैन्याच्या पराक्रमाच्या गोष्टी ऐकतो, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर तळपत्या तलवारी आणि ‘जो बोले सो निहाल’चा जयघोष करणारे वीर उभे राहतात. परंतु, या वीर सैनिकांच्या हातात ज्या तलवारी होत्या आणि त्यांच्या देहाचे रक्षण करणारी जी

सिकलकर समाजाचा शौर्य आणि कारागिरीचा अभेद्य वारसा Read More »