News Bharati

‘आदित्य ठाकरे लंडनच्या एखाद्या रोडवरून पॉपकॉर्न खात बोलत आहेत का?’; आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना टोला

मुंबई : पावसाळ्यापूर्वीच कोस्टल रोडच्या बोगद्यामधून समुद्राचे पाणी झिरपल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी युती सरकारला धारेवर धरले आहे. त्यांनी केलेल्या टीकेला तिउत्तर देत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ‘आदित्य ठाकरे लंडनच्या एखाद्या रोडवरून पॉपकॉर्न खात बोलत आहेत का?’ असा टोला लगावला आहे. ते दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात झालेल्या मुंबई भाजपा (Mumbai BJP) पदाधिकारी बैठकीबाबत माध्यमांशी बोलत होते.

ते पुढे म्हणाले, “सुट्टीवर येणाऱ्या अधिकऱ्यांसारखे काम आदित्य यांचे आहे. उंटावरून शेळ्या आदित्य यांनी हाकु नयेत. मुंबई महापालिकेला सडेतोड उत्तर द्यावे लागतील. उध्दव यांनी त्यावेळी ही कोस्टल रोडची कामे महापालिका कडे घेतली. उध्दवजींनी आदित्य यांच्या हट्ट मुळे हे केले. मी त्यावेळी प्रश्न मांडले, विधानसभेत बोललो. या कामात महापालिकेने सब कॉन्ट्रॅक्टर नेमले होते का? त्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला होता. आपल्याच युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना ही उप कंत्राटदार म्हणून कामे देण्यात आली होती. ती दुय्यम दर्जाची झाली. कामांना विलंब झाला. भ्रष्टाचार झाला. महापालिकेने कारवाई का केली नाही? त्याच्यावर दबाव होता का?” असा थेट प्रश्नही आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *