News Bharati

Indian culture

ब्राझिलच्या प्राध्यापकाने ६ महिन्यांत आत्मसात केले संस्कृतचे ज्ञान; ‘संस्कृत सेवा फाऊंडेशन’चे यश!

पुणे : संस्कृत भाषेतील बौद्ध ग्रंथ समजून घेण्याच्या ध्यासाने ब्राझिलमधील एका प्राध्यापकाला पुण्याच्या ‘संस्कृत सेवा फाऊंडेशन’पर्यंत पोहोचवले आहे. अवघ्या सहा महिन्यांच्या ‘भाषाङ्कुरः’ (स्तर १) या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून या परदेशी अभ्यासकाने संस्कृत श्लोकांचे शुद्ध पठण आणि पदच्छेदासारखी कठीण कौशल्ये आत्मसात करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. संस्कृतमधील बौद्ध साहित्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी हे प्राध्यापक योग्य मार्गदर्शकाच्या […]

ब्राझिलच्या प्राध्यापकाने ६ महिन्यांत आत्मसात केले संस्कृतचे ज्ञान; ‘संस्कृत सेवा फाऊंडेशन’चे यश! Read More »

भारतीय संस्कृतीचा दरवळ आता जगभर! ‘दीपावली’चा समावेश युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत!

नागपूर : युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा (Intangible Cultural Heritage) यादीत दीपावलीचा समावेश करण्यात आल्याने भारतीय संस्कृतीचा दरवळ आता जगभर प्रसरेल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी विधानसभा आणि विधान परिषदेत निवेदनात सांगितले. महाराष्ट्राची सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरी अधोरेखित करणारे मराठा लष्करी भूरचनेचे यूनेस्कोचे मानांकन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली यावर्षी मिळवले. हा वारसा tangible म्हणजेच

भारतीय संस्कृतीचा दरवळ आता जगभर! ‘दीपावली’चा समावेश युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत! Read More »