News Bharati

\”अरे बाबा तूच वस्तरा घेऊन ये आणि…\”, अजित पवारांचे श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर

बारामती लोकसभा : बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघात मतदानाच्या दिवशी पण शाब्दिक शीतयुद्ध चालू आहे. मतदानाचा हक्क बजावल्या नंतर अजित पवारांनी माध्यमाशी संवाद साधला. अजित पवार (Ajit Pawar) यांचे बंधू श्रीनिवास पवार (Shrinivas Pawar) यांनी अजित पवार यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, \”४ जूननंतर अजित पवारांना मिशा काढाव्या लागतील\”, असा टोला लावला होता. अजित पवारांनी आपल्या शैलीत श्रीनिवास पवारांना उत्तर दिलं आहे.\”अरे बाबा तूच वस्तरा घेऊन ये आणि काढ मिशा\”, असं म्हणत त्यांनी श्रीनिवास पवारांना टोला लागावला आहे.

आज लोकसभा निवडणूक २०२४ (Lok Sabha Election 2024) च्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले येथे मतदान सुरू आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar), आई आशाताई पवार सह सर्व कुटुबांने काटेवाडीत मतदानाचा हक्क बजावला.

श्रीनिवास पवार यांनी अजितदादांची आईही पवार घराण्यातील संघर्षामुळे बारामती सोडून पुण्यात बहिणीकडे राहायला गेल्याचे म्हटले होते. त्यावर अजित पवार म्हणाले, आमच्या समोरच्या लोकांनी कुटुंब माझ्या विरोधात असल्याचे दाखवले. माझी आई माझ्याबरोबर आहे. माझ्या आत्याच्या मुलाचे लग्न होते. मला तिने सांगितले होते की, मी मतदानाला तुझ्यासोबत येईन. माझी आई माझ्याबरोबर आहे. आमचे कुटुंब फार मोठे आहे. आमच्या परिवारातील श्रीनाथ पवार, राजेंद्र पवार आणि साहेब (शरद पवार) ही लोकच विरोधात आहेत. इतर सर्व माझ्या सोबत आहेत. आता विधानसभेची निवडणूक लागेल तेव्हा कोण कुठे प्राचार करेल, हे तुम्हाला दिसेल असे अजित पवार म्हणाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *