News Bharati

बातम्या

उद्यापासून पाच दिवसीय ‘यवतमाळ महोत्सव २०२६’ ला प्रारंभ

यवतमाळ : राज्य शासनाच्या विविध विभागांच्या वतीने यवतमाळ जिल्ह्याच्या वैभवात भर घालणाऱ्या ‘यवतमाळ महोत्सव २०२६’ चे आयोजन २७ ते ३१ मार्च या कालावधीत वाघापूर येथील कृषी विज्ञान केंद्र प्रक्षेत्रावर करण्यात आले आहे. या महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन उद्या, शुक्रवार २७ मार्च रोजी दुपारी ३:०० वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास […]

उद्यापासून पाच दिवसीय ‘यवतमाळ महोत्सव २०२६’ ला प्रारंभ Read More »

जोतिबा चैत्र यात्रेनिमित्त कोल्हापुरात २ लाख भाविकांसाठी भव्य अन्नछत्र; ‘सहज सेवा ट्रस्ट’चा सलग २६ व्या वर्षी सेवायज्ञ

कोल्हापूर : श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेनिमित्त दरवर्षी लाखो भाविक डोंगरावर गुलाल-खोबऱ्याची उधळण करण्यासाठी येतात. या भाविकांच्या सेवेसाठी कोल्हापूरच्या ‘सहज सेवा ट्रस्ट’च्या वतीने यंदा ३० मार्च ते २ एप्रिल २०२६ या कालावधीत गायमुख परिसरात भव्य अन्नछत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या उपक्रमाचे २६ वे वर्ष असून, सुमारे २ लाख भाविकांना अहोरात्र महाप्रसादाचा लाभ मिळणार आहे.

जोतिबा चैत्र यात्रेनिमित्त कोल्हापुरात २ लाख भाविकांसाठी भव्य अन्नछत्र; ‘सहज सेवा ट्रस्ट’चा सलग २६ व्या वर्षी सेवायज्ञ Read More »

परभणी येथे २८ मार्चला सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार मेळावा

परभणी : परभणी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि शारदा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २८ मार्च २०२६ रोजी भव्य “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा” आयोजित करण्यात आला आहे. परभणी येथील शारदा महाविद्यालय येथे सकाळी ९:०० वाजता या मेळाव्याला सुरुवात होईल.

परभणी येथे २८ मार्चला सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार मेळावा Read More »

जात-पात विसरून केवळ ‘हिंदु’ म्हणून एकत्र या; सांगलीत ३ एप्रिलला रंगणार ‘विराट हिंदु धर्म संमेलन’

सांगली : \”सांगलीतील खणभाग, नळभाग, फौजदार गल्ली आणि राजवाडा परिसरात ३ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेले ‘विराट हिंदु धर्म संमेलन’ ऐतिहासिक ठरायला हवे. या भागातील समस्त हिंदूंनी आपली जात-पात विसरून केवळ ‘हिंदु’ म्हणून पूर्ण शक्तीने या संमेलनात सहभागी व्हावे,\” असे आवाहन ‘हिंदु एकता आंदोलना’चे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार नितीन शिंदे यांनी केले. या विराट

जात-पात विसरून केवळ ‘हिंदु’ म्हणून एकत्र या; सांगलीत ३ एप्रिलला रंगणार ‘विराट हिंदु धर्म संमेलन’ Read More »

‘भक्ती शक्ती’ रेल्वे प्रवासी भजन स्पर्धेला भाविकांचा उदंड प्रतिसाद

वाशी (नवी मुंबई) : हार्बर, मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून दररोज हरिनामाचा गजर करत प्रवास करणाऱ्या नोकरदार आणि प्रवाशांसाठी वाशी येथे \”भक्ती शक्ती रेल्वे प्रवासी भजन स्पर्धा २०२६\” चे दिमाखदार आयोजन करण्यात आले होते. नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था, छत्रपती शिवराय भजन मंडळ (वाशी), श्री संत तुकाराम महाराज रेल्वे प्रवासी भजन मंडळ आणि नवविधा भक्ती

‘भक्ती शक्ती’ रेल्वे प्रवासी भजन स्पर्धेला भाविकांचा उदंड प्रतिसाद Read More »

राणीसावरगाव : सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराजांच्या उपस्थितीत २६ मार्चला ‘विशाल हिंदू संमेलन’; शोभायात्रेचेही आयोजन

राणीसावरगाव (परभणी) : \”जात-पात की करो बिदाई, हम सब हिंदू भाई-भाई\” हा संदेश घेऊन येत्या २६ मार्च २०२६ रोजी राणीसावरगाव येथे ‘विशाल हिंदु संमेलना’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. सकल हिंदु समाज, राणीसावरगाव यांच्या वतीने आयोजित हा सोहळा श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने पार पडणार असून, यामध्ये आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहणार आहेत. या संमेलनासाठी

राणीसावरगाव : सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराजांच्या उपस्थितीत २६ मार्चला ‘विशाल हिंदू संमेलन’; शोभायात्रेचेही आयोजन Read More »

नेपाळमध्ये ईदच्या दिवशी काली मंदिरावर धर्मांधांचा हल्ला; पुजाऱ्याला मारहाण आणि तोडफोड

काठमांडू (नेपाळ) : नेपाळमधील कपिलवस्तू जिल्ह्यात ईदच्या दिवशी एका धक्कादायक घटनेत मंदिरावर हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. महाराजगंज परिसरातील बरगदी घाटाजवळील काली मंदिरात ध्वनीक्षेपकावरून भजन सुरू असल्याच्या कारणावरून मुसलमानांच्या जमावाने मंदिरावर आक्रमण केले. या हल्ल्यात मंदिराची तोडफोड करण्यात आली असून पुजाऱ्यालाही गंभीर मारहाण करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २१ मार्च रोजी सकाळी काली

नेपाळमध्ये ईदच्या दिवशी काली मंदिरावर धर्मांधांचा हल्ला; पुजाऱ्याला मारहाण आणि तोडफोड Read More »

संपूर्ण देशात गोवंश हत्याबंदी आणि धर्मांतरविरोधी कायदा लागू करा; ‘हिंदु राष्ट्र अधिवेशनात’ मागणी

पाटलीपुत्र (बिहार) : \”भारत घटनात्मकदृष्ट्या हिंदु राष्ट्र व्हावा आणि हिंदूंच्या न्याय्य हक्कांचे रक्षण व्हावे,\” या उद्देशाने पाटलीपुत्र येथील अनिसाबाद परिसरातील चित्रगुप्त समाज सभागृहात ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ उत्साहात संपन्न झाले. या अधिवेशनात केंद्र सरकारने संपूर्ण देशात ‘गोवंश हत्याबंदी’ आणि ‘धर्मांतरविरोधी’ कायदा लागू करावा, अशा प्रमुख मागण्यांसह अनेक महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले. अधिवेशनानंतर आयोजित पत्रकार परिषदेत

संपूर्ण देशात गोवंश हत्याबंदी आणि धर्मांतरविरोधी कायदा लागू करा; ‘हिंदु राष्ट्र अधिवेशनात’ मागणी Read More »

देव अन् देशासाठी तडजोड नाही; अफझलखानाच्या कबरीप्रमाणेच गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणेही हटवणार

सातारा : \”महाराष्ट्र ही संतांची आणि मंदिरांची पावन भूमी आहे. ज्यांनी गड-दुर्ग किंवा मंदिरांच्या भूमीवर अनधिकृत अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांना हे शासन सोडणार नाही. ज्या धडाडीने प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेले अफझलखानाच्या कबरीभोवतीचे अतिक्रमण हटवण्यात आले, त्याच पद्धतीने राज्यातील सर्व गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणे बुलडोझर लावून नष्ट केली जातील,\” असे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री

देव अन् देशासाठी तडजोड नाही; अफझलखानाच्या कबरीप्रमाणेच गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणेही हटवणार Read More »

\”माऊलींचे विचार आत्मशांतीसाठी आवश्यक\”; सोलापूरमध्ये ‘ज्ञानियांचा राजा, मोगरा फुलला’ सोहळ्याचा दिमाखदार प्रारंभ

सोलापूर : \”संत ज्ञानेश्वर माऊली हे जगातील सर्वात कमी वयाचे आध्यात्मिक बालसाहित्यिक आहेत. त्यांचे साहित्य मानवी मनाला शांती आणि समाधान देणारे असून, आजच्या धावपळीच्या जीवनात आत्मशांती मिळवण्यासाठी माऊलींचे विचार अत्यंत आवश्यक आहेत,\” असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले. सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय (महाराष्ट्र राज्य)

\”माऊलींचे विचार आत्मशांतीसाठी आवश्यक\”; सोलापूरमध्ये ‘ज्ञानियांचा राजा, मोगरा फुलला’ सोहळ्याचा दिमाखदार प्रारंभ Read More »