News Bharati

Vidarbha

राज्यात ३० आणि ३१ मार्च रोजी मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात पुन्हा एकदा मोठे बदल होणार असून, येत्या ३० आणि ३१ मार्च २०२६ रोजी काही भागांमध्ये मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील सीमावर्ती भागांमध्ये स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडण्याची चिन्हे आहेत. ३० मार्च रोजी दुपारनंतर खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये […]

राज्यात ३० आणि ३१ मार्च रोजी मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा Read More »

बळीराजाची चिंता वाढली; १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस आणि विजांचा कडकडाट

मुंबई : राज्यातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल होण्याची शक्यता असून, येत्या १७ ते २० मार्च दरम्यान विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. या नैसर्गिक संकटामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीला मोठा अडथळा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १७ मार्चपासून

बळीराजाची चिंता वाढली; १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस आणि विजांचा कडकडाट Read More »

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ : नदीजोड प्रकल्पांना ऐतिहासिक बळ; दुष्काळमुक्तीसाठी १ लाख कोटींहून अधिकची तरतूद

मुंबई : राज्याच्या कृषी आणि जलसंपदा क्षेत्राला संजीवनी देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात नदीजोड प्रकल्पांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. ७.६९ लाख कोटींच्या या अर्थसंकल्पात केवळ पाणी व्यवस्थापनासाठी सुमारे सव्वा लाख कोटींच्या प्रकल्पांचे नियोजन करण्यात आले असून, यामुळे राज्याच्या सिंचन क्षमतेत आमूलाग्र बदल होणार आहे. नदीजोड प्रकल्प : दुष्काळी भागांसाठी वरदानराज्यातील पाणीटंचाई

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ : नदीजोड प्रकल्पांना ऐतिहासिक बळ; दुष्काळमुक्तीसाठी १ लाख कोटींहून अधिकची तरतूद Read More »

विदर्भाला समृद्ध व संपन्न बनवू – नितीन गडकरी

नागपूर : गडचिरोली ते वाशिम अशा विदर्भातील सर्व जिल्ह्यांमधील गरिबी, बेरोजगारी दूर करून या भागाला समृद्ध व संपन्न करण्याचे स्वप्न असून ते पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त करत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी येत्या 5 वर्षात विदर्भात 5 लाख रोजगार निर्मिती करण्यात येईल असे प्रतिपादन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात गडचिरोली जिल्ह्यात 7.5

विदर्भाला समृद्ध व संपन्न बनवू – नितीन गडकरी Read More »

विदर्भ आता ‘इंडस्ट्रियल पॉवरहाऊस’; ऑटोमोबाईल ते ग्रीन स्टीलपर्यंत गुंतवणुकीचा पाऊस, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

नागपूर : गडचिरोली येथे जगातील सर्वात मोठे ग्रीन स्टील हब, नागपुरात सोलर मॉड्युल आणि अमरावतीमध्ये आशिया खंडातील सर्वात मोठे वैमानिक प्रशिक्षण केंद्र उभारण्याच्या दिशेने महत्त्वाची पावले पडली आहेत. निर्मिती आणि सेवा क्षेत्रात विदर्भाची घोडदौड सुरु आहे. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीसोबत झालेल्या सामंजस्य करारातून नागपूरमध्ये ऑटोमोबाईल उद्योगाचे पदार्पण झाले आहे, या सर्व प्रयत्नांतून येत्या ५ वर्षांत

विदर्भ आता ‘इंडस्ट्रियल पॉवरहाऊस’; ऑटोमोबाईल ते ग्रीन स्टीलपर्यंत गुंतवणुकीचा पाऊस, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा Read More »