News Bharati

Guru Tegh Bahadur Ji

अकोला व नागपूर येथे ‘हिंद-दी-चादर’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

अकोला/नागपूर : धर्म, स्वातंत्र्य आणि मानवतेसाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणारे नववे शीख गुरु श्री गुरु तेग बहादुर साहेबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ‘हिंद-दी-चादर’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम विदर्भातील अकोला आणि नागपूर शहरात […]

अकोला व नागपूर येथे ‘हिंद-दी-चादर’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन Read More »

नवी मुंबईत साकारणार श्री गुरु तेग बहादूर साहिबजींच्या नावाने अत्याधुनिक रुग्णालय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

नवी मुंबई (खारघर) : ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांनी धर्म आणि मानवतेच्या रक्षणासाठी दिलेले सर्वोच्च बलिदान हे जगासाठी सदैव प्रेरणादायी आहे. या महान बलिदानाला खऱ्या अर्थाने मानवंदना देण्यासाठी नवी मुंबई परिसरात गुरुजींच्या नावाने एक अत्याधुनिक आणि सर्वसोयींनी युक्त रुग्णालय उभारण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. अल्पसंख्याक विकास

नवी मुंबईत साकारणार श्री गुरु तेग बहादूर साहिबजींच्या नावाने अत्याधुनिक रुग्णालय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा Read More »

नवी मुंबईत ‘शौर्याचा जागर’; मंत्री नितेश राणे यांनी घेतले श्री गुरु तेग बहादूर साहिबजींचे दर्शन

नवी मुंबई (खारघर) : भारतीय धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी आपले सर्वोच्च बलिदान देणारे ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा ३५० वा शहीदी समागम सोहळा नवी मुंबईत मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. या सोहळ्याचे औचित्य साधून राज्याचे मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणे यांनी खारघर येथील ओवे मैदानावर आयोजित भव्य धार्मिक कार्यक्रमाला भेट दिली आणि गुरु

नवी मुंबईत ‘शौर्याचा जागर’; मंत्री नितेश राणे यांनी घेतले श्री गुरु तेग बहादूर साहिबजींचे दर्शन Read More »

हिंद-दी-चादर : तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शौर्याचा जागर: शहीदी समागमातील विशेष उपक्रम

नवी मुंबई (खारघर) : ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम सोहळ्यात केवळ धार्मिक विधीच नव्हे, तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून इतिहासाचे दर्शन घडवले जात आहे. कार्यक्रमाच्या परिसरात उभारण्यात आलेला विशेष ऑडिओ-व्हिज्युअल कक्ष भाविकांसाठी, विशेषतः तरुणाईसाठी प्रमुख आकर्षण ठरला आहे. कक्षाची वैशिष्ट्ये आणि तंत्रज्ञान या सुसज्ज कक्षात एकावेळी सुमारे १ हजार भाविक

हिंद-दी-चादर : तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शौर्याचा जागर: शहीदी समागमातील विशेष उपक्रम Read More »

वेदवाणी आणि गुरुवाणीच मानवतेला शांततेचा मार्ग दाखवतील – योगगुरू बाबा रामदेव

नवी मुंबई (खारघर) : \”आजच्या अस्थिर आणि संघर्षमय जगात शांततेचा खरा मार्ग हा वेदवाणी आणि गुरुवाणीतूनच मिळू शकतो. गुरु तेग बहादूर साहिबजींनी दिलेला त्याग, शौर्य आणि अध्यात्माचा वारसा हा केवळ एका समुदायासाठी नसून संपूर्ण मानवजातीला दिशा देणारा आहे,\” असा विश्वास योगगुरू स्वामी बाबा रामदेव यांनी व्यक्त केला. नवी मुंबईतील खारघर येथे आयोजित ‘हिंद दी चादर’

वेदवाणी आणि गुरुवाणीच मानवतेला शांततेचा मार्ग दाखवतील – योगगुरू बाबा रामदेव Read More »

सिकलकर समाजाचा शौर्य आणि कारागिरीचा अभेद्य वारसा

शीख धर्माचा इतिहास अध्यात्मिक शिकवणीचा असा प्रवास आहे ज्यात मानवी हक्कांसाठी दिलेल्या प्रखर लढ्याचा आणि अतुलनीय बलिदानाचा वारसा आहे. जेव्हा आपण खालसा सैन्याच्या पराक्रमाच्या गोष्टी ऐकतो, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर तळपत्या तलवारी आणि ‘जो बोले सो निहाल’चा जयघोष करणारे वीर उभे राहतात. परंतु, या वीर सैनिकांच्या हातात ज्या तलवारी होत्या आणि त्यांच्या देहाचे रक्षण करणारी जी

सिकलकर समाजाचा शौर्य आणि कारागिरीचा अभेद्य वारसा Read More »