News Bharati

Police

ख्रिश्चन प्रार्थना सभेत अंधश्रद्धेचा प्रसार; डॉ. पॉल दिनाकरण यांच्यासह सहा जणांवर गुन्हा

सांगली : कवलापूर येथील विमानतळाच्या जागेवर आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र प्रेयर फेस्टिव्हल’ या ख्रिश्चन प्रार्थना सभेत अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे दावे केल्याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये चेन्नई येथील प्रसिद्ध वक्ते डॉ. पॉल दिनाकरण आणि सॅम्युअल दिनाकरण यांचा समावेश असून, जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. कवलापूर येथे १३ […]

ख्रिश्चन प्रार्थना सभेत अंधश्रद्धेचा प्रसार; डॉ. पॉल दिनाकरण यांच्यासह सहा जणांवर गुन्हा Read More »

\”पाकिस्तान जिंदाबाद\”च्या घोषणा दिल्याने पुण्यात तणाव; पर्वती येथील अमन मुल्लाविरुद्ध पोलिसांत तक्रार

पुणे : पुणे शहरातील पर्वती परिसरातील जनता वसाहत येथे एका व्यक्तीने \”पाकिस्तान जिंदाबाद\” अशी घोषणाबाजी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, संबंधित व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी आणि सामाजिक संघटनांनी केली आहे. नेमकी घटना काय?मिळालेल्या माहितीनुसार, पर्वती परिसरातील जनता वसाहत येथे राहणाऱ्या अमन मुल्ला नावाच्या

\”पाकिस्तान जिंदाबाद\”च्या घोषणा दिल्याने पुण्यात तणाव; पर्वती येथील अमन मुल्लाविरुद्ध पोलिसांत तक्रार Read More »

भीतीवर लोकशाहीचा प्रहार! 800 जवान, सी-60 कमांडो आणि ‘ती’ 44 स्मारके उद्ध्वस्त; मुख्यमंत्र्यांनी ठोकली शाबासकीची थाप

गडचिरोली : जिल्ह्याला माओवादाच्या छायेतून मुक्त करण्याच्या प्रवासात सुरक्षा दलांनी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांच्या दहशतीचे प्रतीक म्हणून उभारण्यात आलेली उरलेली शेवटची 44 स्मारके सुरक्षा दलांनी यशस्वीरित्या उद्ध्वस्त केल्याने जिल्ह्यातील माओवादाविरोधी लढ्याला मोठे यश मिळाले आहे. या कारवाईबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’ वर पोस्ट करत गडचिरोली पोलीस दलाचे अभिनंदन करत ही

भीतीवर लोकशाहीचा प्रहार! 800 जवान, सी-60 कमांडो आणि ‘ती’ 44 स्मारके उद्ध्वस्त; मुख्यमंत्र्यांनी ठोकली शाबासकीची थाप Read More »