News Bharati

उपमुख्यमंत्री

\”मी मित्र गमावलाय…\”; एकनाथ शिंदेंची संवेदनशीलता, यंदा वाढदिवस साजरा करणार नाही

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि राज्यावर ओढवलेले दु:ख पाहता, उपमुख्यमंत्र्यांनी हा संवेदनशील निर्णय घेतला असून कार्यकर्त्यांना कोणताही सोहळा न करण्याचे आवाहन केले आहे. एकनाथ शिंदे यांचे ट्विट जसेच्या तसे:\”राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार […]

\”मी मित्र गमावलाय…\”; एकनाथ शिंदेंची संवेदनशीलता, यंदा वाढदिवस साजरा करणार नाही Read More »

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या भेटीला शरद पवार ‘सहयोग’वर; बारामतीत खलबतं सुरू

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आणि पवार कुटुंबात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अजितदादांच्या रिक्त जागी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार बारामतीतील आपल्या ‘सहयोग’ निवासस्थानी परतल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर, आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली, ज्यामुळे राजकीय वर्तुळाच्या नजरा बारामतीकडे वळल्या आहेत.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या भेटीला शरद पवार ‘सहयोग’वर; बारामतीत खलबतं सुरू Read More »

सुनेत्रा पवारांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती वैध की अवैध? सुनील तटकरे स्पष्टच सागीतलं

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अजितदादांच्या रिक्त जागी सुनेत्रा पवार यांची झालेली नियुक्ती घटनात्मकदृष्ट्या अवैध असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. या तांत्रिक वादावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी महत्त्वाची स्पष्टीकरणे दिली आहेत. अंजली दमानिया यांनी दोन मुख्य

सुनेत्रा पवारांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती वैध की अवैध? सुनील तटकरे स्पष्टच सागीतलं Read More »

मणिपूरला मिळाले नवे नेतृत्व! भाजपचे युमनाम खेमचंद सिंह राज्याचे नवीन मुख्यमंत्री

मणिपूर : ईशान्येकडील मणिपूर राज्याला अखेर नवीन नेतृत्व मिळाले आहे. राज्यातील राष्ट्रपती राजवट अधिकृतपणे उठवण्यात आली असून, भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते युमनाम खेमचंद सिंह यांनी आज मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राजधानी इंफाळमधील ‘लोक भवन’ येथे पार पडलेल्या एका विशेष सोहळ्यात राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी त्यांना शपथ दिली.

मणिपूरला मिळाले नवे नेतृत्व! भाजपचे युमनाम खेमचंद सिंह राज्याचे नवीन मुख्यमंत्री Read More »

सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या विधीमंडळ गटनेतेपदी निवड, ५ वाजता शपथविधी

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) मोठा निर्णय घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची एकमताने विधीमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे अजित पवार यांचा राजकीय वारसा आता सुनेत्रा पवार पुढे नेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या विधीमंडळ गटनेतेपदी निवड, ५ वाजता शपथविधी Read More »

काका-पुतण्याच्या भेटीत नेमकं काय शिजतंय? शरद पवारांच्या गौप्यस्फोटानंतर पार्थ पवार बारामतीत

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राचे राजकारण क्षणोक्षणी बदलत आहे. आज सकाळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विलीनीकरण आणि सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत केलेल्या खळबळजनक विधानांनंतर, अवघ्या दोन तासांत पार्थ पवार हे शरद पवारांच्या भेटीसाठी ‘गोविंदबाग’ (बारामती) येथे पोहोचले आहेत. पवारांच्या नाराजीनंतर पार्थ पवारांची धाव?आज सकाळी शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले होते की,

काका-पुतण्याच्या भेटीत नेमकं काय शिजतंय? शरद पवारांच्या गौप्यस्फोटानंतर पार्थ पवार बारामतीत Read More »

शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट: \”दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या, १२ तारखेला घोषणा होणार होती; पण आता…\”

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे भूकंप होत आहेत. एकीकडे आज सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असतानाच, दुसरीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विलीनीकरणाबाबत अत्यंत खळबळजनक खुलासा केला आहे. \”दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही अजितदादांची आणि आमचीही इच्छा होती, मात्र आता या चर्चेत खंड पडला आहे,\” असे सूचक विधान पवारांनी केले

शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट: \”दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या, १२ तारखेला घोषणा होणार होती; पण आता…\” Read More »

\”सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्रीपद द्या\”; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची मोठी मागणी

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी बारामतीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अलोट जनसागराच्या उपस्थितीत आणि साश्रू नयनांनी ‘दादां’ना निरोप दिला जात असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री नरहरी झिरवळ यांनी एक मोठी राजकीय मागणी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. \”सुनेत्रा वहिनींना मंत्रिमंडळात स्थान मिळावे\”अंत्यविधीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नरहरी झिरवळ यांनी अजित

\”सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्रीपद द्या\”; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची मोठी मागणी Read More »

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन

Ajit Pawar Plane Crash : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (एनसीपी) ज्येष्ठ नेते अजित पवार (६६) यांचे आज सकाळी बारामती येथे खासगी विमानाच्या भीषण अपघातात निधन झाले. या दुर्दैवी दुर्घटनेत विमानातील अन्य ४ जणांचा मृत्यू झाला आहे. माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईहून बारामतीकडे खासगी विमानाने रवाना झाले होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन Read More »