News Bharati

राष्ट्रीय

जम्मू-काश्मीर पोलिसांचे मोठे यश: दहशतवादी मॉड्यूल उद्ध्वस्त, ८ जणांना अटक

जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी एक दहशतवादी मॉड्यूल यशस्वीपणे उद्ध्वस्त केले आहे, ज्यामुळे आठ जणांना अटक करण्यात आली आहे. अख्तर अली, सद्दाम, कुशल, नूरानी, ​​मकबूल, लियाकत, कासिम दिन, खादिम अशी त्यांची नावे आहेत. सुरक्षा दलांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या ऑपरेशनमध्ये या प्रदेशात दहशतवाद्यांना मदत करण्यासाठी जबाबदार असलेल्या नेटवर्कला लक्ष्य करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे मॉड्यूल […]

जम्मू-काश्मीर पोलिसांचे मोठे यश: दहशतवादी मॉड्यूल उद्ध्वस्त, ८ जणांना अटक Read More »

बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेसाठी VHP ची गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा

नवी दिल्ली – विश्व हिंदू परिषदेचे (VHP) अध्यक्ष आलोक कुमार (Alok Kumar) आणि सरचिटणीस बजरंग बागरा (Bajrang Bagra) यांनी बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समुदायांच्या सुरक्षेबाबत चर्चा करण्यासाठी गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. बांगलादेशात हिंदू आणि इतर अल्पसंख्यांकांवर हल्ले आणि छळ झाल्याच्या अलीकडच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. विहिंपच्या नेत्यांनी सुरू

बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेसाठी VHP ची गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा Read More »

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बांगलादेशातील हिंसाचारावर व्यक्त केली गंभीर चिंता

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) एक निवेदन जारी करून बांगलादेशमध्ये (Bangladesh) गेल्या काही दिवसांत सत्ता परिवर्तनाच्या आंदोलनादरम्यान हिंदू, बौद्ध आणि इतर अल्पसंख्याक समुदायांविरुद्ध झालेल्या हिंसाचाराच्या घटनांवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संसंघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे (Dattatreya Hosabale) यांनी हे वक्तव्य केले आहे. दत्तात्रेय होसाबळे म्हणाले कि, हिंदू आणि इतर धार्मिक अल्पसंख्याकांच्या महिलांवरील लक्ष्यित हत्या,

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बांगलादेशातील हिंसाचारावर व्यक्त केली गंभीर चिंता Read More »

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत मुख्यमंत्री शिंदे यांची बांगलादेशातील विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी चर्चा

मुंबई : बांगलादेशात अडकलेले राज्यातील विद्यार्थी, अभियंते यांना मदत करणे आणि त्यांना मायदेशात परत आणण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या सुटकेसाठी सर्व उपाययोजना करण्यात येतील. यासाठी विशेष विमानांची व्यवस्था करण्यात येईल, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांना

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत मुख्यमंत्री शिंदे यांची बांगलादेशातील विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी चर्चा Read More »

पॅरिस ऑलिम्पिक : कुस्तीपटू विनेश फोगाटच्या अपयशावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया

पॅरिस ऑलिम्पिक : पॅरिस ऑलिम्पिकमधून (Olympic Games Paris 2024) अपात्र ठरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटला (Vinesh Phogat) सोशल मीडियावर पोस्ट लिहीत प्रोत्साहन दिले आहे. पंतप्रधानांनी लिहिलं आहे कि, \”विनेश, चॅम्पियन्समध्ये तू एक चॅम्पियन आहेस! तू भारताचा अभिमान आहेस आणि प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणा आहेस. आज सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

पॅरिस ऑलिम्पिक : कुस्तीपटू विनेश फोगाटच्या अपयशावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया Read More »

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने वक्फ बोर्डाचे स्मारकाचे दावे फेटाळले

