ठाकरेंचा गड गेला, पण भाजपची ‘शिंदें’नी अडवणूक केली? मुंबईत महापौरपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला?
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निकालाने राज्याच्या राजकारणात नवी समीकरणे जन्माला घातली आहेत. २२७ सदस्यांच्या सभागृहात महायुतीने ११८ जागांनिशी काठावरचं बहुमत (मॅजिक फिगर ११४) गाठलं खरं, पण सत्तास्थापनेचा मार्ग वाटतो तितका सोपा राहिलेला नाही. ८९ जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी सत्ता टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या २९ नगरसेवकांचा पाठिंबा अनिवार्य आहे. यामुळेच आता शिंदे […]