परभणी : ४० ई-बसेस, हक्काची घरे आणि ३००० तरुणांना रोजगार; फडणवीसांनी मांडला ‘व्हिजन प्लॅन’
परभणी: \”पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली परभणी शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तुम्ही केवळ १५ तारखेला ‘कमळाची’ काळजी घ्या, पुढील ५ वर्षे परभणीच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी आमची असेल,\” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणीकरांना साद घातली. परभणी महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित ‘विजय संकल्प सभेत’ ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यासह महायुतीचे […]