एका महत्त्वपूर्ण निर्णयात, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने (Madhya Pradesh High Court) बुरहानपूरमधील अनेक ऐतिहासिक इमारतींच्या मालकीच्या वादात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) ची बाजू घेतली आहे. शाह शुजाचा मकबरा, नादिर शाहचा मकबरा, बीबी साहिबची मशीद आणि बुरहानपूरच्या किल्ल्यातील एका राजवाड्याचा समावेश असलेल्या मालमत्तेवर मध्य प्रदेश वक्फ बोर्डाचा (Waqf Board) दावा न्यायालयाने फेटाळला. या ऐतिहासिक वास्तूंच्या मालकीचा

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने वक्फ बोर्डाचे स्मारकाचे दावे फेटाळले Read More »

वक्फ बोर्डाच्या मालमत्तेच्या दाव्यावर न्यायमूर्ती अहलुवालिया संतापले; म्हणाले, मग तुम्ही ताजमहाल, लाल किल्ला आणि…

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश उच्च न्यायालयात वक्फ बोर्डाच्या (Waqf Council) मालमत्तेसंदर्भात महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती गुरपाल सिंग अहलुवालिया यांनी वकिलाला खडसावले आणि म्हणाले, \”मग तुम्ही म्हणाल की ताजमहाल, लाल किल्ला आणि संपूर्ण भारत वक्फ बोर्डाचा आहे.\” वक्फ बोर्डाच्या अखत्यारीत मालमत्ता आणण्याबाबत वकील स्पष्ट उत्तर देऊ शकले नाहीत तेव्हा न्यायाधीशांनी खरमरीत टिप्पणी केली.

वक्फ बोर्डाच्या मालमत्तेच्या दाव्यावर न्यायमूर्ती अहलुवालिया संतापले; म्हणाले, मग तुम्ही ताजमहाल, लाल किल्ला आणि… Read More »

बांगलादेशात अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उपाययोजना

मुंबई : बांगलादेशातील (Bangladesh) नागरी अशांततेच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि मायदेशात त्यांच्या परतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी महत्त्वाची पावले उचलली आहेत. या विद्यार्थ्यांना तातडीची मदत उपलब्ध होणे आणि त्यांच्या भारतात परतण्यासंदर्भातील आवश्यक कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आहे. बांगलादेशातील अशांततेमुळे परदेशी नागरिकांच्या, विशेषतः अशांत भागात

बांगलादेशात अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उपाययोजना Read More »

हिंदूंची सुरक्षा सुनिश्चित केली पाहिजे – आलोक कुमार

बांगलादेशातील अल्पसंख्याकांची घरे, धार्मिक स्थळे आणि मालमत्तेवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत गंभीर चिंता व्यक्त करत विश्व हिंदू परिषद (VHP) चे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार (Alok Kumar) यांनी केंद्र सरकारला त्यांच्या सुरक्षिततेसाठी सर्व शक्य पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. आलोक कुमार यांनी बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला दबाव आणण्यास सांगितले आहे. मंगळवारी नवी दिल्लीत एका पत्रकार

हिंदूंची सुरक्षा सुनिश्चित केली पाहिजे – आलोक कुमार Read More »

उद्धव ठाकरेंच्या इंडी आघाडीच्या नेत्याची रामाच्या अस्तित्वावर शंका?

इंडी आघाडी तामिळनाडूच्या मंत्र्यांनी भगवान रामाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने वादाला तोंड फुटले आहे अरियालूर, तामिळनाडू – इंडी आघाडीचे तामिळनाडू मधील डीएमके पक्षाचे नेते व तेथील परिवहन मंत्री एस.एस. शिवशंकर यांनी वादग्रस्त विधान करताना असा दावा केला आहे की भगवान रामाचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी कोणतेही ऐतिहासिक पुरावे नाहीत. चोल सम्राट राजेंद्र चोल यांच्या जयंतीनिमित्त अरियालूर

उद्धव ठाकरेंच्या इंडी आघाडीच्या नेत्याची रामाच्या अस्तित्वावर शंका? Read More »